शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 11:50 AM

1 / 11
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
2 / 11
त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.
3 / 11
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेल्या जगताप यांच्यामुळेच उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती.
4 / 11
आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. एप्रिल २०२२ पासून त्यांची तब्बेत खालावत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. पण, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
5 / 11
राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर सत्तांतर घडले. मात्र, या सत्तातरांपूर्वी एक राज्यसभा आणि विधानपरिषदेची राजकीय लढाई झाली. त्यात, भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी कर्तव्यनिष्ठा जपत रुग्णवाहिकेतून मतदानकेंद्र गाठलं होतं.
6 / 11
राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपनं जिंकल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता.
7 / 11
काही दिवसांपूर्वी आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं. आज जगताप यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोघांनीही आजारी असतानाही, रुग्णवाहिकेतून येऊन आपलं मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकलं होतं.
8 / 11
पुण्यातील औंधच्या श्री. शिवाजी विद्यामंदिरातून दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मण जगतापांचा शेती आणि व्यवसाय हे दोन मिळकतीचे मार्ग आहेत. विधिमंडळ सदस्य म्हणून मिळणारा पगार आणि भत्ताही मिळकतीचे मार्ग आहेत, असं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. साई कन्स्ट्रक्शन, चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये ते भागीदार आहेत.
9 / 11
पिंपरी-चिंचवड महापालिकेतून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगतापांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
10 / 11
मात्र, 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीलाही राम राम ठोकला आणि अपक्ष म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. अपक्ष म्हणून काम करत असतानाच, शेतकरी कामगार पक्षाकडून 2014 साली लोकसभा लढले. त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पराभव केला.
11 / 11
लोकसभेतील पराभवानंतर जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 ची विधानसभा त्यांनी भाजपमधून लढवली. 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा ते भाजपचे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले आहेत.
टॅग्स :MLAआमदारBJPभाजपाPuneपुणेElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस