शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 27 जून ते 3 जुलै 2021, 'या' राशीच्या लोकांनी करू नका पैशाचे व्यवहार अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:07 AM

1 / 12
हा आठवडा आपणास आर्थिक दृष्ट्या अत्यंत चांगला आहे. ह्या आठवड्यात विशेष करून आपणास एखादी स्थावर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आपण एखादे सुंदर व आपणास आरामदायी होऊ शकेल असे एखादे वाहन सुद्धा खरेदी करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागला तरी ते आपली कामे ठामपणे करतील व त्यामुळे लोक हळू हळू आपली प्रशंसा करू लागतील. प्राप्तीत वाढ होऊन कुटुंबात सुख - शांती नांदेल. आपल्या मनात आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवण्याची इच्छा जागृत होईल, व त्यासाठी काहीही करण्यास आपण तयार व्हाल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात रोमान्सच्या बरोबरीने काही मतभेदांचा सामना करावा लागेल. हा आठवडा व्यापारासाठी चांगला आहे. आपल्या समोर काही नवीन व्यापारी प्रस्ताव येऊ शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश प्राप्त होईल. सरकारी क्षेत्रांकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
2 / 12
ह्या आठवड्यात आपण नशिबाच्या जोरावर खूप आशावादी व्हाल. आपले कष्ट व आपला समजूतदारपणा ह्यांची वाट अनेक नवीन योजना बघत आहेत. आपण त्यांचा स्वीकार करून पुढील वाटचाल कराल. यशस्वीतेने आपणास गवसणी घातल्यामुळे आपणास पैसा व प्रतिष्ठा मिळेल. मानसिक ताण दूर होतील. एखादी संपत्ती मिळवून सुद्धा आपणास खूप मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपण तीव्र बुद्धीने कामे करून यशस्वी व्हाल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे. आपल्या सहकाऱ्यांचे आपणास पूर्ण सहकार्य मिळेल. मात्र, त्यातील काही व्यक्ती आपल्या पाठी आपणास धोका देण्याची सुद्धा शक्यता आहे. तेव्हा सावध राहावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण पूर्ण ताकदीने आपली कामे कराल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनास सुद्धा बहर येईल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
3 / 12
हा आठवडा आपल्या इच्छापूर्तीचा असून आपणास खूप लाभ देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखादा फायदेशीर सौदा होण्याची शक्यता असून त्यामुळे आपणास मोठी धन प्राप्ती होईल. असे असले तरी आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ झाल्यामुळे आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती पुन्हा आपल्या नियंत्रणात येईल. आपण रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. आपल्या प्रिय व्यक्तीसह एखाद्या चांगल्या हॉटेलात जाण्याची संधी मिळेल. विवाहितांना आपल्या जोडीदारास खुश करण्याची संधी मिळेल. जोडीदारासह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहिल्याने आपण खुश व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांना कष्टाचे यथोचित फल मिळेल. त्यांच्या कामात प्रगल्भता येईल. कोणत्याही व्यापाराचा विस्तार गोड बोलूनच करता येतो, हे व्यापाऱ्यांना लक्षात ठेवावे लागेल. स्वतः थोडे नम्रपणे वागावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
4 / 12
आठवड्याच्या सुरुवातीस आपण काहीसे विचलित व्हाल, व त्याचा विपरीत परिणाम आपल्या कामावर होण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या दरम्यान आपण नाते संबंधांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. कोणताही निर्णय घेताना आपणास अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत काही करण्या ऐवजी मानसिक शांतता पाळावी व आत्मचिंतन करण्यावर लक्ष केंद्रित करावे. असे केल्याने हळूहळू परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. आपला दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागेल. आपण नाते संबंधांचे समीकरण तसेच कुटुंबियांच्या गरजा व इच्छा गंभीरपणे समजून घेण्यास सक्षम व्हाल. व्यावसायिक आघाडीवर आपली कल्पना, कार्यक्षमता व दूरदर्शीपणा वाढेल व त्यामुळे आपण उत्तम रित्या कामे करू शकाल. वरिष्ठांच्या मार्गदर्शना बरोबरच आपल्या बुद्धिचातुर्याने आपण उत्तम कामगिरी करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस विद्यार्थ्यांच्या अध्ययनास पोषक नसले तरी मधले व अखेरचे दिवस अत्यंत अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक काळजी करण्या सारखे काही नाही.
5 / 12
हा आठवडा आपणास मानसिक दृष्ट्या उत्तम असला तरी आठवड्याची सुरवात काहीशी कमकुवत असेल. अशा परिस्थितीत आर्थिक गुंतवणूक केल्यास आपले नुकसान होईल. ह्या आठवड्यात आपणास एखादा मोठा आजार होण्याच्या शक्यतेमुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपली प्रकृती आपल्या काळजीचे प्रमुख कारण असेल. त्यामुळे कामात सुद्धा आपले मन रमणार नाही. आपल्या वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वैवाहिक जीवन सुखद झाले तरी जोडीदाराचा वाढत असलेला क्रोध आपणास चिंतीत करेल. त्यामुळे आपल्या नात्यात संघर्ष वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. आपल्या विवाहाशी संबंधित एखादी खुशखबर आपणास मिळू शकेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखाद्या कामात अडथळे येत असल्याचे जाणवेल. आठवड्याच्या मधल्या दिवसां पर्यंत आपणास हे अडथळे दूर होण्याची वाट बघावी लागेल. आठवड्याच्या मध्यास नशिबाची साथ मिळून कामात यश प्राप्त होईल. आठवड्याच्या अखेरीस आपण आपल्या कामात उत्तम कामगिरी करू शकाल व त्याचा आपणास चांगला लाभ सुद्धा होऊ शकेल. आपल्या प्राप्तीत वाढ होऊन आपण एखादे वाहन खरेदी करू शकाल. हे वाहन अनेक सुविधांनी युक्त असेल. नवीनतम मॉडेल असलेले वाहन आपल्या पसंतीस उतरू शकेल. पांढरा, रुपेरी किंवा लाल रंग असलेले वाहन आपण खरेदी करू शकाल. त्यामुळे आपल्या घरात आनंद पसरेल. प्रेमीजन दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखदच असेल. त्यांच्या जीवनात समस्या आल्या तरी त्या सहजपणे दूर करता येतील. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कुटुंबियांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. आपण आपली जवाबदारी ओळखून एका जवाबदार व्यक्तीच्या रूपात आपले कर्तव्य पार पाडाल. नोकरीत चांगले यश प्राप्त होईल. एखाद्या विशेष व्यक्तीशी आपली जवळीक वाढू शकते. मात्र त्याचा विपरीत परिणाम आपल्या कामावर होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. अन्यथा नोकरीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात उन्नती होईल. प्रणयी जीवनात सुखद क्षणांचा उपभोग घेण्याची संधी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. मात्र त्यात आपणास काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपले आरोग्य व आपल्या पैश्यांची काळजी घ्यावी. आपली आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून कोणाला उसने पैसे देऊ नयेत. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सामान्य असून आपणास आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करून अतिरिक्त काम सुद्धा करावे लागेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकेल असे सौदे करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपले मनोबल सुद्धा वाढेल. ह्या कामात त्यांना यश प्राप्त होईल. प्रेमीजनांना आपल्या नात्यातील नीरसता दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घेऊन बाहेर फिरावयास घेऊन जावे लागेल. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगता येईल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपली मनःस्थिती रोमांस करण्याची असल्याने आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आपसातील संबंध दृढ होतील. आपला वैवाहिक जोडीदार आपणास मदत करेल. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या भावंडांसह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रेमालाप करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळाल्याने ते अत्यंत खुश होऊन अधिक एकनिष्ठपणे आपली कामे करतील. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राचा काही फायदा मिळून कामातील स्थिती मजबूत होईल. आपल्या प्रकृतीत चढ - उतार येण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नये. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास स्थावर व जंगम संपत्तीचा लाभ मिळेल. अनेक दिवसांपासून जे काम करण्यास आपण धजावत नव्हता ते काम आता होऊन आपणास अचानकपणे काही लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात खूप मोठा फायदा झाल्याने आपणास खूप आनंद होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ पद किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लटक्या रागांचे रूपांतर प्रेमात होईल. नात्यातील रोमांस वाढेल. प्रेमीजनांना आपल्या मनातील भावना प्रिय व्यक्तीस सांगण्याची व प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घेण्याची संधी मिळून आपले नाते दृढ करता येईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. मात्र, बेफिकिरी आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकते. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस अचानकपणे खर्चात वाढ होऊ लागेल जी आठवड्याच्या मधल्या दिवसात थांबेल. अशा परिस्थितीत आपले आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यास काही त्रास होऊ शकणार नाही. इतरांच्या बाबतीत मध्यस्थी करणे टाळावी, अन्यथा आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. विरोधकांप्रती सतर्क राहावे. ते आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. हा आठवडा कौटुंबिक जीवनासाठी अत्यंत चांगला असून आपणास सुखद अनुभव घेता येतील. वैवाहिक जीवनाचा आनंद मनसोक्तपणे उपभोगू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी काहीसा आव्हानात्मक आहे. आपणास आपले नाते दृढ करण्यासाठी स्वतःला प्रयत्नशील राहावे लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल असून त्यांनी ह्या अनुकूलतेचा पूर्ण फायदा घेतल्यास त्यांना चांगले परिणाम मिळतील.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली काळजी दूर होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. तसेच खर्चात सुद्धा कपात होईल. आपणास आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश प्राप्त झाल्याने मन हर्षित होईल. काही नवीन योजनांवर कार्यरत व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा आपल्या कामात यश प्राप्त होईल. वरिष्ठ आपणास काही नवीन व आव्हानात्मक कामे देतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होईल. आपल्या कामाची स्थिती बघून काही नवीन लोक आपल्याशी हात मिळवणी करण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. वैवाहिक जोडीदार आपल्या बुद्धी चातुर्यानुसार आपणास मदत करेल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना मनाजोगे परिणाम मिळू शकतील. आपल्या नात्यात रोमांस राहिला तरी लटके वाद संभवतात. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष