Weekly Horoscope 24 October to 30 October 2021
आठवड्याचे राशीभविष्य : 24 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2021; 'या' राशीच्या लोकांना प्रिय व्यक्तीसह फिरण्याची संधी, विरोधकांवर मात कराल By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:34 AM1 / 12आठवडयात आपणास काही चांगली बातमी मिळेल. आपण जर एखाद्या नोकरीसाठी अर्ज केला असेल तर आपणास मुलाखतीसाठी बोलावले जाऊन तेथे आपली नियुक्ती सुद्धा होऊ शकेल. नोकरी करत असणाऱ्या जातकांच्या कामाची प्रशंसा होऊन त्यांची पदोन्नती सुद्धा संभवते. व्यापाऱ्यांना मात्र ह्या आठवड्यात शांत डोक्याने कामे करावी लागतील. घाईघाईत कामे केल्यास आपल्या कामात चूक होण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होईल. आपला जोडीदार रागावलेला असेल. अशा प्रसंगी आपणास पुढाकार घेऊन परिस्थितीतील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपल्या प्रणयी जीवनात जी स्थिती असेल त्यात नवीन काही करण्याचा प्रयत्न करू नये. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्याचे पहिले दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.2 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपले कौटुंबिक जीवन व प्रणयी जीवन ह्यात समतोल साधावा लागेल. ह्या दरम्यान काही मानसिक चिंता उदभवतील. एखाद्या गोष्टीने आपला गैरसमज होण्याची शक्यता आहे. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपणास आपला वैवाहिक जोडीदार दाखवू शकेल. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन खुलून उठण्याची शक्यता आहे. आपल्या प्रणयी जीवनात ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आता दूर होऊन आपण एकमेकांशी संवाद साधण्यात व्यस्त राहाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा आहे. व्यापारी सौदे फायदेशीर होऊन आपल्या प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपले कष्ट वाढवावे लागतील. आपण ह्या आठवड्यात जे काही कष्ट कराल त्याचे चांगले फल आपणास आगामी काळात मिळणार आहे. कायद्याशी संबंधित कामात आपणास यश प्राप्त होईल. आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.3 / 12आठवड्यात आपणास अपेक्षित फले मिळतील. मागील आठवड्यात ज्याची कमतरता आपणास भासत होती ती आता दूर होऊ लागेल. आपण व्यापारवृद्धी सुद्धा करू शकाल. आपणास आपल्या व्यावसायिक भागीदाराचे सहकार्य मिळेल. त्यांची वागणूक सुद्धा समाधानकारक असेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपले काम समजून घेऊन प्रगती करण्याची संधी मिळेल. ज्या गोष्टीची आपणास गरज होती ती आता आपणास मिळेल. आपणास वरिष्ठां कडून शाबासकी मिळेल. हा आठवडा वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. आपला जोडीदार रोमांस करण्याची तयारी दाखवेल. आपण वैवाहिक सुखाचा आनंद घेऊन तृप्त व्हाल. ह्या दरम्यान आपण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा तितकासा अनुकूल नसल्याने त्याने सावध राहावे. काही जणांना ते प्रेम करत असलेल्या व्यक्तीशी विवाह बंधनात अडकण्याची संधी मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आपणास चांगली प्राप्ती होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.4 / 12आठवड्याच्या सुरवातीस आपण नाते संबंधांच्या बाबतीत अधिक भावनाशील व्हाल. उत्तरार्धात आपण व्यावसायिक जीवनावर अधिक लक्ष केंद्रित कराल. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या जातकांना लाभ होईल. ज्यांना नोकरीत बदल करावयाचा आहे त्यांना नोकरीत बदल करून दूरवरच्या ठिकाणी किंवा परदेशात नोकरी करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात व्यावसायिक कारणांसाठी प्रवास संभवतात. भागीदारी कार्यात संथ गतीने प्रगती होईल. वाढीव खर्चांसाठी आपणास कर्ज काढावे लागू नये म्हणून आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास आपण समतोल साधू शकाल व त्यामुळे आपणास मोकळेपणा जाणवेल. ह्या आठवड्यात आपणास आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या दरम्यान थोडा व्यायाम किंवा योगासने करून आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकाल. विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.5 / 12हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. त्याच्याच जोडीने आपल्या वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा आपणास वेळ काढावा लागेल. व्यावसायिक व व्यक्तिगत जीवन ह्यात समतोल साधणे आपल्यासाठी आव्हानात्मक ठरेल. आठवड्याच्या मध्यास प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल व त्यामुळे आपल्या आशा पल्लवित होतील. आठवड्याच्या अखेरीस खर्चात वाढ झाल्याने परिस्थिती पुन्हा चिंताजनक होण्याची शक्यता असल्याने आर्थिक बाबतीत सतर्क राहावे. नोकरी करणाऱ्या जातकांना खूप कष्ट करावे लागतील. आठवड्याच्या अखेरीस आपण मित्रांसह फिरावयास जाऊ शकाल. प्रेमीजनांसाठी आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले आहेत.6 / 12हा आठवडा आपणास खूप विचार करावयास लावणारा आहे. आपण जर आपल्या पैश्यांची योग्य गुंतवणूक केली नसेल तर ह्या आठवड्यात आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या खर्चात अचानकपणे वाढ तर प्राप्तीत कपात होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपली मुले काहीशी काळजीत असल्याचे दिसून आल्याने आपणास त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. त्यांची समजूत काढून अध्ययनासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य आपणास करावे लागेल. आपण जर स्वतःच विद्यार्थी असाल तर आपणास एकाग्रतेची आवश्यकता अधिक भासेल. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. नोकरीत आपली कामगिरी उत्कृष्ट झाल्याने आपणास प्रशंसित केले जाईल. आपली तल्लख बुद्धिमत्ता व्यापारात आपल्या उपयोगी पडेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.7 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या गोष्टीमुळे चिंतीत व्हाल, जी आठवड्याच्या मध्या पर्यंत हळू हळू संपुष्टात येऊन आपल्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण होईल. आपणास आपल्या सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना शासनाकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल व खर्च नियंत्रणात येतील. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सुखद आहे. विवाहितांना मात्र आपल्या वैवाहिक जीवनात चढ - उतारांचा सामना करावा लागेल. आपल्या स्वभावात बदल होऊन त्यातील उग्रपणा बाहेर येईल. आपला हा तापटपणा प्रत्येक क्षेत्रात आपले नुकसान करणारा असल्याने त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण करावा. कुटुंबियांच्या सहकार्याने आपली कामे पूर्णत्वास जातील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.8 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ऋतुगत विकारांची शक्यता असल्याने जागरूक राहावे. आपल्या खर्चात वाढ होईल. आपण एखाद्या मानसिक दडपणाखाली असण्याची शक्यता आहे. असे असले तरी आठवड्याचे मधले दिवस चांगले आहेत. व्यापारात यशस्वी व्हाल. आपण आपल्या व्यावसायिक भागीदारा बरोबर कामाशी संबंधित बरीच चर्चा करून एखादा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कामा निमित्त प्रवास करावे लागण्याची संभावना आहे. फिरतीच्या कामातून लाभ होईल. आपल्या कष्टांमुळे आपणास कामात यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना फोनवर संवाद साधण्याची संधी मिळेल.9 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी होण्याची संभावना आहे. आपण विनाकारण चिंतीत व्हाल व त्याचा आपणास त्रास सुद्धा होईल. अचानकपणे आपल्या खर्चात वाढ होईल व त्यामुळे आपल्या प्राप्तीचा योग्य विनियोग कसा करावा व कोणत्या खर्चास प्राधान्य द्यावे ह्याचा विचार आपण सतत कराल. आर्थिक नियोजन हि काळाची गरज असल्याचे लक्षात ठेवावे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या हजर जवाबीपणाचा व कौशल्याचा चांगला परिणाम मिळेल. नोकरीत चांगले पद मिळण्याची शक्यता आहे. आपले वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणास पाठिंबा देतील. विरोधकांवर आपण मात करू शकाल. व्यापाऱ्यांना आपले कष्ट वाढवावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडण्यात व्यतीत होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपणास आपल्या प्रिय व्यक्तीसह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. आपणास मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात प्रकृतीत सुधारणा होऊन आळस सुद्धा दूर होईल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल असल्याने प्रवास टाळणे हितावह होईल.10 / 12हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या तीव्र बुद्धमत्तेने कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी एकाग्रचित्ताने आपला अभ्यास पूर्ण करू शकतील. आपल्या ज्ञानात भर पडेल. वैवाहिक जीवन आनंदमय होईल. आपणास आपल्या नात्यात खोलवर जाण्याची संधी मिळेल. जुन्या गोष्टींना उजाळा देऊन मन हलके होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल अशा एखाद्या मोठ्या मेजवानीचे आयोजन आपण करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांची पदोन्नती संभवते. आपली पगारवाढ होऊ शकते. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापाऱ्यांना नवीन योजनांवर लक्ष ठेवावे लागेल. आपणास त्रास होऊ नये म्हणून कोणतेही सरकार विरुद्ध काम करण्या पासून दूर राहावे. आपले आरोग्य उत्तम राहील. कामे यशस्वी झाल्याने आपण हर्षित व्हाल.11 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण कौटुंबिक प्रवृतींवर व्यस्त राहून कुटुंबियांची इच्छापूर्ती कराल. असे केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन आपली प्रतिमा सुद्धा उजळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामातील चढ - उतारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परंतु आपण जर लक्षपूर्वक काम केलेत तर त्यातून आपली सुटका होऊ शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास सरकार कडून एखादा लाभ किंवा निविदा मिळण्याची संभावना आहे. असे झाल्याने आपल्या प्राप्तीत वाढ होऊन आपली भविष्य विषयक इच्छापूर्ती होईल. खर्चात मात्र वाढ होणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार असली तरी सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपणास प्रेमळ वार्तालाप करून एकमेकांचे हृदय जिंकण्यात यश प्राप्त होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्राप्तीत वाढ होईल. ह्या आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.12 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. हा प्रवास आपण आपल्या प्रियजनांसह सुद्धा करू शकता. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती वाढेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन लक्ष्यांक मिळण्याची शक्यता आहे. आपणास कामात यश प्राप्त होईल. व्यापारात लाभ होईल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य सुद्धा उत्तम राहील. मित्रांचे सहकार्य मिळू शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपला वैवाहिक जोडीदार मोकळेपणाने त्यांच्या मनातील भावना आपणास बोलून दाखवेल, व त्यामुळे आपल्या नात्यातील गोडवा सुद्धा वाढेल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगता येईल. आपल्या नात्यातील समस्या संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्त होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications