शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021; 'या' राशीच्या मंडळींना प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जाण्याचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:16 PM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी ज्ञानवृद्धीचा आहे. आजवर जो विषय शिकण्याची आपली इच्छा होती ती पूर्ण करण्याची संधी आपणास ह्या आठवड्यात मिळू शकेल. अशा विषयांशी संबंधित पुस्तके आपले लक्ष वेधून घेतील. वैवाहिक जीवनातील तणाव थोडेफार निवळू लागतील. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीची दुसरी बाजू समजू शकेल. आपली प्रिय व्यक्ती इतरांना मदत करणारी व सरळ स्वभावाची असल्याचे आपणास समजेल. आपले आरोग्य उत्तम राहील. मानसिक ताण कमी होतील. नवे काही करून जीवनात प्रगती करण्याचा विचार आपण कराल. नोकरीत येणारे अडथळे दूर होऊन आपले कष्ट इतरांच्या नजरेत भरतील. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपल्या बँकेतील शिल्लक सुद्धा हळूहळू वाढू लागेल. कायद्याच्या कचाट्यात न सापडण्याचा प्रयत्न करावा.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला फलदायी आहे. आपण आपले कुटुंब व कार्य ह्यांच्यात समतोल साधू शकाल, व त्याचे चांगले परिणाम आपल्या अनुभवास येतील. नोकरीत मन रमेल व त्यामुळे आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. कुटुंबीयांची वागणूक सुद्धा आपणास पुढे जाण्याची प्रेरणा देईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनातील तणावातून काही अंशी मुक्तता होईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येईल. आपली प्रकृती उत्तम राहिली तरी आपणास आहारावर लक्ष ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ह्या आठवड्यात आपणास अचानक धनलाभ संभवतो. व्यापारातील नवीन रणनीती आपणास फायदा देणारी ठरेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळविण्यासाठी आपली मेहनत वाढवावी लागेल.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या वैयक्तिक जीवनातील आनंद वृद्धिंगत होऊन आपण आपल्या कुटुंबियांसह आनंदात राहू शकाल. वैवाहिक जोडीदाराचा सहयोग आपणास मदतरूप होईल. ते आपल्या जीवनाचे आधार होतील. आपल्या वैयक्तिक जीवनात प्रेम व रोमांस ह्यांचा सुगंध सुद्धा दरवळेल. प्रेमीजनांची आव्हानातून सुटका होईल. ते आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद पुन्हा घेऊ शकतील. त्यासाठी एखाद्या लहानशा प्रवासाचे आयोजन करून आपल्या प्रिय व्यक्तीस फिरावयास घेऊन जाऊ शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या भागीदाराशी आपले संबंध अधिक दृढ होतील. आपण दोघे मिळून एखादे नवीन काम करण्याचा प्रयत्न कराल, ज्यात आपण हळूहळू यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. असे असले तरी आपले विरोधक सक्रिय होऊन आपल्या समोर आव्हाने निर्माण करतील. खर्चात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता असून प्राप्तीवर त्याचा परिणाम होईल. आपली प्राथमिकता काय आहे ह्याचा विचार आपणास करावा लागेल.
4 / 12
आठवड्याच्या सुरवातीस आपणास सामाजिक प्रतिबद्धता व जवाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेरित करावे लागेल. ह्या दरम्यान नवीन नाते सुरु करून ते अधिक दृढ करता येईल. आपण आपल्या भावना व्यक्त करताना अतिशयोक्ती करणे टाळावे. अति उत्साहास नियंत्रित करणे लाभदायी ठरेल. संबंध व सामाजिक प्रवृत्ती ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या मध्यास आपले आरोग्य उत्तम राहिले तरी आपल्या त्वचेची काळजी आपणास घ्यावी लागेल. त्वचेवर पुरळ किंवा खाजेचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात कारकिर्दीतील वांछित लक्ष्यांक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आपण आपली कामगिरी अधिक चांगली करण्याचा प्रयास कराल. उत्तम संवाद व संपर्क ह्यांच्या माध्यमातून नवीन काही करार प्राप्त करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस ग्रहांच्या पाठबळामुळे व्यावसायिक व व्यक्तिगत आयुष्यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण आपण स्वतःच करण्याची संभावना आहे. असे असले तरी ह्या दरम्यान अनपेक्षितपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी बहुतांशी चांगलाच आहे. आठवड्याच्या सुरवातीस जीवनातील सत्य समजून घेण्याचा प्रयत्न कराल. ह्या वर्षी आपण खूप काही नवीन केले असून काही गोष्टीने आपल्याला बरेच काही शिकविले असल्याची जाणीव आपणास होईल. आपण त्याची अंमल बजावणी करून आठवडा सुंदर करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात तारतम्य असल्याचे दिसून येईल. भावंडांची मदत होईल. त्यांच्यासाठी काही करण्याची आपली इच्छा झाली तरी त्यांची प्रकृती नाजूक असेल. आपले आरोग्य उत्तम राहील. प्रणयी जीवन आनंदमय राहील. प्रेमीजनांना विवाहाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात स्नेह व प्रेमाचा वर्षाव होत राहील. नात्यातील सामंजस्य वाढेल. व्यापारात लाभ होईल. आता सरकारी क्षेत्रातून सुद्धा कामे होऊ लागतील. आपले नेटवर्क उत्तम राहील. ह्याचे आपणास यथोचित फल मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपले कष्ट वाढवावे लागतील. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात अचानकपणे वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल. प्राप्ती सामान्यच राहिल्याने आपण त्यात वृद्धी करण्याच्या दिशेने वाटचाल कराल. आपण केलेल्या प्रयत्नांचे चांगले फल आपणास मिळेल. व्यापारास गती येईल. एखादी नवीन भागीदारी होण्याची शक्यता सुद्धा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या सहकाऱ्यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हिताचे होईल. आपल्या विरोधकांप्रती सतर्क व सावध राहावे. तसेच कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा आपल्यासाठी कोर्ट - कचेरीशी संबंधित कार्यांसाठी प्रतिकूल आहे. आरोग्य उत्तम राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते वाढीव एकाग्रतेने अभ्यासात प्रगती करतील. आपणास कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या सहकार्याने कुटुंबाच्या हिताच्या असतील अशा काही नवीन योजना तयार कराव्या लागतील.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपला स्वतःवर विश्वास असेल. हाच विश्वास आपणास चांगले यश मिळवून देईल. आपण आपल्या व्यवसायात आक्रमक होऊन वाटचाल कराल. आपण एखादी नवीन पद्धत बाजारात घेऊन याल ज्याच्या उत्तम कामगिरीमुळे आपल्या व्यवसायास झळाळी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी पाठविले जाऊ शकते. हा प्रवास आपल्यासाठी महत्वाचा ठरू शकेल. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. वैवाहिक जीवनातील आव्हाने कमी होतील. वैवाहिक जोडीदारास आपले प्रेम जाणवल्याने नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांना सुद्धा नात्यातील चांगलेपणा जाणवेल व आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षणांचा आनंद घेता येईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने आपणास त्याचे चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी समतोल आहार, व्यायाम, योगासन व प्राणायाम ह्यांचा आधार घ्यावा. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आपले कष्ट फलद्रुप होतील. व्यावसायिक भागीदाराच्या माध्यमातून सुद्धा एखादा नवीन सौदा आपल्या हाती लागेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. कुटुंबियांचे सहकार्य कामात प्रगती साधण्यासाठी आपणास मदतरूप ठरेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या क्रोधास सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांना थोडे सावध राहून प्रेमाने संवाद साधावा लागेल. ह्या आठवड्यात आपणास रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. मित्रांमुळे फायदा होईल. आपल्या कामात त्यांची मदत होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल असून उत्तरार्धातील दिवस प्रवासासाठी नुकसानदायी असल्याचे लक्षात ठेवावे.
9 / 12
नोव्हेंबर महिन्याचा हा शेवटचा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. खर्च झाला तरी प्राप्तीतील वाढ आपणास आनंदित करू शकेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ मिळाल्याने आपली प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामा निमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळेवर भोजन घेण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. वैवाहिक जोडीदार सहकार्य करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीने मनमानी केली तरी आपल्या खुशीसाठी काहीही करण्यास ती तयार होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आठवड्याच्या सुरवातीस धनहानी होण्याची शक्यता असल्याने थोडे सावध राहावे लागेल. हा आठवडा गुंतवणूक करण्यास अनुकूल नसल्याने सध्या कोठेही आर्थिक गुंतवणूक करू नये. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपणास आपल्या सासुरवाडी कडील लोकांशी संबंध सुधारण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचा आपणास पाठिंबा राहील. आपण दोघे एकत्रितपणे एखादा प्रवास करू शकाल. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या इच्छांचा आदर करावा लागेल. त्यांचे कुटुंबीय आपल्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. सुख सामग्रीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांनी कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहण्यासाठी निव्वळ आपल्या कामातच लक्ष घालावे. व्यापाऱ्यांची व्यापारवृद्धी होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या व्यापाराचा गंभीरतेने विचार करून त्याचा विकास करून पुढे कसे जाता येईल ह्यावर आपले लक्ष केंद्रित कराल. त्यासाठी आपण काही सरकारी कार्यवाही सुद्धा कराल. तसेच शासनाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपणास सरकारी क्षेत्राकडून लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात मजबुती जाणवेल. आपण आपली बुद्धी व ज्ञानाच्या जोरावर आपल्या कामात प्राविण्य मिळवाल. असे असले तरी विनाकारण कोणाशी वाद घालणे आपल्या हिताचे होणार नाही. मानसिक आरोग्य उत्तम राहील. शारीरिक आव्हाने सुद्धा कमी असल्याने आपण आनंदित व्हाल. जीवनास नावीन्य येईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च कमी होतील. विरोधकां पासून थोडे सावध राहावे. प्रणयी जीवन आनंदाने परिपूर्ण राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुद्धा शांतता पसरेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या मुलांवर खूप प्रेम कराल. त्यांच्या भवितव्यावर लक्ष द्याल. ह्या आठवड्यात आपले वैवाहिक जीवन तणावग्रस्त होण्याच्या शक्यतेमुळे घरात वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काहीच कमी पडू देणार नाहीत. आपली प्रिय व्यक्ती तिच्या मनातील भावना आपल्या समोर व्यक्त करेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. आपण आपली कामे पूजा समजून कराल व त्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होईल. लोक आपले कौतुक करतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा प्रवास करून पैसे कमविण्याचा आहे. व्यावसायिक प्रवासातून आपणास खूप मोठा लाभ होईल. आपण व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न कराल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष