शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हुडहुडी वाढली! सारसबागेतील बाप्पाला कानटोपी अन् स्वेटर परिधान, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:45 AM

1 / 7
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवू लागले आहेत. यातच आपल्या लाडक्या बाप्पाला थंडीचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी सारस बागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आला आहे.
2 / 7
पुण्यातील सारसबागेत तळ्यातील गणपती प्रसिद्ध आहे. पुण्यातील सर्वात जुने आणि सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक हे गणपती मंदिर आहे. श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे.
3 / 7
दरम्यान, पुण्यात थंडी वाढल्याने या तळ्यातील गणपतीला थंडीचा पोशाख परिधान करण्यात आला आहे. गणपती बाप्पाला स्वेटर आणि कानटोपीचा पेहराव करण्यात आला आहे. या ठिकाणी दरवर्षी हिवाळ्यात गणपती बाप्पाला स्वेटर परिधान करण्यात येत.
4 / 7
गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. यासोबतच सारस बाग देखिल प्रसिद्ध आहे. ही बाग देखील पाहण्यासाठी नागरिक येत असतात.
5 / 7
सारस बाग पुणे अभ्यागतांना उद्यानाभोवती आणि लॉनमधून सुंदर फेरफटका मारण्याची परवानगी देते. बागेत झुडुपे आणि बेंचसह काँक्रीटचे ब्लॉक्स सुस्थितीत आहेत. आठवड्याच्या शेवटी आपल्या मुलांना सहलीसाठी बाहेर घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी हे स्थान आदर्श आहे.
6 / 7
राज्यात मागच्या काही दिवसांपासून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने थंडी वाढली आहे. दरम्यान राज्यातील जवळपास 20 च्या वर जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याचा पारा 15 अंशाच्या खाली आल्याने बोचऱ्या थंडीचा अनुभव लोकांना मिळत आहे.
7 / 7
पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवस थंडीची लाट राहणार आहे. (सर्व फोटो - आशिष काळे)
टॅग्स :Puneपुणेganpatiगणपती