शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2021; 'या' राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल; प्रवासाचा उत्तम योग येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:38 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपणास प्रवासामुळे नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळून बराचसा फायदा होईल. हे सर्वजण आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतील, तसेच आपण सुद्धा त्यांच्याशी नवीन मैत्री जोडाल. ह्या आठवड्यातील मध्यास खर्चात वाढ झाल्याने आपल्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम वाढण्याची शक्यता आहे. आपली प्राप्ती चांगली असली तरी खर्चातील वाढीमुळे समस्या निर्माण होऊ शकते. ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनात तिसऱ्या व्यक्तीस देण्यात आलेले अतिरिक्त महत्व प्रेमीजनांसाठी त्रासदायी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. विवाहितांना मात्र आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम व सौख्य मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी त्वचा विकार किंवा तापाची समस्या आपणास त्रास देऊ शकते.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या काही योजना प्रगती पथावर येतील. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे आपल्या कामात प्रगती होण्यास मदतच होईल. त्यामुळे व्यवसायात सुद्धा आपली प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, अशी एखादी नवीन जवाबदारी सोपविली जाऊ शकते. प्रणयी जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. असे असले तरी आपल्या प्रिय व्यक्तीची काही वैयक्तिक जवाबदारी सुद्धा असण्याची शक्यता असल्याने तिला / त्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यावा. हा आठवडा विवाहितांसाठी चांगला आहे. असे असले तरी कौटुंबिक वातावरणात अशांतता असल्याचे दिसून येईल. ह्यासाठी एखाद्या व्यक्तीचा व्यर्थ अभिमान कारणीभूत असेल, जो तणाव वाढविण्याचे कार्य करेल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी आपण संततीच्या बाबतीत चिंतीत राहाल. ह्या आठवड्यात प्रवासा दरम्यान त्रास होण्याची शक्यता असल्याने प्रवास सुरु करण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करून ठेवावी.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपली वाटचाल नवीन विचाराने होईल. ह्या आठवड्यात आपणास मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी सुद्धा मिळेल. ह्या आठवड्यात आपण प्रवास करण्यात व्यस्त राहाल. कुटुंबियांसाठी केलेली नवीन वस्तूंची खरेदी आपणास आनंदित करेल. आपल्या मातेच्या सोयीसाठी आपण एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात प्रगती करू शकाल. विवाहितांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपले कुटुंबीय व सासुरवाडी कडील व्यक्ती ह्यांच्यात सलोखा पाहावयास मिळेल व त्यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यापारी वर्गास त्यांच्या कामाच्या सबलीकरणासाठी सरकारी क्षेत्रा कडून एखादे अनुदान किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी खूपच चांगला आहे. आपण कार्यालयीन कामाचा आनंद घेऊ शकाल. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल.
4 / 12
आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपल्या व्यक्तिगत जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर वैवाहिक जीवनात काही समस्या किंवा असंतोष असेल तर ह्या आठवड्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नात्यात किंवा संबंधात आलेल्या ह्या समस्या आपणास अधीर व आक्रमक बनविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास नात्यातील कटुता सुद्धा झेलावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास गंभीर नेत्र समस्या संभवते. आपल्या आहार विषयक संवयीत बदल करावा तसेच अतिरिक्त भोजन करण्याची आपली प्रवृत्ती सोडून द्यावी. ह्या आठवड्यात हात, पाय, पाठ सहित सर्व अंग दुखण्याची तसेच पोटाला सूज येण्याची समस्या उदभवण्याची शक्यता आहे. आपणास वरिष्ठांशी कोणत्याही विषयावर चर्चा करताना धीर धरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या अखेरीस काही बाबतीत मौन राहणेच अधिक प्रभावी होईल. ह्या आठवड्यात भागीदारी, न्यायालय, कार्यालयीन, सामाजिक व सार्वजनिक जीवनावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आपणास नंतर कोणताही त्रास होऊ नये म्हणून विनाकारण खर्च करण्या पासून आपण दूर राहावे. प्राप्ती सामान्यच राहणार असल्याने कोणतेही मोठे आर्थिक जोखीम घेऊ नये. आपण जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यास प्रतिकूल असल्याने सध्या तो लांबणीवर टाकावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबीय आपल्या आनंदासाठी एखादे मोठे काम करू शकतील. व्यापारात मोठा लाभ संभवतो. नोकरी करणाऱ्या जातकांची सुद्धा कामगिरी उत्तम होईल. आपणास शासना कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्यातील अति आत्मविश्वास आपणास घातक ठरू शकतो, तेव्हा काळजी घ्यावी. आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. आपण धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल.
6 / 12
हा आठवडा मागील आठवड्या पेक्षा खूपच चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आपण स्वतःसाठी काही नवीन वस्त्रांची खरेदी करू शकाल. एखादा नवीन मोबाईल किंवा लॅपटॉप सुद्धा खरेदी करू शकाल. आपल्या सुखसोयीत वाढ कराल. कौटुंबिक वातावरणात सकारत्मकता दिसून येईल. त्यामुळे आपणास प्रगती करण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली होईल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी योग्य प्रमाणात निद्रा न घेतल्यास आरोग्य विषयक समस्या उदभवू शकतात. आठवड्याच्या सुरवातीस काही चिंता असल्या तरी जसे दिवस सरतील तशा त्या दूर होतील. वैवाहिक जीवनात भरपूर प्रेम व आपलेपणा राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अत्यंत चांगला आहे. विरोधक आपले नुकसान करण्याच्या प्रयत्नात असण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्यांच्या पासून सावध राहावे लागेल.
7 / 12
हा आठवडा आपणास चांगले यश प्राप्त करून देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण उत्साहित व्हाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार असल्याने ज्या लोकांमुळे आपल्या अध्ययनात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल त्या लोकांपासून दूर राहावे. ह्या आठवड्यात आपल्या संततीस वाईट संगत लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर आपणास लक्ष ठेवावे लागेल. आपणास उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास अत्यंत समजूतदारपणे खुश ठेवेल. प्रेमीजनांनी आपल्या प्रिय व्यक्तीस मनातील भावना व्यक्त करणे हितावह होईल. नोकरी करणारे जातक आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना अनुकूलतेचा फायदा घेता येईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती नाजूकच राहील.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच फायदेशीर होणारा आहे. आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात बराच वेळ घालवून त्यांच्या गरजा समजून घ्याल. त्यांच्या सहकार्याने आपली अनेक कामे होतील. त्यांचा सल्ला नोकरीत उपयोगी पडून नोकरीतील आपली कामगिरी उंचावण्यास आपणास मदत होईल. व्यापाऱ्यांना स्पर्धक वाढल्याने थोडी काळजी घ्यावी लागेल. असे असले तरी आपली नीती फायदेशीर होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. त्यांनी आपल्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीस थारा देऊ नये. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. प्रेमालाप करण्याची संधी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आपली प्रिय व्यक्ती सुद्धा आपल्या बरोबरीने गंभीरतेने नात्यातील वाटचाल करेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपणास सन्मानित केले जाईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपण एखाद्या प्रवासास जाऊ शकाल. ह्या प्रवासा दरम्यान नवीन लोकांना व मित्रांना भेटण्याची संधी आपणास मिळेल. ज्याची आपणास उपयुक्तता लाभेल व आपल्याला कामाचा सल्ला मिळू शकेल अशा एखाद्या वृद्ध व्यक्तीशी आपली ओळख होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सावध राहून काम करावे लागेल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायात नवीन प्रयोग करूनच यश प्राप्त करता येईल. आरोग्याच्या बाबतीत आपण नशीबवान ठराल. आव्हानांचा सामना करण्यात आपण यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन यशस्वी होईल. आपणास आपल्या कामात वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मिळू शकेल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनात थोडी काळजी घ्यावी लागेल. आपल्या नात्यास गालबोट लागण्याची शक्यता आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच पैश्यांचा ओघ सुरु होऊन आपल्या खर्चात कपात होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. असे असले तरी आपणास सासुरवाडी कडील एखादी तक्रार जी त्यांना अनेक दिवसां पासून सतावत आहे तिचे निराकरण करावे लागेल. त्यामुळे आपसातील संबंधात सुधारणा होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपण वैवाहिक सौख्याचा आनंद घेण्यासाठी एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे समाधान प्राप्त होईल. आपली बदली संभवते. सहकाऱ्यांशी असलेली आपली चांगली वर्तणूक आपले स्थान पक्के करू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या ताळेबंदावर लक्ष ठेवावे लागेल. खर्चात वाढ व प्राप्तीत कपात संभवते. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. लोक आपल्याकडे आकर्षित होतील. आपली कार्य योजना फलद्रुप होऊन आपल्या लाभाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने खुश होतील. कामात त्यांचे सहकार्य आपणास मिळू शकेल. आपणास एखादी सुविधा सुद्धा मिळू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होणार असले तरी एखाद्या गोष्टीमुळे वैवाहिक जोडीदाराशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराचा त्रागा आपणास आवडणार नाही. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनात आपली मेहनत वाढवावी लागेल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या पूजेस किंवा मंदिरास दान करू शकाल. त्यामुळे आपणास मानसिक शांतता लाभेल, तसेच आपल्या सन्मानात सुद्धा वाढ होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण धार्मिक स्थळाच्या प्रवासास सुद्धा जाऊ शकाल. प्रकृतीत थोडी सुधारणा होईल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. संपत्तीशी संबंधित वाद संभवतात. कोर्ट - कचेरीच्या कामात यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनाचे सौख्य लाभेल. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. नात्यातील प्रेम वाढून एकमेकांशी जवळीक सुद्धा वाढेल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांनी एकमेकांशी संवाद साधून प्रणयी जीवन आनंदित करण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष