शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2021, 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता अन् व्यापारात फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 11:36 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या शैलीमुळे आपली ओळख निर्माण होईल. आपल्या बोलण्यातील माधुर्यामुळे प्रियव्यक्तीच्या हृदयात आपणास स्थान मिळून आपले प्रणयी जीवन आनंदी होईल. विवाहितांच्या कामात जोडीदाराची साथ मिळेल. आपल्या व्यापारात नवीन प्रकल्पांची भर पडून आपल्या नफ्यात वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच असणार आहे. आपल्या कामावर मात्र लक्ष केंदित करावे लागेल. कौटुंबिक जीवनात खूपच आनंद पसरेल. आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी भावंडांकडून आर्थिक मदत मिळू शकेल. उत्तम एकाग्रतेमुळे विद्यार्थ्यांची अध्ययनात चांगली प्रगती होईल. इतकेच नव्हे तर अध्ययनात उपयुक्त होईल असे नवीन काही तरी शिकावयास सुद्धा मिळेल. आपली प्रकृती चांगली राहिली तरी ऋतू बदलामुळे सर्दी - खोकला होण्याची शक्यता आहे.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या मातेस एखादी चांगली व मोठी भेटवस्तू देऊ शकाल. कामाच्या बाबतीत केलेले आपले प्रयत्न सार्थकी ठरतील. आपले नोकरीतील स्थान पक्के होईल. आपला हजर जवाबीपणा आपणास अग्रस्थानी नेवून ठेवेल. व्यापारात मात्र काही आव्हानांचा सामना करावा लागणार असल्यामुळे आपले प्रयत्न वाढवावे लागतील. आठवड्याच्या मध्यास मानसिक चिंता वाढण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनात सुख - शांती राहिली तरी काही कारणांमुळे आपल्या दोघात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावे लागेल. आपल्या कामास योग्य दिशेत प्रगती पथावर न्यावे लागेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा काहीसा नाजूक आहे. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्रणयी जीवना संबंधी काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण उत्साहित होऊन कामे कराल, व त्यामुळे कामात यशस्वी होण्याची सुरुवात होईल. आपले मानसिक संतुलन सुद्धा उच्च प्रतीचे राहील, व त्यामुळे आपली निर्णय क्षमता बहरून उठेल. आपणास आपल्या मित्रांचे सहकार्य मिळू शकेल. मात्र, कुटुंबियांचे सहकार्य न मिळाल्याने आपण काहीसे नाराज सुद्धा व्हाल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. विवाहितांच्या जीवनात मात्र काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सासुरवाडीकडून आपणास काही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा सावधपणे पाऊले टाकण्याचा आहे. कामातील एखाद्या छोट्याशा चुकीमुळे सुद्धा आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
4 / 12
आठवड्याची सुरुवात आपल्या वैयक्तिक व वैवाहिक जीवनासाठी चांगली होणार आहे. आठवड्यात आपण सकारात्मक, आशावादी व उत्साहित राहाल. ह्या दरम्यान आपल्या वैयक्तिक किंवा वैवाहिक जीवनात काही न उलगडलेल्या समस्या असल्यास त्यांचे निराकरण झाल्याने आपल्या आत्मविश्वासात व मनःशांतीत वृद्धी होईल. ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आपल्या जवाबदाऱ्या वाढण्याची किंवा बदली होण्याची शक्यता आहे. जे जातक नवीन संधीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा आठवडा निराशाजनक आहे. व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनात आपण प्रियजन व कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकाल. कुटुंबीय व मित्रांसाठी काही पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे मधले दिवस आपल्यासाठी मदतरूप ठरतील. ह्या दरम्यान गोष्टी योजनाबद्ध पद्धतीने पुढे जातील. आपण आपल्या लक्ष्यांकाच्या जवळ जाऊन पोचाल. आठवड्याच्या अखेरीस एखादी आरोग्य विषयक जुनी तक्रार पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचा विशेष सल्ला आपणास देण्यात येत आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्यात काही आवश्यक बदल झाल्याचे आपणास जाणवेल. आपला व्यवहार खूपच सुधारला असल्याचे आपणास जाणवेल. कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास आपण सज्ज झालेले असाल. याची आपल्या कामात आपणास मदत होईल. आपण नोकरी किंवा व्यापार करत असलात तरी त्यात यशस्वी होऊ शकाल. मात्र, वाढते खर्च हि आपल्यासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. आपल्या प्राप्तीत थोडी वाढ होईल, जी आपणास थोडा दिलासा देऊ शकेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. कुटुंबाकडे आपले थोडे दुर्लक्ष होईल. प्रेमीजनांच्या जीवनात काही अडचणी निर्माण होतील, ज्यात आपल्याच एखाद्या व्यक्तीचा सहभाग असेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपणास मात्र आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
6 / 12
हा आठवडा आपणास मध्यम फले देणारा आहे. आपल्या योजनांवर आपणास पुनर्विचार करावा लागेल. आपली प्राप्ती चांगली झाली तरी खर्चात सुद्धा वाढ होऊ लागेल. या खर्चांवर आपणास सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आर्थिक नियोजनावर लक्ष द्यावे लागेल. कोणतेही नवीन कर्ज घेण्याचा विचार सध्या करू नये. विवाहितांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण येतील. आपल्या संततीच्या सुखद भवितव्यासाठी काही आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीजनांना प्रेमालापाची संधी मिळेल. असे असले तरी काही लोकांच्या विरोधामुळे आपल्या प्रणयी जीवनात मिठाचा खडा पडू शकतो. आपली प्रकृती काहीशी नाजूक राहील. मुख्यत्वे आपणास पोटाचे विकार सतावतील. प्रवासासाठी आठवड्याचे अखेरचे दिवस अनुकूल आहेत.
7 / 12
हा आठवडा आपल्या अपेक्षेनुसार चांगला जाईल, ज्यात आपली प्राप्ती वाढल्याचा आनंद आपण उपभोगू शकाल. आपण योजना बनवून आपली भक्कम करण्याचा विचार सुद्धा कराल. त्यामुळे आपल्या व्यापाराचा विस्तार होईल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा आपल्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल. प्रवास मात्र सतत करावे लागतील. त्यातील काही प्रवास हे कामा निमित्त असतील, जे भविष्यात उपयुक्त ठरतील. कुटुंबात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपसातील संपर्क वाढल्याने नाते अधिक दृढ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच असेल. आपणास जोडीदाराच्या रागास सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी जोडीदाराचे प्रेम आपल्यावर असेलच. अशा वेळी जोडीदाराची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष दिल्याने कामाच्या ठिकाणी आपले काम उत्तम होईल. इतकेच नव्हे तर कोणी टीका सुद्धा करू शकणार नाही. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आपले स्थान मजबूत होईल. व्यापारी वर्गास आपल्या व्यापारास गती देण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करून काही नवीन लोकांशी सहयोग करावा लागेल. व्यापारास गती देण्यासाठी आपणास आपल्या मित्रांचे सुद्धा सहकार्य मिळू शकेल. आपली प्रकृती चांगली राहील. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. प्रणयी जीवनात चढ - उतार आले तरी नात्यातील प्रेम टिकून राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. एकमेकांप्रती प्रेम वाढल्याने नात्याची वीण घट्ट होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी फायदेशीर ठरणारा आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. तसेच आपणास नशिबाची साथ मिळून आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. बँकेतील गंगाजळी वाढेल. शासनाकडून एखादा लाभ संभवतो. व्यापारास गती आल्याने आपल्या नफ्यात वाढ होईल. दरम्यान नोकरी करणाऱ्यांना सुद्धा फायदा होईल. असे असले तरी आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आपल्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन ताण - तणावाचे राहील. संवाद साधून हे तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी मिळेल. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या सुखाचा विचार करावा लागेल. आठवड्याचा सुरवातीचा व अखेरचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या चिंतेने ग्रस्त व्हाल, मात्र जस जसा आठवडा पुढे सरकेल तस तशी आपली चिंता हळूहळू दूर होऊ लागेल. प्राप्तीत थोडी वाढ संभवते. खर्चांवर आपले नियंत्रण राहील. हि बाब आपणास दिलासा देणारी असेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव करण्याची संधी मिळेल. आपल्या प्रियव्यक्तीची आपणास चांगली साथ मिळाल्याने आपण खुश व्हाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपल्या सर्व चिंता दूर सारून आपण जोडीदाराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आपले नाते अधिक दृढ होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले यश प्राप्त होईल.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. व्यापारात चांगली प्रगती होईल. दूरवरच्या प्रवासातून आपला काही फायदा होईल, व व्यापारात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवावा. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपणास चांगला परिणाम मिळू शकेल. प्रकृतीत सुधारणा होईल. आपली ज्ञान तृष्णा वाढल्याने नवीन काही शिकण्याची इच्छा होईल. ह्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. प्रणयी जीवन सामान्यच राहील. आपली प्रियव्यक्ती आपणास खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. एकमेकांना समजून घेऊ शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपणास कामात यश प्राप्त झाल्याने आपण आनंदित व्हाल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. चिंता दूर सारून आपल्या योग्यतेवर भरवसा ठेवावा. त्यातच आपले हित सामावलेले आहे. कार्यात यशस्वी व्हाल. प्राप्तीत वाढ होण्याची दाट शक्यता असून आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. आपली प्रतिमा उजळेल. सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा उन्नती दायक आहे. व्यापारीवर्गास सुद्धा व्यापारात चांगला फायदा होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. जोडीदारामुळे काही फायदा संभवतो. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा आनंददायी ठरणारा आहे. हा संपूर्ण आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना आपली एकाग्रता वाढवावी लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष