शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 11 जुलै ते 17 जुलै 2021, 'या' राशीच्या व्यक्तींना मोठा फायदा होणार; आनंदाची बातमी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:17 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी ख़ुशी प्रदान करणारा आहे. आपणास आपल्या माते कडून काही फायदा होईल. ती आपल्या नांवे एखादे इच्छापत्र किंवा संपत्ती करण्याची शक्यता असून त्यामुळे आपणास खूपच आनंद होईल. आपल्या संपत्तीमुळे कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. कष्ट वाढविल्यास आपली प्रशंसा सुद्धा होईल. व्यापारीवर्गास अनेक मार्गाने धन प्राप्ती संभवते. ह्या आठवड्यात आपण एखादा संस्मरणीय प्रवास कराल ज्यात आपणास मोठा लाभ सुद्धा होईल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या प्रियव्यक्तीस कोणत्याही प्रकारे राग येणार नाही ह्याची खबरदारी आपणास घ्यावी लागेल. विवाहितांना आपल्या जोडीदारास खुश ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्यासाठी समतोल आहार घेणे हितावह होईल.
2 / 12
हा आठवडा आपणास काही नवीन समस्यांवर विचार करण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. आपणास कौटुंबिक समस्या समजून घ्याव्या लागतील व त्यात हस्तक्षेप सुद्धा करावा लागेल. कुटुंबातील लहान व्यक्तींना आपली गरज भासेल व त्यासाठी आपणास पुढाकार घ्यावा लागेल. ह्या आठवड्यात आपल्या मित्रांना भेटून त्यांच्यासह हसत - खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. व्यापाऱ्यांना चातुर्यपूर्वक व सावध राहून मार्गक्रमण करावे लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून ते आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ लागतील. वैवाहिक जीवनातील तणाव कमी झाल्याने आपले नाते दृढ होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या मनोरंजनात्मक प्रवासास जाऊ शकाल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी आहाराच्या अतिरेकामुळे काही समस्या निर्माण होऊ शकते.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या संततीशी संबंधित विचारात मग्न असाल. मात्र काळजी करण्या सारखे काही नाही. आठवड्याच्या मध्यास आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता असून त्यासाठी आपणास पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले आहेत. प्रणयी जीवनात सर्जनशीलता दाखविण्याची संधी मिळेल, व त्याने आपली प्रियव्यक्ती प्रभावित सुद्धा होईल. वैवाहिक जीवनात आपल्या खेळकरपणाचा प्रभाव दिसून येईल व त्यामुळे जोडीदार आपल्या सहवासास प्राधान्य देईल. असे झाल्याने आपल्या नात्यातील दुरावा दूर होऊन जवळीक वाढेल. नोकरीत निष्कारण आपला मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न न करता आपले काम चोखपणे करावे. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला फायदा होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.
4 / 12
आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःला संतुष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. आपणास एखादी कौटुंबिक जवाबदारी उचलावी लागण्याची शक्यता आहे. खरे प्रेम मिळविण्याची आपली इच्छा प्रबळ होऊन जीवनातील विविध क्षेत्रात आपणास त्याची जाणीव होईल. आठवड्याच्या मध्यास आपणास डोकेदुखी, चक्कर येणे किंवा अनिद्रेचा त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आवश्यक तितकी विश्रांती घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. भावी कार्यासाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपल्या कामाचे योग्य असे नियोजन करावे. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या कौशल्याच्या व विवेकाच्या जोरावर वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळू शकते. विदेश किंवा दूरवरच्या स्थानांशी संबंधित गोष्टीत तेजी येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आघाडीवर आपल्या भाषाशैलीची प्रशंसा केली जाईल. रचनात्मक गोष्टींमुळे आपणास उत्तम परिणाम मिळविण्यात मदत होऊ शकेल. ह्या आठवड्यात एखादी लहान - सहान आरोग्य विषयक समस्या उग्र रूप धारण करण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी प्रामुख्याने घ्यावी लागेल.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात व मानसिक तणावात वाढ होईल. ह्या दरम्यान आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. अशा परिस्थितीत सुद्धा आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी आपण योग्य व्यायाम किंवा योगाभ्यास सुद्धा करू शकाल. वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. आपणास आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. जोडीदारा कडून प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेमीजनांना मात्र ह्या आठवड्यात सावधपणे वाटचाल करावी लागेल. आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कामा निमित्त प्रवास करावे लागू शकतात. ज्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे, अशा जातकांना कामाच्या बाबतीत नवीन रूपरेखा तयार कराव्या लागू शकतात. सरकारी कराशी संबंधित एखादा वाद होऊ शकतो.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण प्रामुख्याने आपल्या कुटुंबाचा विचार करून कुटुंबियांच्या सहवासात जास्त वेळ घालवाल. घरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन भविष्याचा विचार कराल. ह्या आठवड्यात आपली नोकरीतील कामगिरी चांगली होईल. आपण आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व दूरदर्शीपणाच्या जोरावर आपल्या कामात प्रगती साधू शकाल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीवर खुश होतील. शासनाकडून आपणास एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात व्यापारीवर्गास चांगला लाभ होण्याची संभावना आहे. त्यांनी सरकारी क्षेत्राच्या सहकार्याने काम केल्यास अधिक लाभ होऊ शकेल. वैवाहिक जीवनातील तणाव दूर झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या व्यक्ती आपणास उपयोगी पडणार असल्याने त्यांच्याशी चांगले वागण्याची खबरदारी घ्यावी. ह्याचा प्रभाव आपल्या कौटुंबिक जीवनावर सुद्धा होईल व त्याचा कुटुंबातील सर्वाना चांगला अनुभव येईल. वैवाहिक जीवनात काही ताण वाढण्याची शक्यता आहे. आपण जर आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या भागीदारीत एखादा व्यापार करत असाल तर हा आठवडा व्यापारात प्रगती घडवून आणेल. प्रेमीजनांना विवाहा संबंधी चांगली बातमी मिळू शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला असून त्यांना चांगला परिणाम मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण आपल्या कामात तरबेज व्हाल. ह्या आठवड्यात आपल्या वडिलांचा एखादा सामाजिक सन्मान होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या काही योजना फलद्रुप होतील व त्यातून आपणास चांगला आर्थिक लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्राप्तीत वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. आपण आपले मित्र किंवा कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊन एकदम ताजे तवाने व्हाल. ह्या आठवड्यात आपण नोकरीकडे विशेष लक्ष देणार नाही. ह्या उलट बाहेरील गोष्टीत अधिक व्यस्त राहाल. हा आठवडा व्यापारीवर्गासाठी चांगला आहे. आपणास आपल्या कष्टाची चांगली फले मिळतील. आपण कामा निमित्त प्रवास सुद्धा कराल, त्यातून आपणास मोठा फायदा सुद्धा होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनात काही नवीन गोष्टी समजतील व त्यामुळे आपल्या प्रियव्यक्ती बद्धल आपला आदर वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. आपणास सासुरवाडी कडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस वाहन चालवताना काळजी घ्यावी, तसेच आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या जातकांची कामात प्रगती होईल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या व्यापारी योजना अंमलात आणण्यात आपण यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. आपण आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. आपल्या वैवाहिक जीवनात ज्या समस्या होत्या त्या आता दूर होऊन परिस्थिती निवळू लागेल. आपल्या खर्चात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता असल्याने त्यावर लक्ष ठेवावे.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या व्यवसायास गती प्राप्त होईल व अनेक ठिकाणाहून चांगला फायदा झाल्याने आपल्या मनास आनंद होईल. आपण दूरवरचे किंवा परराज्याचे प्रवास सुद्धा करू शकाल, त्यामुळे आपणास काही फायदा होईल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतील, व त्यामुळे त्यांच्या नात्यात नावीन्य निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. प्राप्ती चांगली होईल. आरोग्य उत्तम राहील. विरोधकांशी सामना करावा लागला तरी आपणास त्याचा त्रास होणार नाही. आपण विरोधकांवर मात करू शकाल. आपणास नशिबाची साथ मिळेल. अधिक कष्ट फलदायी होतील. प्रणयी जीवन सामान्यच असेल. आपली प्रिय व्यक्ती मोकळेपणाने आपले प्रेम व्यक्त करेल. आठवड्याच्या अखेरीस एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास संभवतो.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये, तसेच कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. ह्या आठवड्यात केलेली आर्थिक गुंतवणूक आपल्यासाठी त्रासदायी ठरण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारे मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. तसेच कोणालाही उसने पैसे देऊ नये. आपले विरोधक आपल्या विरोधात काही कट रचू नयेत म्हणून आपणास आपल्या विरोधकांवर करडी नजर ठेवावी लागेल. प्रकृतीत काही चढ - उतार येतील. समतोल आहाराच्या अभावामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील, मात्र कामाच्या ठिकाणी महिला वर्गाशी वाद घालू नका. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या कारकिर्दीवर होऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. सावध राहून आपणास वाटचाल करावी लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांना आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी मिळेल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपले नाते संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीस खुश करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या प्रिय व्यक्तीस एखादी चांगली भेटवस्तू द्याल. दूरवर फिरावयास जाऊन आल्याने आपले प्रणयी जीवन अधिक समृद्ध होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपला जोडीदार कुटुंबीयांप्रती आपली जवाबदारी समजून घेऊन त्या पार पाडण्याचे प्रयत्न करेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. शासनाकडून सुद्धा काही फायदा होऊ मिळू शकतो. व्यापारी वर्गास हा आठवडा प्रगतिकारक आहे. प्रवासासाठी आठवड्याचे सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात काही नवीन ओळखी होतील. व्यापारात फायदा होऊन आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. आपण एखाद्या धार्मिक कार्यांसाठी खर्च कराल. प्रकृती नाजूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर लक्ष द्यावे लागेल. आपला एखादा मित्र अध्ययनात अडथळा आणण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष