शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

आठवड्याचे राशीभविष्य : 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2021, 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार; मानसिक सुख मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 7:59 AM

1 / 12
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आपण काही कारणांमुळे चिंतातूर व्हाल. असे असले तरी वेळेनुसार कार्यरत राहून आपण यशस्वी होऊ शकाल. आपल्या प्रणयी जीवनास खुलवण्यासाठी एखाद्या प्रेक्षणीय स्थळी फिरावयास जाल. आपल्या वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तसेच त्यांच्या सहवासात थोडा वेळ घालविणे सुद्धा उचित होऊ शकेल. नोकरीत आपल्या परिश्रमाचे यथायोग्य फळ मिळेल. तसेच वरिष्ठांकडून आपण प्रशंसित व्हाल. ह्या आठवड्यात व्यापारीवर्गास चांगला फायदा होईल. एखाद्या स्मृतिस्थळाची माहिती मिळू शकेल अशा ठिकाणी विद्यार्थी सहलीस जाऊ शकतील. निरोगी राहण्यासाठी आपण चांगला व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवाल. त्यामुळे आपली प्रकृती चांगली राहील. दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल.
2 / 12
मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागल्याने हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल. आपण आपल्या कामात गुरफटून गेल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कोणतेही काम आपण पूर्ण करू शकणार नाही. वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रियव्यक्तीच्या सहवासात राहण्याची संधी प्राप्त झाल्याने आपल्या प्रेमास बहर येईल. व्यापारात आपल्याच माणसाकडून दगाफटका होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या कायद्याच्या कचाट्यात सापडून आपणास थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायद्याच्या विरुद्ध कोणतेही कार्य करू नये.
3 / 12
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. आपण मानसिक काळजी करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ शकेल. आपणास आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता सुद्धा आहे. वैवाहिक जीवन समाधानी राहील. आपणास वैवाहिक जोडीदाराच्या लटक्या रागास सामोरे जावे लागेल. प्रेमी युगलांना मात्र काही क्षुल्लक कारणांनी वादग्रस्त प्रसंगांना तोंड द्यावे लागण्याच्या शक्यतेमुळे थोडे सावध राहावे लागेल. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत एखादा सहकारी अडथळे निर्माण करण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा उत्तम आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
4 / 12
हा आठवडा आर्थिक दृष्ट्या सर्वोत्तम ठरणारा आहे. आपल्या व्यस्ततेमुळे कुटुंबीय, मित्र व समाजासाठी आपण वेळ काढू शकणार नाही. उलट आपले व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यावर आपण भर द्याल. असे असले तरी वरिष्ठांशी संवाद साधताना आपणास सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात आपणास वडीलधाऱ्या व्यक्ती, उच्च पदस्थ, शासकीय कर्मचारी सहित इतर वरिष्ठ व्यक्तींशी संवाद साधताना संयमित राहावे लागेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा लागेल असे दिसत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य फळे देणारा आहे. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यास तयार राहावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस आरोग्याच्या बाबतीत आपणास दिलासा देणारे आहेत. असे असले तरी काही तणाव निर्माण झाल्यामुळे आपली झोप उडण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अतिरिक्त शारीरिक व मानसिक ताण घेऊ नका. नशिबाच्या बाबतीत हा आठवडा सामान्यच आहे.
5 / 12
हा आठवडा आपणास चांगला फलदायी ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखादा प्रवास करू शकलात तरी त्यात काही अडथळे निर्माण होतील. आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असून आठवड्याच्या मधल्या दिवसांपासून त्यात सुधारणा होऊ लागेल. आपण कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. आवश्यक असलेले खर्च सुद्धा कराल. कुटुंबात एकमेकांबद्धल आपुलकी राहील. प्रेमी युगलांना मात्र काही समस्यांना सामोरे जावे लागेल. एखाद्या अन्य व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे आपल्या संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. त्यांच्यात गोडवा निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात योग्य लक्ष न दिल्यास नोकरी गमावून बसण्याची पाळी येईल. व्यापाऱ्यांना एखादी संधी लाभून मोठा लाभ होऊ शकेल. आपल्या मनात सतत धार्मिक विचार येतील. विद्यार्थ्यांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, मात्र तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.
6 / 12
या आठवड्याच्या मध्यास जीवनातील अनेक चढ - उतार आपल्या अनुभवास येतील. आपले आरोग्य सामान्यच राहील. मात्र, ऋतुगत त्रासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या प्राप्तीत उल्लेखनीय वाढ झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन नवीन काही करण्याची आपणास प्रेरणा होईल. काही समस्यांमुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मनात नोकरीत बदल करण्याचे विचार येऊ लागतील. व्यापारीवर्गास चांगला फायदा होईल. विशेषतः सल्लागार, लोखंडाचे व्यापारी व माध्यमांशी संबंधित व्यक्तींना खास लाभ होऊन त्यांच्या व्यापारास गती येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय होईल. आपल्या जोडीदाराची प्रगती होईल. त्यामुळे आपणास मनापासून आनंद होईल. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे.
7 / 12
आठवड्यात आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कुटुंबीयांप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडाल. हा आठवडा आपणास सामान्य फलदायी ठरणारा आहे. नोकरीत आपल्या परिश्रमाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे आपल्यावर इतर जवाबदाऱ्या सोपविण्यात येऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून आपणास अपेक्षित असलेले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील व कुटुंबात एकोपा निर्माण होऊन प्रत्येकजण आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. कदाचित आपला जोडीदार एखाद्या बाबतीत घाई करेल, मात्र त्याचे परिणाम प्रतिकूल होतील. अशा वेळेस आपणास लक्ष घालावे लागेल. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीस आपण कुटुंबीयांची ओळख करून देऊ शकाल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी अधून मधून थोडा ताप येण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत
8 / 12
हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आपण स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करून प्राप्तीत वाढ करण्याचा प्रयत्न कराल. त्याचा आपणास फायदा होऊन आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आपले आरोग्य उत्तम राहील, तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपली व्यापारी नीती अधिक दृढ केल्याचा आपणास फायदा होईल. कुटुंबात एकोपा राहील. प्रेमी युगलांना आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात आनंद व समाधान लाभेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल, परंतु लगेच काही दिवसात परिस्थितीत बदल होऊन आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विरोधकांनी आपणास त्रास देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात त्यांना यश मिळणार नसल्याने आपण काळजी करू नये. आपल्या व्यक्तिमत्वातील आकर्षण वाढेल. लोक आपल्याकडे येऊ लागतील. नोकरी करणाऱ्यांना आपल्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. आपणास शासनाकडून काही लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापारीवर्गासाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामाच्या विस्तारासाठी आपणास दूरदर्शीपणा ठेवावा लागेल. आपण एखादा नवीन मोबाईल किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची शक्यता सुद्धा आहे. विवाहितांना आपल्या जीवनात प्रेमाची व आपुलकीची अनुभूती आल्याने त्यांचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजनांना आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. प्रवासासाठी आठवड्याचे अखेरचे दिवस अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपणास अत्यंत अनुकूल आहे. आपल्या प्राप्तीत सतत वाढ होत राहिल्याने आपण खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल व त्यामुळे वित्तीय नियोजन करणे आपणास सहज शक्य होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासासाठी आठवड्याचा शेवटचा दिवस जास्त अनुकूल आहे. आपल्या सुखसोयीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावे लागतील. विवाहितांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपल्या वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रणयी जीवनात मात्र आपल्या प्रियव्यक्तीशी काही कारणाने वाद झाल्याने स्वतःला सिद्ध करावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे सुरुवातीचे दिवस अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने कामात येणाऱ्या अडचणींवर आपण सहजपणे मात करू शकाल. आपण कौटुंबिक गरजा समजून घ्याल व त्या पूर्ण करून कुटुंबियांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. आरोग्यात सुधारणा झाली तरी आपल्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल. वजन वाढण्याची शक्यता आहे, तसेच पायांना दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्राप्तीत वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहवासात रात्री भोजन करण्याची संधी मिळेल. आपले संपर्क वाढतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांची व्यापारात चांगली प्रगती होईल. नफा वाढेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रणयी जीवनात माधुर्य राहील. मात्र, विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. जोडीदाराच्या मदतीमुळे आपणास एखादा मोठा फायदा संभवतो. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययनात प्रगती होईल. त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे.
12 / 12
हा आठवडा आपणास अनुकूल असा आहे. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीच कामे सुरळीतपणे होऊ शकतील. आर्थिक प्राप्ती होईल. आपली आर्थिक स्थिती प्रबळ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. मात्र, लक्ष्यांक पूर्ण न झाल्याने सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता सुद्धा आहे. बोलताना संयमित राहावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतिकारक आहे. आपल्या व्यापारास गती येईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आव्हानांचा सामना करण्यास आपण तयार व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. प्रणयी जीवन आनंदी राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अधिक अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष