शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

येळकोट येळकोट जय मल्हार; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 5:15 PM

1 / 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यांनी श्री क्षेत्र जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबा महाराजांचे पूजन करुन मनोभावे दर्शन घेतले.
2 / 9
यावेळी उपस्थितांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या निनादात भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी, माजी आमदार विजय शिवतारे हेही उपस्थित होते.
3 / 9
शासन आपल्या दारी अभियानाच्या पुणे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी येथे करण्यात आले होते, त्यासाठी ही नेतेमंडळी जेजुरी गडावर आली होती.
4 / 9
सुमारे ३४९ कोटी रुपये खर्चाचा श्री क्षेत्र जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १०९ कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन यावेळी झाले.
5 / 9
तसेच, शासन आपल्या दारी अभियानातील आजपर्यंतच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा विक्रम पुणे जिल्ह्याने मोडला असून जिल्ह्यात सुमारे २२ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
6 / 9
या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले.
7 / 9
राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे. राज्यात सर्व जाती धर्मामध्ये सलोखा नांदू दे. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटावा.
8 / 9
उद्योगपतींनी राज्यात मोठी गुंतवणूक करावी. तसंच पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी प्रार्थना खंडेरायाचरणी केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं
9 / 9
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने राज्यात या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली होती.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारJejuriजेजुरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस