PHOTOS : देहूत लाखो भाविकांनी केले जगद्गुरूंना अभिवादन; तीन लाख वैष्णवांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 19:29 IST
1 / 9जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत येऊन दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर वारकरी भाविक रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा-टाळ-मृदंग यांच्या साथीत भजनासह हरिनाम संकीर्तनात दंग झालेले होते.2 / 9मंदिराच्या आवारात राम मंदिरासमोर व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरासमोर मंडप घालण्यात आला होता. मंदिराला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती.3 / 9यावेळी काही वारकरी वासुदेवाच्या वेषात आले होते4 / 9यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी गुरुवारी पहाटेपासूनच पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात आणि गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.5 / 9भाविकांना दर्शनासाठी दर्शनबारीतून सोडण्यात येत होते.6 / 9देहूत चिमुकल्या वारकऱ्यांनीही हजेरी लावली होती. 7 / 9प्रसादाची सोय करताना8 / 9सकाळपासूनच इंद्रायणी नदी घाट भाविकांनी फुलून गेला होता.9 / 9वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी गोपाळपुऱ्याकडे गर्दी करीत होते आणि जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी सुरक्षित बसत होते.