शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माथेरानच्या राणीची 'श्रीमंती'; एका आठवड्यात झाली 'लखपती'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 11:35 AM

1 / 10
कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घराबाहेर पडता आलं नाही. मात्र अनलॉकनंतर भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या निसर्गरम्य, थंड हवेच्या माथेरान या पर्यटनस्थळाला लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
2 / 10
प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेलं माथेरान देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालतं. 2400 फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने या ठिकाणी प्रदूषणाचा लवलेश नाही. 54 चौरस किलोमीटरवर माथेरान पसरले असून, यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
3 / 10
माथेरान हे सर्वांच्याच आवडीचे ठिकाण आहे. यंदा लॉकडाऊनमध्ये बरेच दिवस घरी असलेल्या नागरिकांनी दिवाळी, नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी माथेरान गाठलं.
4 / 10
माथेरानची राणी म्हणून ओळख असणाऱ्या मिनी ट्रेनमधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शवली आहे. मध्य रेल्वेच्या महसुलात यामुळे तब्बल 33 लाख 26 हजारांची भर पडली आहे.
5 / 10
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिनी ट्रेनची वाहतूक बंद होती. मात्र नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सुरू झाली. सुरुवातीला अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवेच्या दिवसाला चार फेऱ्या या सुरू करण्यात आल्या.
6 / 10
नोव्हेंबरमध्ये 16 हजार ९४६ प्रवाशांनी माथेरानला भेट दिली असून 11 लाख 38 हजार 157 रुपयांचा तर डिसेंबरमध्ये 28 हजार 186 प्रवासी आले असून 17 लाख 31 हजार 567 रुपयांचा महसूल मिळाला आहे.
7 / 10
मध्य रेल्वेने दिवाळीनंतर दिवसाला 12 फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात लाखोंची भर पडली आहे. माथेरानच्या मिनी ट्रेनला नववर्षात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
8 / 10
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेनमधून सात हजार 557 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर यातून चार लाख 91 हजार 298 रुपयांची मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर पडली आहे.
9 / 10
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानची ओळख व माहिती डिजिटल स्वरूपातही असावी यासाठी एक अ‍ॅप बनविले जात आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना पॉइंट्स, हॉटेल - रेस्टॉरंट, वन्यजीव याची इत्थंभूत माहिती यातून मिळेल तसेच दस्तुरी नाका येथे होणारी त्यांची फसवणूक थांबावी या दृष्टीनेही अ‍ॅप उपयुक्त ठरू शकते.
10 / 10
अ‍ॅपमध्ये पर्यटकांना माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोडे, हातरिक्षा, कुली आदींची सर्व माहिती असणार आहे. यात दरांचाही समावेश असेल. माथेरानच्या दस्तुरी नाका येथे एन्ट्री तिकीट घेतल्यानंतर वायफायच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅनद्वारे हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल तसेच गुगल आणि अ‍ॅपलच्या प्ले स्टोअरवरूनही ते उपलब्ध असणार आहे.
टॅग्स :Matheranमाथेरानcentral railwayमध्य रेल्वे