शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रागाच्या भरात घराबाहेर पडला आणि वैष्णोदेवी ते कन्याकुमारी प्रवास करून आला, पुणेकर अवलियाचा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:33 PM

1 / 5
राग आणि वेग यांचे जवळचं नातं आहे. रागाच्या भरात लोक काय काय करुन बसतात, हे आपण पहातोय .. पण रागाला विधायक दिशा दिली, सायकलचे हॅडल, पायाला पॅडल आणि वेग पकडला तर साक्षात वैष्णोदेवी मातेचे दर्शन होऊ शकते. हा चमत्कार नसून वास्तुस्थिती आहे. पुण्याच्या शिंदेवाडीतील महेश गोगावले यांनी पुणे ते वैष्णोदेवी असा २५०० किमीचा प्रवास करून हे सिद्ध करुन दाखवलंय.
2 / 5
महेश गोगावले पुण्यातील शिंदेवाडी भागात राहतात. त्यांच्या एकत्र कुटुंबामध्ये आई, वडिल, भाऊ, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. सायकल सोबत त्यांच एक अनोख आणि घट्ट नातं आहे. २०१५ मध्ये रागाच्या भरात त्यांनी चालू केलेला सायकल प्रवास अखंड सुरू असून त्यांनी आजतागायत ९७०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. असाच  'पुणे ते वैष्णोदेवी' हा सायकल प्रवास त्यांनी नुकताच पूर्ण केला आणि वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेतले.
3 / 5
आपला अनुभव सांगताना महेश गोगावले म्हणाले,' प्रवासादरम्यान अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. प्रवास करताना चार वेळा सायकल पंक्चर झाली. खरंतर एका दिवसाचे उदिष्ट १२० किमी प्रति दिन असे होते, परंतु वातावरणात दिवसागणिक बदल होत असल्यामुळे प्रति दिवस फक्त ८० किमी प्रवास झाला व प्रवासाचे दिवस वाढले. या दिवसात उत्तरेकडील भागात प्रचंड थंडी असते. परंतु कोणत्याही परिस्थितिला शरण न जाता प्रवास चालू ठेवला. पुण्यातून लोनावळा, पनवेल पालघर, सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, जयपुर, हरियाणा, दिल्ली, सोनीपत, पानीपत, अमृतसर, अंबाला, जालिंदर, पठानकोट, जम्मू कश्मीर सिटी आणि आखेर कटरा वैष्णोदेवी असा एकुण २५०० किलोमीटर प्रवास सायकलवर १ महिन्यांत पूर्ण केला.
4 / 5
प्रवासा दरम्यान कोरोना बाबत जनजागृती केली. 'मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, वायु प्रदूषण कमी करा आरोग्यासाठी सायकल चालवा' असा संदेश दिला. परतीचा प्रवास करताना जम्मू झेलम या रेल्वेने सायकल घेवून पुण्यात परत आलो' 
5 / 5
महेश गोगावले यांच्या कामगिरीची दखल घेऊन वंदेमातरम संघटना, कौशल्य विकास प्रतिष्ठान आणि येवले फांऊडेशनच्यावतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नवनाथ येवले, वंदेमातरम संघटनेचे प्रशांत नरवडे, स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, संतोष देवकर, मंगेश जाधव, निलेश येवले, सागर म्हस्के, अमोल कोकरे उपस्थित होते.
टॅग्स :PuneपुणेIndiaभारतJara hatkeजरा हटके