शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 3:50 PM

1 / 9
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी बारामतीकडून काटेवाडीकडे प्रस्थान झाले.
2 / 9
शहरातील मोतीबागेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवार यांनी सपत्नीक वारीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठुनामाचा गजर केला.
3 / 9
काही काळ उपमुख्यमंत्री पवार यांनी पालखी रथाचे काही काळ सारथ्यही केले. दरम्यान, मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
4 / 9
तत्पूर्वी, बारामती विमानतळावर आज सकाळी अजित पवार यांचं आगमन झालं होतं.
5 / 9
'पंढरपूरच्या विठु माऊलीच्या वारीत सहभागी होण्यासाठी बारामतीला आलो. मी काटेवाडीपर्यंत या वारीत चालणार आहे. बारामतीतील कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं,' असं ते म्हणाले.
6 / 9
'आज वारीत दंग होऊन वारकऱ्यांसोबत चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. पंढरीची वारी म्हणजे एक समृद्ध करणारा आध्यात्मिक अनुभव. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातून पांडुरंगाची कृपा अनुभवण्याची संधी मिळतेय हे केवढं मोठं सौभाग्य,' अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
7 / 9
'ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्वांना एकत्र येऊन समाजाला सुखमय बनवण्याच्या दिशेने कार्य करण्याची शिकवण देतात. तशीच प्रार्थना मी आपल्या राज्याच्या सुखासाठी माऊलींकडे करतो आहे. आपल्या महायुती सरकारला जनतेच्या सुख-समृद्धी, शांतता आणि कल्याणासाठी काम करण्याचं सामर्थ्य मिळत राहो,' अशी इच्छाही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
8 / 9
'वारीत सहभागी होणारे वारकरी हे भक्तीच्या प्रवासातले सच्चे प्रवासी आहेत. त्यांचे पाय पंढरपूरच्या पवित्र धुळीस मिळण्या आतुर आणि ओठांवर विठोबाचे नामस्मरण आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती, एकात्मता, आणि त्यागाचा सुंदर संगम आहे. या वारकऱ्यांच्या चरणी शतश: नमन,' असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
9 / 9
यावेळी पवार यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी, तसेच हस्तांदोलन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे चित्र होते.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाBaramatiबारामती