शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Supriya Sule: भगवं उपरणं घालून हनुमान आरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 3:26 PM

1 / 8
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर हनुमान जयंतीच्यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले.
2 / 8
हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसेकडून पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, शिवसेनेकडून दादरमध्ये अशीच महाआरती पार पडली.
3 / 8
शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या महाआरतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. आदित्य ठाकरेंच्याहस्ते येथे आरती करण्यात आली.
4 / 8
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यातील कर्व्हे नगरच्या हनुमान मंदिरात आरती केल्याचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत.
5 / 8
सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या या फोटोत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गळ्यात भगवं उपरणं परिधान करुन मंदिरात दिसत आहे.
6 / 8
सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दुसरीकडे मनसेनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हनुमान आरतीवरुन त्यांना टोला लगावला आहे.
7 / 8
''संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते, सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी आणि नव पुरोगाम्यांनी केलेल्या महाआरतीशी संबंध नाही,'' असे म्हणत देशपांडेंनी महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांवर टिका केली आहे.
8 / 8
राज्यात सध्या हनुमान चालिसा म्हणण्यावरुन चांगलंच राजकारण होताना दिसत आहे, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :MNSमनसेSupriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस