Weekly Horoscope 31 October to 6 November 2021
आठवड्याचे राशीभविष्य : 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2021; 'या' राशींसाठी यंदाची दिवाळी ठरणार खास, कष्टाचं फळ मिळेल हमखास By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 10:32 AM1 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपली प्राप्ती वाढली तरी भविष्यात आपणास ह्या पेक्षा चांगली प्राप्ती कशी होईल ह्याचा विचार सुद्धा करावा लागेल. सरकारी क्षेत्रा कडून मोठा लाभ संभवतो. आपण जर सरकारी क्षेत्रा बरोबर व्यापार करत असाल तर ह्या आठवड्यात आपणास अपेक्षित लाभ मिळू शकेल. आपले आरोग्य उत्तम राहिल्यामुळे आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या सर्जनशीलतेने आपल्या प्रिय व्यक्तीस प्रभावित कराल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण राहील, तेव्हा थोडी काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कार्यालयातून एखादी चांगली बातमी ऐकावयास मिळण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपण एखाद्या प्रेक्षणीय स्थळी फिरावयास जाऊ शकाल.2 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण कौटुंबिक गरजा समजून घेऊन आपली कौटुंबिक जवाबदारी पार पाडाल. आपल्या मातेप्रती स्नेह वाढून आपण त्यांची सेवा कराल. त्यामुळे आपणास एक वेगळेच समाधान लाभेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंदित होण्याचा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. असे असले तरी आपला वैवाहिक जोडीदार आजारी पडण्याची शक्यता असून आपणास त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात नवीन योजना बनविण्यासाठी वेळ काढावा लागेल. आपल्याला नवनवीन पदार्थ खाण्याचा छंद असल्याने आरोग्याच्या समस्या उदभवण्याच्या शक्यतेमुळे ह्या आठवड्यात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या मुलांच्या प्रगतीमुळे आपण आनंदित व्हाल.3 / 12हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या चिंता कमी झाल्याने आपण मनापासून सुखावाल. आपण आपल्या शारीरिक सुरक्षेकडे सुद्धा लक्ष द्याल. आठवड्याच्या मध्यास आपणास काळजीमुळे मानसिक थकवा जाणवेल. आठवड्याच्या अखेरीस आपण एखाद्या प्रवासास जाण्याचे आयोजन कराल. वैवाहिक जीवनातील प्रेम वृद्धिंगत होऊन एकमेकांप्रती समजूतदारपणा सुद्धा वाढेल. त्यामुळे आपण व आपला वैवाहिक जोडीदार ह्या दरम्यान दरी कमी होईल. प्रेमीजनांना मात्र ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. आपली प्रिय व्यक्ती रागावणार नाही ह्याची काळजी घ्यावी. जर ती रागावलीच तर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला असून त्यांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा महत्वाचा आहे. त्यांचा मोठा फायदा होईल. गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होईल. व्यवसायात नवीन तंत्राचा वापर आपणास सुविधा प्राप्त करून देईल.4 / 12जीवनात कोणत्याही गोष्टीतून अधिक पळ काढता येत नसल्याचा विचार आपणास आठवड्याच्या सुरवातीसच करावा लागेल. आपल्या व्यक्तिगत जीवनातील तणाव व दबाव दूर करण्यासाठी काही वैकल्पिक उपक्रमांची निवड करावी. नवीन लोकांशी संपर्क वाढल्याने आपली प्रेम संबंधाची शक्यता बळावेल. ह्या दरम्यान काही सामाजिक मुद्दे आपणास भावनात्मक दृष्ट्या प्रभावित करू शकतील. आठवड्याच्या मध्यास आपले आरोग्य टिकविण्यासाठी आपणास आपल्या दिनचर्येत काही बदल करावे लागतील. ह्या दरम्यान बाहेरील पदार्थ व तेल - मसालायुक्त पदार्थ खाणे टाळावे. वेळेवर भोजन करावे व भरपूर झोप घ्यावी. व्यावसायिक आघाडीवर आपले शत्रू वाढू नयेत म्हणून आपल्या सहकाऱ्यांशी निष्कारण वाद घालत बसू नये. ह्या आठवड्यात आपली कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी आठ्वड्याच्या अखेरीस आपल्या सर्व समस्यांचे निराकरण होणार असल्याने काळजी करू नये. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून ते आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. प्रवासात काळजी घ्यावी.5 / 12हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या विचारांना व तत्वांना चिकटून राहिल्याने चालत आलेली संधी घालवून बसाल. मात्र आपणास त्याचा पश्चाताप होणार नाही. आपले साहस व पराक्रम ह्यात वाढ होईल. सरकारी क्षेत्राकडून चांगला लाभ संभवतो. आपणास सरकारी तंत्राशी संपर्क वाढविल्याने फायदाच होईल. एखादा मोठा अधिकारी आपल्या मदतीस धावून आल्याने व्यवसायात लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे आपली स्थिती मजबूत होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपण आपली सर्व कामे पूर्ण ताकदीने कराल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात रोमांस व जवळीक ह्यांचा आनंद घेता येईल. त्यामुळे आपल्या प्रणयी जीवनास बहर येईल. आपणास आपल्या कामात कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. मात्र, कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.6 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्याला प्रकृतीशी संबंधित काही त्रास होण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपले आर्थिक नुकसान होऊ नये व आपली प्रकृती बिघडू नये म्हणून विनाकारण प्रवास करणे टाळावे. आपल्या कामात मित्रांची मदत होईल. तसेच कुटुंबीय व शेजारील व्यक्ती सुद्धा आपणास कामात मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे करतील. नोकरीसाठी केलेले प्रवास सार्थक होतील. आपणास शासनाकडून फायदा होण्याची संभावना आहे. आपली व्यावसायिक आर्थिक बचत वाढून व्यवसायास गती येईल. कुटुंबात शांतता नांदेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा व आपलेपणाची भावना जागृत होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या जवाबदाऱ्या ओळखून नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.7 / 12ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसा पासून सुरु होणारा हा आठवडा आपणास यश प्राप्त करून देणारा आहे. आपल्या व्यवसायात फायदा होऊन आपल्या प्राप्तीत वाढ होण्यास मदत होऊ शकेल अशी एखादी माहिती आपणास आठवड्याच्या सुरवातीस मिळण्याची संभावना आहे. कदाचित कर परतावा सुद्धा मिळू शकतो. प्रणयी जीवन आनंदी होईल. आपली प्रिय व्यक्ती अशी एखादी गोष्ट आपणास सांगेल कि ज्याने आपल्या मनास शांतता लाभून त्यांच्या प्रति आपला आदर सुद्धा वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन हेलकावे घेत राहिले तरी आपल्या समजूतदारपणामुळे परिस्थिती हाता बाहेर जाणार नाही व कोणतीही मोठी समस्या उदभवणार नाही. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण आपल्या भावंडांसह एखाद्या मोठ्या मेजवानीचे आयोजन करू शकाल. हा आठवडा प्रवासासाठी विशेष अनुकूल नाही.8 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण आपले कुटुंब व नोकरी ह्यात समन्वय साधून प्रत्येक बाबतीत समतोल साधण्यात यशस्वी व्हाल. आपल्या खर्चात होणारी वाढ आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. हि डोकेदुखी दूर करून आपल्या प्राप्तीत वाढ करण्याच्या दिशेने प्रयत्नशील राहावे. ह्या आठवड्यात बाजारात मंदी येण्याच्या शक्यतेमुळे व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाराकडे अधिक लक्ष देऊन व्यापारात वाटचाल करावी लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण सामाजिक माध्यमात बराच वेळ व्यस्त राहून एकमेकांचे फोटो व विडिओ बघून आनंदित व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. आपला वैवाहिक जोडीदार कुटुंबासाठी आनंद घेऊन येईल. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपणास स्वतःला प्रयत्न करावे लागतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.9 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. नशिबाची साथ मिळाल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. आजवर जी कामे स्थगित झाली होती ती सुद्धा आता पुन्हा सुरु होतील. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टांचे चांगले फल मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण आपल्या व्यापार विस्तारासाठी जाहिरातीची एखादी नवीन पद्धत शोधण्याचा प्रयत्न कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन रोमांसाने परिपूर्ण असेल. आपल्या कामात वैवाहिक जोडीदाराची मदत सुद्धा आपणास होईल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपण वेळेचा आनंद घेऊ शकाल.10 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता असून ते दूर करण्यासाठी आपणास स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांना विशेष कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागले नाही तरी त्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या कामात यशस्वी व्हालच, शिवाय इतरांच्या चांगल्यासाठी पुढाकार सुद्धा घ्याल. खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपसातील संबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजनांना सुद्धा आपले नाते दृढ करण्याची संधी मिळेल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल.11 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण दूरवरचे प्रवास करू शकाल. व्यापारासाठी केलेले प्रयत्न सार्थक होतील. आपल्या व्यवसायास गती येऊन नवीन संपर्कांचा लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामात प्रगती होईल. आपली बदली होण्याची सुद्धा संभावना आहे. प्राप्ती हळू हळू वाढ होऊ लागेल. खर्चात कपात होऊ लागल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागेल. मानसिक तणावा पासून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण उपभोगण्याची संधी मिळेल. एकमेकांना समजून घ्याल. आपल्यातील जवळीक वाढेल. प्रेमीजनांना प्रेमालाप करण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा निर्माण होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला असून अभ्यासात त्यांचे मन रमेल. त्यांना चांगला परिणाम प्राप्त होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.12 / 12हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपले नुकसान होऊ नये म्हणून कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. पैश्यांची प्राप्ती झाली तरी खर्चात वाढ होऊ शकते. विनाकारण प्रवास केल्याने आपल्या काळजीत भर पडेल. प्रवासात खर्च सुद्धा होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना यश प्राप्त होईल. आपण वेळेवर काम पूर्ण केल्याने आपली स्थिती मजबूत होईल. व्यापारी आपल्या व्यापारी बुद्धीचा वापर करून आपल्या व्यवसायास मजबुती देऊ शकतील. ह्यासाठी आपला व्यावसायिक भागीदार सुद्धा आपणास मदत करू शकेल. प्रेमीजनांनी आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाचा प्रस्ताव दिल्यास त्यात ते यशस्वी होऊ शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications