शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2021; 'या' राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून राहा सावध, कृतीवर ठेवा नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:17 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. ह्या आठवड्यात आपण हिंडण्या - फिरण्याचा भरपूर आनंद घ्याल. प्रवास खूप होतील. आपल्या व्यापारात सुद्धा नवीन विचारांचे दर्शन होईल. आपण इतरांच्या भल्यासाठी असणाऱ्या कामात सुद्धा पुढाकार घ्याल. त्यामुळे लोकात आपली प्रतिमा उजळून उठेल. एखाद्या छोट्याशा गोष्टीने सुद्धा दोघात कटुता येण्याची शक्यता असल्याने प्रेमीजनांना ह्या आठवड्यात खूप विचारपूर्वक संवाद साधावा लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम भावना उफाळून येईल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती खालावल्याने आपल्यावर मानसिक दडपण येईल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी आपण करत असलेले काम आपल्या योग्य नसून आपण दुसरे काही तरी करावे असे आपणास सतत वाटत राहील, तेव्हा आपण करत असलेले काम लक्षपूर्वक करावे. हि परिस्थिती आपणास त्रासदायी होऊ शकते, तेव्हा त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
2 / 12
हा आठवडा आपणास आव्हानात्मक असल्याचे वाटून आपण मानसिक दृष्ट्या चिंताग्रस्त व्हाल. ह्यातून बाहेर पडण्यास आपल्याला थोडा अवधी लागेल. ह्यामुळे कार्यक्षेत्रात थोडा विलंब होईल. आपण ह्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात घाई केल्याने त्यात चुका होण्याच्या शक्यतेमुळे आपली कामे लक्षपूर्वक करावी लागतील. आपल्या कामावर वरिष्ठांचे लक्ष असेल. विद्यार्थ्यांनी आपली एकाग्रता टिकवून ठेवल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून त्यांना प्रेमालापाची संधी मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात घालवता येतील. वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदाचा वर्षाव झाल्याने आपण आव्हानांचा सामना उत्तम प्रकारे करू शकाल. विवाहितांसाठी आठवड्याची अखेर खूपच चांगली होईल.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी आशादायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीच्या बाबतीत एखादा नवीन सौदा करू शकाल. त्यातून आपणास चांगला लाभ होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च सामान्यच असतील. कुटुंबात गरजेनुसार एखाद्या नवीन उपकरणाची खरेदी करू शकाल. ह्या आठवड्यात कुटुंबियांसह एखादा विनोदी विडिओ बघून वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. नोकरी करणारे जातक आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. हाच आनंद त्यांना प्रगती करण्यास प्रेरित करेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. प्रणयी जीवनात शांतता व समजूतदारपणा दिसून येईल. आपली प्रिय व्यक्ती आपणास उंची वस्त्रे किंवा अलंकार भेट देण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा चांगलेच असेल. कौटुंबिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. हा आठवडा घरातील लहान व्यक्तींसाठी चांगला असून ते आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकतील. शिक्षणात येणारे अडथळे दूर होऊन आपणास चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
4 / 12
आठवड्याच्या सुरवातीस आपण कारकीर्दीस प्राधान्य दिल्यामुळे आपल्या कुटुंबियांना व प्रियव्यक्तीस आवश्यक प्रमाणात वेळ देऊ शकणार नाही, व त्यामुळे आपल्या प्रति त्यांच्यात असंतोष निर्माण झाल्याचे आपणास जाणवेल. आठवड्याच्या सुरवातीस आपणास नात्यातील दुरावा वाढल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबीय व प्रियजनां प्रति पुन्हा आपला कल झाल्याची जाणीव आपणास होईल. जे आपणास सदैव मदत करण्यास तयार असतात त्यांना मदत करण्यास आपण नेहमीच तत्पर असाल. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्रकृतीत चढ - उतार संभवतात. ह्या दरम्यान आपणास काही शारीरिक व मानसिक ताणास सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने आपल्याला आपल्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपल्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसून येईल. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास एखादा चांगला साथीदार मिळाल्याने आपणास सुरक्षितता व आनंद जाणवेल. ह्या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. असे असले तरी कोणाला उसने पैसे देऊ नये.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास कराल. ह्या प्रवासात काही नवीन मित्र भेटण्याची शक्यता असून त्यांच्याशी भविष्यात जिवाभावाचे संबंध निर्माण होऊ शकतील. कुटुंबातील लहानग्यां कडून प्रेम व स्नेह प्राप्त होईल. कुटुंबियांचे सहकार्य आपणास उपयुक्त होईल. वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण स्वतः घरगुती उपचार करू इच्छित असाल, परंतु तसे करण्या पासून आपणास दूर राहावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यापारास मोठा फायदा होऊ शकेल अशी एखादी नवीन पद्धत आपण आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर शोधून काढाल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास कामात दृढपणे कष्ट करावे लागतील. ह्या आठवड्यात रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. कुटुंबात एखादा समारंभ होण्याची शक्यता आहे.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मात्र आठवड्याची सुरवात काहीशी नाजूक असेल. एखाद्या गोष्टीमुळे आपण चिंताग्रत व्हाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. विरोधक आपणास त्रास देतील. खर्चात अचानकपणे वाढ झाल्याने आपण त्रस्त व्हाल. प्राप्ती कमी होईल. ह्या सर्व चिंता आपल्या प्रकृतीवर विपरीत परिणाम करण्याची शक्यता आहे. प्रकृती नाजूक राहिली तरी नशिबाची साथ मिळाल्याने कोणी ना कोणी आपल्या मदतीस धावून येईल. वैवाहिक जीवन समृद्ध राहील. वैवाहिक जोडीदार सुद्धा आपणास सहकार्य करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. कुटुंबीयांचा आपणास पाठिंबा मिळाल्याने आपल्या प्रेम बंधनास पुढे नेण्यासाठी आपल्याला प्रेरित करेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात काही समस्यांना आपणास एकट्यानेच सामोरे जावे लागणार असल्याने आपल्याला आपला आत्मविश्वास जागृत करावा लागेल. ह्या समस्या मोठ्या नसल्या तरी आपणास हिंमत दाखवावी लागेल. नोकरीत आपल्यावर एखादा खोटा आळ येण्याच्या शक्यतेमुळे आपणास सावध राहावे लागेल. खर्चात अनपेक्षितपणे वाढ होण्याच्या शक्यतेमुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल, परंतु आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्यास आपली अनियमित असलेली दिनचर्या कारणीभूत असेल. आंतरिक संबंधात वृद्धी झाल्याने वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी महत्वाचा आहे. आपण एखाद्या अन्य व्यक्तीच्या मदतीने आपले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न कराल.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपल्या चुका शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या उपक्रमांवर लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे जीवनात चांगली फल प्राप्ती होईल. खर्चात वाढ झाली तरी वेळेनुसार त्यात कपात सुद्धा होईल. प्राप्ती चांगली होईल. आपणास कामाचा लाभ होईल. मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. आपल्या कष्टांचे चीज होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुगीचे दिवस आल्याची अनुभूती येईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जोडीदारामुळे काही फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या योजना फलद्रुप होतील. त्यांची अंमल बजावणी केल्याने आपली प्राप्ती वाढेल. खर्चात कपात होईल. हि बाब आपणास दिलासा देण्यास कारणीभूत होईल. कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या जातकांची बदली संभवते. बदली होणाऱ्या ठिकाणी रुळण्यात आपणास काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांच्या व्यापारास गती येऊन त्यांचा व्यापारात जम बसेल. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण वैवाहिक जोडीदारासह फिरावयास जाऊ शकाल. मात्र एखाद्या कटू शब्दाने आपली प्रिय व्यक्ती नाराज होण्याची शक्यता असल्याने प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनात थोडी काळजी घ्यावी लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती सामान्य राहील. आठवड्याचे शेवटचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
देशाच्या स्वातंत्र्य दिवसा पासून सुरु होणारा हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाल्याने आपण सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. नोकरी करणारे जातक आपल्या कामावर लक्ष देऊन एका जवाबदार नागरिका प्रमाणे आपले काम करतील. आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. ज्या व्यक्तीआपल्या प्रति आकर्षित होतील त्यांचा आपल्या भोवती गराडा पडेल. वैवाहिक जीवनात काही वैचारिक मतभेद संभवतात, परंतु आपसात संवाद साधून समस्येचे निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रेमीजनांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्यात काही समस्या असल्यास एकत्रितपणे संवाद साधून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा करावा. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास केलेले प्रवास फलद्रुप होतील.
11 / 12
देशाच्या स्वातंत्र्य दिवसा पासून सुरु होणारा हा आठवडा आपणास अनेक बाबतीत स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने आपण आपले निर्णय स्वतःच घ्याल. त्याचा परिणाम आपल्या जीवनातील विविध क्षेत्रावर होईल. नोकरीत आपली स्थिती मजबूत होईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. आपल्या कामाची प्रशंसा होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या निर्देशानुसार काम करून आपल्या कामास प्रगती पथावर नेऊ शकतील. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. आपल्या आंतरिक संबंधात वृद्धी होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन समृद्ध होईल. प्रेमीजनांनी आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी सुद्धा घालू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. मानसिक चिंता दूर करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःवर विश्वास ठेवावा. असे केल्यानेच आपणास कामात यश प्राप्त होईल व त्यातच आपला विजय असेल. स्वतःवर विश्वास असणे हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे लक्षात ठेवावे. प्राप्तीत वाढ होईल. ह्या आठवड्यात विनाकारण काही प्रवास करावे लागतील व त्यामुळे आपला तणाव वाढेल. प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा आपल्यातील कौशल्य दाखविण्याचा आहे. त्याने आपली ओळख निर्माण होऊन आपले वरिष्ठ सुद्धा प्रभावित होतील. व्यापाऱ्यांना आपली कामे काळजीपूर्वक करावी लागतील. आपल्या काही चुकीच्या निर्णयामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. महिलांशी केलेला चांगला व्यवहार आपणास यश मिळवून देईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीची वृत्ती काहीशी क्रोधाची झाल्यामुळे प्रेमीजनांना ह्या आठवड्यात थोडे काळजीपूर्वक राहावे लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीचा मिजास बघूनच तिच्याशी / त्याच्याशी संवाद साधून नाते दृढ करण्याचा प्रयत्न करावा. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाच्या वर्षावाने भरलेले असेल. असे असले तरी लहान - सहान वाद संभवतात. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष