शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 10 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2021; नातेसंबंधात तणाव, उलथा पालथ होईल, 'या' राशीसाठी आठवडा खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:17 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आठवड्याची सुरवात मध्यम फलदायी आहे. आपण मानसिक तणावाखाली वावरत राहाल. आपणास विनाकारण खर्च करावे लागतील. आपला पैसे कोठे जात आहे हे आपणास न समजल्याने आपण चिंतीत व्हाल. आपले विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण त्याने विचलित होणार नाही. नोकरीत आपणास चांगले पद प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यापारात आपला भागीदार फसवणूक करण्याच्या शक्यतेमुळे आपण आपल्या भागीदारा पासून सावध राहावे. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात आपणास प्रेम प्राप्त होईल. आपल्या सासुरवाडी कडील लोकांना भेटण्याची संधी मिळेल. प्रेमीजनांनी आपल्या प्रिय व्यक्तीस प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नये. त्यासाठी थोडे थांबावे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या वैवाहिक जीवनावर आपले लक्ष केंद्रित कराल व आपल्या जोडीदाराच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या मनात स्नेह वाढून आपणास उत्तम वैवाहिक सौख्य मिळेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा नाजूक आहे. आपल्या नात्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. कुटुंबाच्या सहकार्यामुळे आपल्या प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात चांगले यश प्राप्त होऊ शकेल. तेव्हा ह्या अनुकूलतेचा सदुपयोग करावा. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा आपल्या कामात कष्ट करून वाटचाल करावी लागेल. कदाचित आपणास आपली किंमत नसल्याचे वाटेल, परंतु वस्तुस्थिती त्याहून निराळीच असेल. आपली कामे करतच राहावे. आपली बुद्धिमत्ता आपल्या उपयोगी पडेल. आपल्या मुलांची वेगाने प्रगती होईल. ते ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात यशस्वी होतील.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या प्रवासाचे आयोजन कराल. हा प्रवास आपल्या कामा निमित्त असू शकतो. त्यासाठी आपणास खूप प्रयत्न व खर्च सुद्धा करावा लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अधिक मेहनत करण्याचा आहे. ग्रहस्थिती अनुकूल नसल्याने आपणास जरी कामाचे समाधान लाभले नाही तरी आपण काम करतच राहावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या व्यवसायात नवीन गोष्टी शिकावयास मिळतील व त्या शिकून घेऊन आपण आपल्या व्यापारास गती देऊ शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात शुभ व मंगलमय वातावरणाची निर्मिती होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल नाही. एखाद्या गोष्टीमुळे आपली प्रिय व्यक्ती क्रोधीत होण्याची शक्यता असल्याने आपणास शांत राहावे लागेल. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला असला तरी आपला वैवाहिक जोडीदार काही गोष्टींमुळे आतल्या आत गुमसुम असल्याचे दिसून येईल. अशा परिस्थितीत आपणास पुढाकार घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.
4 / 12
आठ्वड्याच्या सुरवातीस आपण वैवाहिक जोडीदार व प्रियजनांच्या सहवासात भरपूर वेळ घालवाल, परंतु आठवड्याच्या मध्यास नातेसंबंधात तणाव व उलथा पालथ होत असल्याचे आपणास जाणवेल. ह्या दरम्यान मानसिक ताण आपल्या क्रोधास कारणीभूत होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखाद्या आर्थिक लाभाची अपेक्षा आपण बाळगू शकता. असे असले तरी आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होण्याची सुद्धा संभावना आहे. आठवड्याच्या मध्यास आपले काम व व्यक्तिगत जीवन ह्यात समतोल साधणे अत्यंत आव्हानात्मक होऊन बसेल. आठवड्याच्या अखेरीस आपल्यात ऊर्जा व उत्साह भरपूर असेल. ह्या दरम्यान आपल्या नोकरीवर किंवा व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित झालेले असेल. मात्र, घाई गडबडीत आपल्या हातून चुका होणार नाहीत ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. आपले ग्राहक, वितरक व एजंट ह्यांच्याशी नम्रतेने वागून सुद्धा आपल्या संबंधात सुधारणा होऊ शकेल. आठवड्याच्या सुरवातीस व अखेरीस विद्यार्थी एकाग्रतेने आपले अध्ययन करू शकतील, मात्र मधल्या दिवसात त्यांची एकाग्रता कमी झाल्याचे दिसून येईल.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकाल. घरगुती खर्च सुद्धा होतील. घराच्या सुशोभीकरणासाठी पैसा खर्च कराल. कुटुंबीयांप्रती आपली जवाबदारी ओळखून आवशक्यतेनुसार प्रत्येकास काही ना काही भेटवस्तू देऊ शकाल. त्यामुळे कुटुंबीय खुश होतील व त्यांच्यात नवीन उत्साह निर्माण होईल. आपल्या ह्या सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्या नोकरीवर झाल्याने आपण तल्लीन होऊन आपली कामे कराल व त्याचे आपणास चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सावधपणे काम करण्याचा आहे. आपणास काही प्रशासकीय आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. खर्चात वाढ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपले आरोग्य चांगले राहिले तरी उष्ण प्रकृतीच्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन आपले आरोग्य बिघडवू शकते.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात वाढ होईल. प्राप्ती कमी झाली तरी जस जसे दिवस सरतील तस तशी प्राप्तीत वाढ होऊन खर्चात कपात होईल. मानसिक तणावा पासून मुक्तता होईल. कार्यात पुढाकार घेण्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरीत आपली प्रतिमा उजळेल. व्यापारात आपण नवीन योजनांची अंमल बजावणी कराल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी आपले आपल्या जिभेवर नियंत्रण नसल्याने समस्या निर्माण होऊ शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन एखाद्या अनामिक भीतीने ग्रस्त असेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्ती समोर बाहेर फिरावयास जाण्याचा प्रस्ताव ठेवल्यास तो त्यांना स्वीकार्य असेल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल.
7 / 12
ऑक्टोबर महिन्यातील हा आठवडा आपणास मध्यम फले देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस धन प्राप्ती कशी होईल ह्यावर जास्त लक्ष देऊन खर्चांवर नियंत्रण कसे मिळवता येईल ह्याचा आपण विचार कराल. ह्याचा परिणाम आठवड्याच्या मध्यास व अखेरच्या दिवसात बघावयास मिळेल. नोकरी करणारे जातक आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. आपल्या कामात अधिक कष्ट घेतल्याने त्यांच्या कामात सुधारणा होईल. व्यापाऱ्यांना प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. प्रेमीजनांना थोडे शांत राहावे लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीस कोणत्याही गोष्टीचा आग्रह करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीची असहायता समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे. गरज भासल्यास त्यांना मदत करावी. वैवाहिक जीवन तणावग्रस्त असण्याची शक्यता असल्याने विवाहितांनी काळजी घ्यावी. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
8 / 12
हा आठवडा आपणास आनंदित करणारा आहे. आपण स्वतःवर लक्ष द्याल. काही नवीन कपड्यांची खरेदी कराल. ह्या व्यतिरिक्त आपणास जर आवड असेल तर उंची सनग्लासची खरेदी सुद्धा करू शकाल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. रोमांस वाढेल. प्रेमीजनांना मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. आपल्याला जाणवत नसलेल्या काही समस्या आहेत हे आपणास समजून घ्यावे लागेल. आपले आरोग्य उत्तम राहील. इतरांचे चांगले करण्याचा विचार आपल्या मनात येत राहील. पूजा पाठ करण्यासाठी वेळ देऊ शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामा पासून चांगला लाभ होईल. त्यांच्या नोकरीतील समस्या कमी होऊन वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. त्यांना ह्याचा फायदा होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या खर्चात होत असलेल्या वाढीमुळे आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. आपल्या प्राप्तीच्या मानाने हि वाढ जास्त असल्याने त्याची काळजी घ्यावी लागेल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी थोडा ताप येण्याची संभावना आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे. आपण आपली कामे दृढतापूर्वक करून चांगले परिणाम मिळवू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे. आपणास बाजारातील स्पर्धेकडे लक्ष द्यावे लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त होऊ शकते. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रभावित करण्याचा प्रयत्न करून आपले प्रणयी जीवन प्रगती पथावर नेऊ शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. विविध मार्गाने आपल्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. योजनांना गती येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन एकमेकांची प्रशंसा करण्यात व्यतीत होईल. त्यामुळे एकमेकांच्या मनात चांगले स्थान निर्माण होईल. नाते दृढ होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीस प्रभावित करण्याची संधी मिळेल. एखादा स्वादिष्ट पदार्थ बनवून त्यांना प्रभावित करण्यात यशस्वी होऊन त्यांचे हृदय आपण जिंकू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांचे कामात मन रमेल. लहान - सहान समस्या आल्या तरी आपली कामे व्यवस्थित पार पडल्याने कोणतीही मोठी समस्या त्रासदायी होऊ शकणार नाही. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या योजनांना आकार देऊन भविष्य विषयक आराखडा तयार कराल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे आपली कामे चांगली होऊन आपल्या प्रतिमेत सुधारणा होऊ शकेल. कामाची प्रशंसा होईल. नशिबाची साथ मिळाल्याने कमी श्रमात आपली बरीचशी कामे पूर्ण होतील. आपण ह्या अनुकूलतेचा फायदा घ्यावा. आपल्या पगारात वाढ करण्यासाठी वरिष्ठांशी बोलणी करू शकाल. आपल्या कामात मित्रांची मदत होऊ शकेल, मात्र स्वतःवर विश्वास न ठेवल्यास आपले आत्मबल कमकुवत होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपल्या व्यवसायात आपणास चढ - उतारांना सामोरे जावे लागू नये म्हणून आपल्याला त्यात नवीन प्रयोग करावेच लागतील. प्रकृती थोडी नाजूक होण्याची शक्यता आहे. काही जातकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवन सामान्य रूपात व्यतीत होईल. प्रेमीजनांना आपल्या नात्याच्या भविष्या विषयी गंभीरपणे विचार करावा लागेल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. सुरवात खूपच चांगली होईल. त्यामुळे आपणास नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आपले नवीन संपर्क प्रस्थापित होतील. ह्या आठवड्यात आपणास रजा काढून एखाद्या रमणीय ठिकाणी सहलीस जाण्याची संधी मिळू शकते. आपले प्रणयी जीवन सुंदरच असेल. आपसातील प्रेम वृद्धिंगत होईल. विवाहितांनी आपले वैवाहिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न करावा. हट्टीपणा केल्यास नात्यात सुधारणा होण्या ऐवजी कटुता वाढू शकते. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास आपणास एखादा फायदा संभवतो. एखाद्या ठिकाणाहून आपला पैसा सुद्धा परत मिळू शकतो. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या जातकांची कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवसंजीवनी देणारा ठरेल. आपण चांगली तयारी करून आपल्या अभ्यासात प्रगती करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष