ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 28 - मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर वाकसई गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. भरधाव वेगातील टेम्पो समोर जाणार्या ट्रेलरवर मागून जोरात आदळल्याने झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतुक पुर्णतः ठप्प झाली आहे. अपघातानंतर जवळपास पाच किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो समोर जाणा-या ट्रेलरवर जोरात आदळल्याने हा अपघात झाला. अपघतात टेम्पो चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्याचे काम स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक, एमएसआरडीसीचे आर्यन देवदूत पथक व आयआरबी कर्मचारी यांनी केले. क्रेन वेळेवर उपलब्ध न झाल्यानर एका खासगी ट्रकच्या सहाय्याने केबिन ओढत चालकाला बाहेर काढण्यात आले. चालक गंभीर जखमी आहे.दरम्यान सर्व वाहने रस्त्यावर असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक पुर्णतः ठप्प होत वाहनांच्या रांगा शिलाटणे टाकवे गावापर्यत गेल्याने सकाळी सकाळी कामानिमित्त बाहेर पडणारे चाकरमणी, दुग्ध व्यवसायिक यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.