Weekly Horoscope 18 April to 24 April 2021
आठवड्याचे राशीभविष्य : 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2021; "या" राशीच्या लोकांना व्यापारात लाभ आणि मिळकतीत वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:52 AM1 / 12हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीसच आपण एखादा प्रवास कराल. आपल्या मित्रांसह मौज - मजा करण्याची संधी मिळाल्याने आपले सर्व ताण दूर होतील. एखाद्या प्रॉपर्टीत आपले मन गुंतू शकते. प्रणयी जीवन आनंदी होईल. आपले प्रणयी जीवन योग्य दिशेने प्रगती साधेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल. आपणास चांगली प्राप्ती होईल. कौटुंबिक वातावरण आपणास अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल व त्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होईल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. आपला एखादा जुना आजार दूर झाल्याने आपणास काहीसा दिलासा मिळेल. आपली परोपकारी वृत्ती वृद्धिंगत होईल. धार्मिक कार्यात सुद्धा सहभागी व्हाल.2 / 12आठवड्यात आपल्या हातून पूर्वी झालेल्या चुकांचा आपणास पश्चाताप होईल. त्यामुळे आपले जे मित्र आपल्या पासून दुरावले होते त्यांच्याशी पुनर्मिलन होण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपणास मोठा धनलाभ झाल्याने बँकेतील गंगाजळी वाढविण्यात आपण यशस्वी व्हाल. परदेश प्रवास करण्याची संधी प्रबळ होऊन काही जणांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाता येऊ शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम असून काही जणांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळू शकेल. प्रणयी जीवनात काही अडचणी येतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. आपल्या ज्ञान क्षमतेच्या जोरावर स्वतःचे काम करण्यास त्यांना यश प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यास एखादा प्रवास संभवतो.3 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास चांगली प्राप्ती होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. असे असले तरी काही कारणाने आपल्या मनाचा गोंधळ उडालेला असेल. एखाद्या गोष्टीसाठी आपण उतावीळ होण्याची शक्यता आहे. हाच उतावीळपणा आपल्यासाठी त्रासदायी ठरेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे, ज्यात पोट दुखी किंवा तापाची संभावना अधिक असेल. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ नये म्हणून आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असला तरी आपण एकापेक्षा अधिक व्यक्तींकडे आकर्षित होण्याच्या शक्यतेमुळे प्रणयी जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांचे स्थान परिवर्तन होण्याची शक्यता असून ह्या बदलामुळे त्यांचा फायदा सुद्धा होणार आहे. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल व व्यापार वृद्धी सुद्धा होईल. आपल्या काही इच्छा पूर्ण होतील. आपला अडकलेला पैसा सुद्धा आपणास परत मिळेल.4 / 12आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःवर अधिक लक्ष द्याल. आपली हौस भागविण्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. असे असले तरी आपण आपल्या व्यावसायिक जीवनावर सुद्धा आवश्यक तेवढे लक्ष देऊ शकाल.ह्या दरम्यान आपण आपल्या व्यावसायिक जीवनात आपल्या कामांना शिस्तबद्ध व योजनाबद्ध पद्धतीने वेळेवर पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस आपली वाणी व संवादशैलीचा चांगला प्रभाव दिसून येईल. ह्या आठवड्यातील अनुकूल ग्रहमान आपणास कोणतेही कार्य पूर्ण करण्याची क्षमता व योग्य मार्ग प्रदान करू शकेल. आठवड्याच्या अखेरीस आपण एखादी दीर्घकालीन गुंतवणूक करू शकाल. ह्या दरम्यान आपणास आणखी काही सकारात्मक संधी मिळण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थी आपला पूर्ण वेळ अध्ययनासाठी देऊ शकले तरी एखादा विषय त्यांना समजण्यास अवघड होऊ शकतो. नाते संबंधांच्या बाबतीत आपणास ह्या आठवड्यात सामान्य फलेच मिळतील. आठवड्याचे मधले दिवस आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपणास भोजनाचा अतिरेक व अधिक कष्ट ह्या पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दरम्यान मानसिक व शारीरिक प्रवृत्तींमुळे रक्तदाबाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.5 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होईल. तसेच एखाद्या स्थावर संपत्तीची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. कुटुंबियांमुळे आपल्या प्राप्तीतील वाढीचा फायदा आपणास मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल असून आपली कामे जोमाने करून ते यश प्राप्त करतील. व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या व्यापारात सकारात्मक परिणाम मिळतील. व्यापार वृद्धी होईल. मात्र त्यासाठी आपणास प्रवास व कठोर परिश्रम करावे लागतील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा व आपुलकी असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवनात आपल्या प्रियव्यक्तीची थोडी नाराजी सहन करावी लागेल. मात्र त्यात लटका राग अधिक असल्याने प्रणयी जीवन सुखावहच होईल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.6 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण आत्मविश्वासाने कामे केल्याने आपली कामगिरी उत्तम होईल. आपण मन लावून व पूर्ण शक्तीने कामे कराल व त्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात ताण - तणाव कमी होऊन सुख - शांती ह्यांची वाढ होईल. आपण एखाद्या तीर्थयात्रेस जाण्याचे आयोजन करू शकाल. आपल्या विचारात परिवर्तन होऊ शकेल अशा काही घटना आपल्या कौटुंबिक जीवनात घडतील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगलाच आहे. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने रुचकर भोजनाचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सासुरवाडी कडील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरल्याने त्यात सहभागी होण्याची आपणास संधी मिळेल.7 / 12हा आठवडा आपल्यासाठी आशास्पद फले देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखादी संपत्ती खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. हि संपत्ती आपल्या मूळ ठिकाणा पासून दूरवरच्या अंतरावर असली तरी खूप दिवसांपासून आपण त्याच्या प्रतीक्षेत असाल. ह्याच्या सौद्याने आपण आनंदित व्हाल व त्यामुळे आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल. आपण बांधकामातून मोठा फायदा मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात खूप चांगला अनुभव येईल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांना आपल्या नात्याची खोलवर ओळख होईल व हे नाते स्वीकारल्या बद्धल त्यांना स्वतःचा अभिमान वाटेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. आपण आपली सर्व कामे जोमाने कराल.8 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या दरम्यान आपणास धनहानी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत अनुकूल बदल होऊन आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाल व त्यात आपणास धनलाभ सुद्धा होईल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण आपल्या कामात प्रभुत्व प्राप्त करू शकाल. आज पर्यंत ज्या समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात यशस्वी व्हाल. आपली प्रकृती नाजूक होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनाचा आनंद घेऊ शकाल. प्रेमीजनांना आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपल्या प्रियव्यक्तीशी विवाह बंधनात अडकण्यासाठी आपल्या कुटुंबियांना तिची ओळख करून द्यावी लागेल. हा आठवडा प्रवासासाठी मध्यम फलदायी आहे.9 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापारासाठी जे कष्ट कराल त्याचे यथोचित परिणाम आपणास पाहावयास मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण ज्यांच्या समोर व्यापाराचा प्रस्ताव ठेवाल त्यांना तो स्वीकार्य होईल. त्यामुळे आपणास आनंदाची पुनर्प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना मात्र नोकरीच्या ठिकाणी थोडी निराशा पदरी पडेल. त्यामुळे ते नोकरीत बदल करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा व एकमेकांप्रती प्रेम वाढेल. जोडीदाराशी असलेल्या संबंधात सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. प्रेम व जवळीक वाढेल. आपली प्रियव्यक्ती आपल्याकडे एखाद्या वस्तूची मागणी करेल व आपण ती पूर्ण सुद्धा कराल. आपल्या नात्यात गोडवा राहील. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.10 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या समोर काही आव्हाने येतील त्यांच्यावर लक्ष द्यावे लागेल, परंतु जस जसे दिवस जातील तस तसे आपण आव्हानांवर मात करू शकाल. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात वाढ होईल. काही विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण त्यांच्यावर मात करू शकाल. कौटुंबिक वातावरणात सुख - शांती नांदेल. कुटुंबाच्या हिताचे काही मोठे निर्णय आपण घ्याल. काही नवीन वस्तूंची खरेदी करून घराचे सुशोभीकरण कराल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण कशाचा तरी गंभीरपणे विचार कराल. काही दीर्घ कालावधीसाठीचे निर्णय घ्याल. आपला दूरदृष्टीपणा वाढेल. व्यापारास गती येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामा पासून काही फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंददायी होईल. प्रणयी जीवनात मात्र काही अडथळे येऊ शकतात. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल नाही.11 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपणास स्थावर संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळू शकते. त्यातून आपला फायदाच होईल. ह्या दरम्यान आपल्या योजना यशस्वी होतील. त्यांच्या यशस्वीतेमुळे आपले आत्मबल वाढेल. मन हर्षित होईल. आरोग्य उत्तम राहिल्याने कामे यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. आपल्या नोकरीत एखादी समस्या निर्माण होऊ शकते, परंतु त्याच बरोबर दुसऱ्या नोकरीची ऑफर सुद्धा आपल्या हाती लागू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा वृद्धी कारक असून आपणास आपल्या व्यापारात यश प्राप्त होईल. आपणास आपल्या मित्रांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या सहवासात मौज - मजा करण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. विवाहितांच्या जीवनात जवळीक वाढेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे.12 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल. मात्र, आठवड्याच्या अखेरीस परिस्थितीत अनुकूल बदल होईल. आपण चिंतामुक्त व्हाल. आपल्या वाक्चातुर्याने आपण सर्वांच्या पुढे जाल. आपल्या हजर जवाबीपणामुळे आपली बरीचशी कामे होतील. मात्र अशावेळी ज्या गोष्टी बोलण्या योग्य नसतील त्या सुद्धा आपण बोलण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आपणास भोगावयास लागू शकतो. प्राप्तीत खूप मोठी वाढ होईल. कौटुंबिक व्यवसायात यश प्राप्त होईल. कुटुंबाच्या मान - सन्मानात वाढ होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस एखादा मोठा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. मित्रां पासून फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवन सुद्धा आनंददायी होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications