शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2021; 'या' राशीची नोकरीत प्रगती होणार, समाजात प्रतिष्ठा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:14 AM

1 / 12
हा आठवडा आपल्या आशा पल्लवित करणारा आहे. आपला अडकलेला पैसा मिळाल्याने आपणास शांतता लाभेल. आपला व्यापार चांगला चालून अनेक ठिकाणांहून आपणास नवीन व्यावसायिक प्रस्ताव प्राप्त होऊ शकतील. हा आठवडा लक्ष देण्याचा आहे. शेअर्स बाजार किंवा सट्टाबाजीत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी खूप विचार करावा लागेल. नोकरीत आपण कष्ट करतच राहाल व त्यामुळे कामाच्या प्रति आपल्या आशा वाढतील. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्ती समोर विवाहाचा प्रस्ताव यशस्वीपणे मांडू शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या तापटपणामुळे काही आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
2 / 12
ह्या आठवड्यात आपणास खूप सावध राहावे लागेल. हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण काहीसे चिंताग्रस्त राहाल. त्यात भर म्हणून आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या नाजूक प्रकृतीमुळे आपण आणखीनच त्रस्त व्हाल. ह्यामुळे काही कामात आपला खोळंबा सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या कामावर लक्ष ठेवून कामातील निरंतरता कायम ठेवावी. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना काही लाभ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण आपल्या प्रिय व्यक्ती समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकाल. कुटुंबियांच्या सहकार्याने हा विवाह शक्य होईल. व्यापारात आपण ज्यांच्या बरोबर व्यापार करत आहात त्यांच्या कडून आपल्यावर खोटा आळ घेतला जाऊ नये म्हणून आपणास त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपले आरोग्य नाजूक राहण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्यावर लक्ष ठेवावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात खूपच चांगली होईल. प्रवास केल्याने आपणास चांगला लाभ होईल. ह्या दरम्यान आपण काही चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. आपण धार्मिक कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. इतरांचे भले व देव पूजा करण्यासाठी आपण भरपूर वेळ द्याल. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी घालू शकतील. काही लहान - सहान समस्या आल्या तरी आपला प्रस्ताव स्वीकार्य होऊ शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. आपण एक चांगली व्यक्ती असून आपले आपल्या जोडीदारावर खूप प्रेम असल्याची जाणीव आपल्या वैवाहिक जोडीदारास होईल.व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक आहे. सरकारी नीती आपणास आपल्या कामात बदल करण्यास भाग पाडेल. नोकरी करणाऱ्या जातकांच्या कामाची प्रशंसा होणार असल्याने त्यांनी काळजी करण्या सारखे काही नाही. नोकरीतील आपली स्थिती मजबूत होऊ लागेल. ह्या आठवड्यात बँकेचे कर्ज फेडण्यात आपण यशस्वी झाल्यामुळे आपणास मोठा दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काही अंशी प्रतिकूल आहे.
4 / 12
आठवड्याच्या सुरवातीस आपण व्यावसायिक बाबींवर चांगले लक्ष देऊ शकाल. विशेषतः नोकरी करणारे जातक आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून वाटचाल करण्यात यशस्वी होतील. ह्या दरम्यान शासकीय कार्यात यश प्राप्तीची संभावना आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंत आपण सकारात्मक विचाराने वाटचाल करून नवीन लक्ष्यांक निर्धारित करू शकाल. आठवड्याच्या मध्या नंतर कोणताही निर्णय घाईघाईत घेतल्यास आपले नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे निर्णय घेण्याची घाई करू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास एकटेपणा व असहाय्याची जाणीव होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो. ह्या दरम्यान पाठ, छाती, नाक, घसा ह्यांच्यासह शरीराच्या संवेदनशील अवयवांवर अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या मध्यास नाते संबंधात सुधारणा होण्याची संभावना आहे. असे असले तरी आठवड्याच्या अखेरीस आपल्या संबंधात पुन्हा बिघाड होण्याची शक्यता सुद्धा आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावरच असेल. नोकरीत मन लावून कामे कराल, परंतु आपण अनेकदा कष्ट करण्या ऐवजी बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करण्यास आपले प्राधान्य असेल. आपल्या हा संवयीमुळे आपण समस्यांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपणास वरिष्ठांकडून प्रशंसित केले जाईल, मात्र आठवड्याचा शेवट आपल्यासाठी विशेष चांगला नाही. ह्या दरम्यान आपल्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा आपणास वैवाहिक जीवनातील काही नवीन गोष्टी शिकवणारा आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराल व त्यामुळे आपल्यातील जवळीक वाढेल. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. कुटुंबातील काही समस्या संपुष्टात येतील, मात्र कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे मानहानी होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रवासासाठी विशेष अनुकूल नाही.
6 / 12
ह्या आठवड्यात आपल्यात एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास संचारेल व त्यामुळे मोठमोठी कामे सुद्धा आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. त्यामुळे आपणास नोकरीत सुद्धा चांगले परिणाम प्राप्त होतील व आपण जर व्यापार करत असाल तर त्यात सुद्धा यशस्वी व्हाल. आपणास आपल्या कुवतीनुसार नवीन संपर्कांचा लाभ होईल. कौटुंबिक जीवन प्रेमाने व स्नेहाने परिपूर्ण असेल. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात सुद्धा वाढ होईल. धार्मिक कार्यात आपण अधिक प्रमाणात सहभागी होऊन त्यासाठी सढळ हस्ते खर्च सुद्धा कराल. त्यामुळे ज्या सामाजिक कार्यात आपली सक्रियता अधिक असेल तेथे खर्चात झालेल्या वाढीने आपण चिंतीत व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन खुलून उठेल. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीची विवाहासाठी समजूत काढण्यात यशस्वी होतील. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अनेक बाबतीत चांगला आहे. आठवड्याची सुरवात मानसिक दृष्ट्या काहीशी नाजूकच असेल. आपणास धनलाभ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण नोकरीत मन लावून काम कराल व त्यामुळे चांगल्या कर्मचारी वर्गात आपली गणना होऊ शकेल. आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकां बरोबर आपला स्नेह वाढेल व आपण त्यांच्यासह एखाद्या मेजवानीचे आयोजन सुद्धा करू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या व्यापारास नवीन पद्धतीने प्रगती पथावर न्याल. एखाद्या व्यक्तीशी कार्यालयात बराच वेळ गंभीरपणे विचार - विनिमय कराल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आठवड्याच्या मध्यास दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी मिळेल.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठ्वड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापाराच्या बाबतीत खूप डोकेफोड करून एखाद्या मोठ्या निर्णयाप्रत याल. सरकार कडून काही लाभ संभवतो, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामावर आपणास स्वतःला पूर्ण विश्वास असल्याने आपण त्यास न्याय देऊ शकाल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आरोग्य काहीसे नाजूक होण्याची शक्यता असल्याने त्याकडे लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात चढ - उताराची स्थिती राहून तणाव वाढणार असल्याने वैवाहिक जोडीदाराशी प्रेमाने वागावे. हा आठवडा प्रेमीजनांना आनंदित करणारा आहे. आपणास आपल्या प्रिय व्यक्तीस मनातील भावना मोकळेपणाने सांगाव्या लागतील. असे केल्याने त्यांना आपल्या भावना समजू शकतील. त्यांना आपली किंमत समजेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपल्या वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या व्यतिरिक्त प्रवास सुद्धा टाळावे लागतील. असे केल्याने आपल्या खर्चात कपात होऊन मानसिक तणाव सुद्धा कमी होईल. प्रकृतीत थोडी सुधारणा होईल. आपण आपली दिनचर्या नियमित करण्याचा प्रयत्न कराल. पूजा - अर्चा करण्यात मन रमेल. कामात चांगले परिणाम मिळतील. प्राप्ती सामान्यच राहील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक आहे. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. नात्यातील तणाव संपुष्टात येईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील व आपला पाठयक्रम वेळेपूर्वीच पूर्ण करू शकतील. असे झाल्याने आपल्या सहाध्यायींहून पुढे जाण्याची त्यांना संधी मिळेल. प्रतिस्पर्धेत आपण यशस्वी व्हाल. मनात समाधानाची भावना राहील. कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात चांगले परिणाम मिळतील. परंतु आपण लोकांच्या मनात निष्कारण भीती निर्माण करू शकाल. आपणास त्याचा काहीच फायदा होणार नाही. मात्र आपली प्रतिमा बिघडण्याची शक्यता असल्याने तसे करण्या पासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल. मिनरल, गॅस, लेबर, सेवा संस्था ह्यांच्याशी संबंधित लोकांना खूप मोठा लाभ होईल. प्रेमीजनांना काही लोकांच्या नाराजीस सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत आपण ठामपणे उभे राहिल्यास नात्यात दृढपणा येईल. हा आठवडा विवाहितांसाठी अत्यंत सुखद आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण नेहमीच आपल्या कामात व्यस्त राहात असल्याने व आपल्या जवाबदाऱ्या पूर्ण करण्यात काहीवेळा मागे राहात असल्याने आपणास कुटुंबियांसह वेळ घालविण्याची आवश्यकता भासेल. ह्या आठवड्यात आपणास जवाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळेल. घरगुती खर्च सुद्धा सढळहस्ते कराल. ह्या व्यतिरिक्त आपणास प्राप्ती सुद्धा चांगलीच होईल. खर्च नियंत्रित राहतील. आपल्या ज्ञानात वाढ होईल. लोक आपली प्रशंसा करतील. त्यांच्या मनात आपल्या प्रति श्रद्धेची भावना निर्माण होईल. आपले मन धार्मिक कामात रमेल. कुटुंबात सुख - शांती नांदेल. नोकरी करणाऱ्या जातकांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आपली पदोन्नती सुद्धा संभवते. आपणास एखादे नवीन व मोठे काम देण्यात आल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापाऱ्यांना आपल्या योजनांचे परीक्षण करून नवीन काहीतरी करावे लागेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात सुखद क्षण अनुभवता येतील. ग्रह कृपेने आपल्या नात्यातील गोडवा वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्यातील आत्मविश्वासाची जाणीव आपणास होईल. त्यामुळे आपल्या व्यवसायात नवीन काही करण्याचा आपण आनंद घेऊ शकाल. व्यापारास गती आल्याने आपल्या प्राप्तीत वाढ होईल. काही फायदेशीर सौदे आपल्या हाती लागतील. ह्या व्यतिरिक्त काही नवीन लोकांच्या साथीने आपली कामे अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या कामावर योग्य लक्ष न दिल्यास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह फिरावयास जाऊ शकतील. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीस मागणी घालू शकतील. त्यामुळे आपण त्यांचे हृदय जिंकून आपले प्रणयी जीवन सुखद करू शकाल. विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनात नवीन काही करण्याची संधी मिळाल्याने ते आपल्या अभ्यासात सर्जनशीलतेने वाटचाल करू शकतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष