1 / 12मेष - संमिश्र ग्रहमान : संमिश्र ग्रहमान राहील, काही अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. मात्र यशासाठी परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. केलेल्या अभ्यासाचा निश्चितच फायदा होईल. घरी लोकांची ये - जा चालू राहील काहीना प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आपली गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. काही कारणाने मनावर थोडा ताण आल्यासारखे वाटेल. मनात थोडे निराशेचे विचार येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. तसेच ईश्वरी उपासनेचा फायदा होईल. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. 2 / 12वृषभ - व्यवसायात भरभराट होईल : नोकरीत तणावाचे वातावरण राहील. वरिष्ठाशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. काहींना अचानक बदलीला सामोरे जावे लागेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील, भावंडांच्या भेटीगाठी होतील घरी अनपेक्षित नातेवाईक येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. आर्थिक आवक चांगली राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. टीप - रविवार, सोमवार गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस. 3 / 12मिथुन - अनुकूल ग्रहमान : ग्रहमानाची अनुकूलता राहील. अनेक आघाड्यांवर यश मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. ती आपण यशस्वीपणे पूर्ण कराल विविध प्रकारचे लाभ होतील. वाहन सुख मिळेल. विविध प्रकारच्या सोयी सुविधा मिळतील. तुमचा प्रभाव वाढेल. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. भावंडाच्या भेटी होतील, व्यवसायात विक्री चांगली राहील. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. टीप - रविवार, सोमवार गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस. 4 / 12कर्क - कामाचा व्याप वाढेल : काही कटू काही गोड अनुभव येतील. आर्थिक बाजू थोडी विस्कळीत होईल, वसुलीच्या कामांना खीळ बसल्यासारखे होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होण्यात अडचणी येतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल; मात्र कामे पार पाडताना वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. भावंडांशी सलोख्याचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत बदल होतील. अधिकार मिळेल; पण कामाचा व्याप वाढेल. अनपेक्षित पाहुणे येतील. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांना मार्गदर्शन करा. टीप - रविवार सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.5 / 12सिंह - काही बदल होतील : विविध प्रकारच्या बदलांना सामोरे जावे लागेल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल निष्कारण खर्च होईल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल; मात्र खर्चाची वेळ येईल तेव्हा लोक मागे हटतील आणि तुम्हाला पुढे करतील, त्यामुळे कुणाला कितीही वाईट वाटले तरी आर्थिक व्यवहार करताना जपून राहा. खर्चाच्या बाबतीत स्पष्टता ठेवायला पाहिजे. जीवनसाथीच्या कलेने घ्या. आपलेच घोडे पुढे दामटू नका. अन्यथा वादाचे प्रसंग येतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. टीप - मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. 6 / 12कन्या - दगदगीची कामे टाळा : या सप्ताहात आपली अनुकूलतेकडे वाटचाल सुरू राहील, मात्र खाण्या पिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य विषयक त्रास होऊ शकतो. दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. कामे करताना अधून - मधून आराम करणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील प्रवासाचे योग येतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र गैरसमज करून घेऊ नका प्रेम प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. टीप - रविवार, सोमवार, गुरुवार शुक्रवार चांगले दिवस. 7 / 12तूळ - कामाचा ताण राहील : एक काम संपले की, दुसरे काम दत्त म्हणून समोर उभे राहील. नोकरीत कामाचा ताण राहील घरी पाहुणे येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. थोडी तारांबळ उडेल, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. पैसे हाती आले तरी टिकणार नाहीत. खर्च करण्याकडे कल राहील तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. सात्विक आणि हलका आहार घ्या. मसालेदार पदार्थ टाळा. मनावर कसले तरी दडपण राहील. जोडीदाराशी बोलून मन मोकळे करा मुलाच्या भवितव्याची चिंता वाटेल. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. 8 / 12वृश्चिक - सहजपणे यश मिळेल : भाग्याची चांगली साथ राहील अडचणी दूर होतील. फारसे प्रयत्न न करता अगदी सहजासहजी यश मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल, मात्र यश मिळत असताना लोकांची कदरपण केली पाहिजे लोकांना नाराज करू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. घरी पाहुणे येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आर्थिक आवक मनासारखी राहील. खर्चाला आळा घाला. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस. 9 / 12धनू - सफलता मिळेल : सकारात्मक परिस्थिती अनुभवण्यास मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल त्यासाठी सगळीकडून मदत व मार्गदर्शन मिळेल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. घरात नवीन चैनीच्या वस्तू खरेदी कराल. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील वसुलीसाठी तगादा लावावा लागेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. उच्च पद अधिकार मिळतील पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विविध लाभ होतील व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. टीप - मंगळवार, बुधवार शुक्रवार शनिवार चांगले दिवस.10 / 12मकर - व्यवहार जपून करा : आर्थिक आवक चांगली राहील, मात्र आर्थिक व्यवहार जपून करा. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळतीलच, असे नाही. त्यामुळे उसने पैसे देताना विचार करून द्या. जवळचे लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील आणि स्वतःचे फायदे करून घेतील आपण अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत अनपेक्षितपणे बदल होतील. टीप - रविवार सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.11 / 12कुंभ - सकारात्मक विचार करा : मनावर थोडा ताण राहील. मनात काळजीचे विचार राहतील. जवळच्या व्यक्तींच्या भेटी चर्चा याचा मनावरील ताण कमी करण्यासाठी फायदा होईल. सकारात्मक विचार करा. आराध्य देवताची उपासना जप यातून मार्ग निघेल. आरोग्याची वेळच्या वेळी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. प्रवास शक्यतो टाळा. घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करा आर्थिक बाजू चांगली राहील. मनासारखे भोजन मिळेल. आवडत्या छंद वेळ काढा. टीप - सोमवार मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस12 / 12मीन - यशदायक काळ : अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. सहजासहजी यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्यात गोडवा राहील मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास शक्यतो टाळा. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करता येईल. चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. टीप - सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.