शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 23 मे ते 29 मे 2021; 'या' राशीच्या लोकांनी कोर्ट-कचेरीपासून दूर राहा; कुटुंबीयांसोबत होतील मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 9:52 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण मानसिक चिंतेने ग्रस्त झाल्याने कामात खोळंबा होऊन आपले मनोधैर्य थोडे कमी होईल. परंतु, आपण कष्ट करण्यात मागे राहात नसल्याने त्याच्या जोरावर आपण कामात प्रगती करू शकाल. आपल्या प्रणयी जीवनात आनंदाचे क्षण येतील. आपली प्रिय व्यक्ती आपल्या कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास प्राधान्य देईल. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या गरजांवर लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आपल्या नात्याची वीण अधिक घट्ट होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या धाडसी वृत्तीमुळे अनेक आव्हानांचा सामना करण्यात आपण यशस्वी व्हाल. त्यामुळे हळू हळू आपले मनोबल उंचावेल. हा आठवडा आरोग्यासाठी चांगला आहे. आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी आपणास स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस खुश करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आपल्या प्रिय व्यक्ती प्रति आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण सर्जनशीलतेचा आधार घ्याल. आपल्या प्रिय व्यक्तीस एखाद्या मॉल, म्युझियम किंवा चित्र प्रदर्शनास फिरावयास घेऊन जाऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लटक्या रागा व्यतिरिक्त प्रेमाचा वर्षाव असल्याचे सुद्धा अनुभवास येईल. त्यामुळे आपणास एकमेकांना चिडविण्याची संधी मिळेल, व प्रेमात सुद्धा वाढ होईल. व्यापाऱ्यांना आपला व्यापार विस्तार करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसे केल्यास त्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामा व्यतिरिक्त हुशारीने काम करण्यावर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात एखादे नवीन उपकरण खरेदी करण्यात आपण व्यस्त राहू शकाल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी आपणास ऋतुजन्य आजारांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल. आपण आपल्या मातेस एखादी उत्तम भेटवस्तू देऊन खुश कराल. आपल्या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू आपणास पाहावयास मिळतील. आपण आपल्या कामावर सुद्धा लक्ष द्याल. त्यात आपले कौशल्य दिसून येईल व आपल्यावर वरिष्ठ सुद्धा खुश होतील. आपण धार्मिक कार्यात सहभागी होऊन आनंदित व्हाल. एखाद्या धार्मिक ठिकाणी आपण आपली सेवा रुजू कराल. आपल्या खर्चात होणाऱ्या संभाव्य वाढीचा विचार करून आपली आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. तसे केल्यास आपणास काहीसा दिलासा मिळू शकेल. कायदेशीर बाबीत धनहानी होण्याची शक्यता आहे. आपणास कुटुंबात असलेल्या एखाद्या समस्ये बाबत आपले म्हणणे स्पष्टपणे मांडावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात मात्र चढ - उतार येण्याची शक्यता आहे.
4 / 12
आठवड्याच्या सुरवातीस आपण कौटुंबिक जवाबदाऱ्या, प्रेम व जीवनमूल्ये ह्यांना समजू शकाल. ह्या दरम्यान आपणास आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. कुटुंबियांसह कोणत्याही गोष्टीवर चर्चा करताना आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे योग्य राहील. शक्यतो आपला हट्टीपणा नियंत्रणात ठेवावा. व्यावसायिक कामात सुद्धा आपली वाणी नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसे न केल्यास सहकारी व कनिष्ठांशी संबंधात तणाव निर्माण होऊन योजना पूर्णत्वास नेण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. भागीदारी कार्यात थोडा विलंब संभवतो. आठवड्याच्या उत्तरार्धात नैराश्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययनात लक्ष लागणार नाही. प्रणयी जीवनात काही शंका व अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात औदासिन्य, तणाव व व्याकुळता ह्यांचा त्रास संभवतो.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली कामगिरी उत्तम झाल्याने आपल्या प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या आठवड्यात व्यापारीवर्गास नवीन उमेदीने पुढे जाण्यात यश प्राप्त होईल. आपणास कामात यश प्राप्त झाल्याने आपले मनोबल सुद्धा उंचावेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. असे असले तरी थंड किंवा अति उष्ण पदार्थांमुळे घशाचे विकार होण्याची संभावना आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. जुन्या मित्रांची भेट संभवते. वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीस सहजपणे विवाहाची मागणी घालू शकतील.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. असे असले तरी आठवड्याच्या सुरवातीस शिक्षणाशी संबंधित एखाद्या गोष्टीने आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या संततीची चिंता सतावेल. संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अध्ययनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमीजनांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी सावध राहावे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. नोकरीत उत्तम कामगिरी होईल. सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्या कामात सुद्धा सुधारणा होईल. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपण कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. ह्या कार्यक्रमामुळे आपल्या घरी अनेक पाहुण्यांची ये - जा होईल. ह्या आठवड्यात आपणास एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास यश प्राप्तीसाठी आपले कष्ट वाढवावे लागतील. ह्या आठवड्यात गेलेला पैसा परत मिळण्याची शक्यता नसल्याने आर्थिक गुंतवणूक करताना खूपच विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात आव्हानांना सामोरे जावे लागेल, मात्र जर धैर्य दाखविलेत तर यशस्वी होऊ शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. आपणास आपल्या भागीदारावर सुद्धा नजर ठेवावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल असले तरी दीर्घ पल्ल्याचे प्रवास मात्र टाळावे.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम झाल्याने त्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात प्रेमीजन जीवनाचा आनंद लुटू शकतील. आपल्या प्रियव्यक्तीस आपण फिरावयास घेऊन जाऊ शकाल. विवाहितांच्या जीवनात मात्र चढ - उतार येतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होईल. त्यांच्या प्राप्तीत वाढ होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटावे लागू शकते. आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढल्याने नवीन मार्गांचा अवलंब करून यश प्राप्त करता येईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल, व त्यामुळे कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत प्रगती होईल. व्यापाऱ्यांनी खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रकृतीत सुधारणा झाल्याने कामात यश प्राप्ती उत्तम होऊ शकेल. विवाहितांना ह्या आठवड्यात जीवनाचा आनंद उपभोगता येईल. आपण जोडीदारास प्रभावित करू शकल्याने जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. ह्या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रियव्यक्तीस विवाहासाठी मागणी घालून त्यात यशस्वी होऊ शकतील. त्यामुळे त्यांच्या नात्याची विण अधिक घट्ट होऊ शकेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
आठवडयात आपणास मोठा फायदा होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. ह्या दरम्यान आपल्या जोडीदाराच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याच्या अनेक संधी आपणास मिळतील. आपली प्राप्ती सुद्धा वाढेल. आपल्या कार्य योजनेत यश प्राप्त होईल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपले आत्मबळ वाढेल. खूप कष्ट करून नोकरीत चांगली कामगिरी करून दाखवू शकाल. व्यापारी ह्या आठवड्यात मिळालेल्या अनुकूल संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन परस्पर जवाबदारीसह मार्गक्रमण करेल. एकाहून अनेक भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित होण्याच्या शक्यतेमुळे प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनावर विपरीत परिणाम होणे संभवतो. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष विचलित होऊ न दिल्यास त्यांना आपल्या अध्ययनात यश प्राप्त करता येईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. तसेच आर्थिक गुंतवणूक सुद्धा करू नये. आपले स्वास्थ्य उत्तम राहिल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात सुधारणा झाल्याचे जाणवेल. व्यापारी वर्गास आपल्या कामाची व्याप्ती वाढविण्याची संधी मिळेल. काही नवीन गोष्टी व नवीन कार्यप्रणाली आपल्या कामात यश मिळवून देण्यास मदतरूप होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपल्या जोडीदारास त्यांच्या व्यावसायिक जीवनात मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी काहीसा त्रासदायी ठरणारा आहे. आपली प्रिय व्यक्ती काही कारणाने आपल्यावर रागावेल, व त्याचा / तिचा राग दूर करण्यासाठी आपणास खूपच प्रयत्न करावे लागतील. त्याच्या / तिच्या सह दूरवरच्या प्रवास जाऊन मोकळेपणाने बोलल्यास स्थिती सुधारू शकेल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण अनेक लोकांची भेट घ्याल. काही नातेवाईक, मित्र किंवा शेजाऱ्यांना भेटून आपला वेळ घालवाल. जुन्या आठवणींना उजाळा देण्यात, एकमेकांचे मनोरंजन करण्यात किंवा मनोरंजनात्मक साधनांसाठी वेळ घालवाल. त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत मनोरंजक होईल. जीवनात नवीन ऊर्जा व तजेला असल्याचे जाणवेल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होईल. आपल्या कामगिरीने वरिष्ठ प्रभावित होतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपला जोडीदार आपल्या कुटुंबियांसह आपणास आश्चर्यचकित करण्याची योजना आखू शकेल. प्रेमीजनांना मिळालेल्या संधीचा उपयोग करून आपल्या प्रियव्यक्तीचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपली प्रियव्यक्ती खुश होण्यासाठी ज्या वातावरणाने तो / ती आनंदित होईल अशा एखाद्या रमणीय ठिकाणी त्याला / तिला फिरावयास घेऊन जावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष