Weekly Horoscope 4 April to 10 April 2021
आठवड्याचे राशीभविष्य : 4 एप्रिल ते 10 एप्रिल 2021, 'या' राशीच्या लोकांची नोकरीत प्रगती होणार, समाजात प्रतिष्ठा वाढणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 11:00 AM1 / 12हा आठवडा आपल्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येणार आहे. आठवड्यात आपण एखादा नवीन मोबाइल किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची शक्यता असून त्यासाठी आपणास खूप मोठी रक्कम खर्च करावी लागेल. आपल्या प्रियव्यक्तीस खुश करण्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ तिच्या सहवासात घालवाल. आपण जर विवाहित असाल तर आपल्यातील जवळीक वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यालयीन कामा निमित्त एखादा प्रवास करावा लागेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला असून नवीन व्यवसायात त्यांना गुंतवणूक करता येईल. विद्यार्थ्यांना मात्र एकाग्रतेचा अभाव असल्याचे जाणवेल व त्यामुळे अध्ययनात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची मात्र आपणास काळजी घ्यावी लागेल. आपण जर त्याकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य बिघडू शकते.2 / 12आठवड्यात मानसिक दृष्ट्या आपण अधिक बलवान व्हाल. एखादी व्यक्ती कठीण समयी कशी बलवान होत असते हे आपणास आपल्या जीवनात असलेल्या अडचणीतून शिकावयास मिळेल. ह्या दरम्यान आपल्या खास मित्रांशी वाद घालत बसू नका. तेच आपणास कठीण समयी योग्य सल्ला देऊ शकतील. असे असले तरी आपणास मित्रांचा सल्ला पटण्याची खात्री देता येत नाही. आठवड्यात प्रेमीजनांना चांगले परिणाम मिळतील. ह्या दरम्यान आपण आपल्या प्रियव्यक्तीशी सामाजिक माध्यमांच्या मदतीने सतत संपर्कात राहाल. कदाचित एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी सुद्धा मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आता परिस्थिती नियंत्रणात येऊ लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगण्याची संधी मिळेल व त्यामुळे त्यांना व्यावहारिक अडचणी दूर सारायची संधी मिळू शकेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा उत्तम आहे. काही वडीलधाऱ्या व जुन्या व्यक्तींची आपणास मदत होऊ शकेल. त्यांच्या संपर्काचा आपणास फायदाच होईल. आठवड्याच्या मध्यास आपणास एखाद्या दूरवरच्या प्रवासास जावे लागेल.3 / 12आठवड्यात आपण आपल्या जीवनास खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न कराल. थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढाल व त्यामुळे आपणास आत्मिक शांती मिळेल. आपल्या नाते संबंधां प्रति संवेदनशील व्हाल. कुटुंबियां प्रति कृतज्ञता व्यक्त कराल. आपल्या कामात कुटुंबीयांची मदत होईल. वैवाहिक जीवनात आपणास काही नवीन अनुभव येतील. आपला जोडीदार काही गोष्टी समंजसपणे करेल ज्या आपणास आवडतील. प्रेमीजनांना आपले काम व प्रणयी जीवन ह्यात समतोल साधण्याची कसरत करावी लागेल. विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी होण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. ह्या आठवड्यात प्राप्तीपेक्षा खर्च अधिक झाल्याने आपण त्रासून जाऊ शकता. आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्यात आव्हानांना पेलण्याची शक्ती असल्याने प्रगती करण्यात ती मदतरूप होऊ शकेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.4 / 12आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःसाठी शांततेचा शोध घ्याल. दरम्यान आपणास नाते संबंधाना पुढे नेण्यास धीराने व नियोजनबद्ध मार्गाने जावे लागेल. तसे केल्यानेच आपण जोडीदारास आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगू शकाल. आठवड्याच्या मध्यास आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही गंभीर आजारपणाची शक्यता मात्र दिसत नाही. कदाचित पूर्वीपेक्षा आपली प्रकृती चांगली असू शकते. आठवडा जस जसा पुढे सरकेल तस तसे आपल्या ग्रहस्थितीत परिवर्तन होऊ लागेल. आपण नवीन व्यापारा विषयी विचार करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. आपल्या कार्यात आपण प्रगती कराल. भागीदारी व्यवसायात प्रगती साधण्यास थोडा वेळ लागू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही कि आपली गुंतवणूक चुकीची आहे. ह्या आठवड्यात आपणास व्यापारात यश प्राप्तीची पूर्ण खात्री देता येऊ शकते. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले झाले नाही तरी आठवड्या अखेरीस त्यात सुधारणा होईल. असे असले तरी चांगला परिणाम मिळविण्यासाठी त्यांना एखाद्याच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते.5 / 12हा आठवडा सुरुवातीस आपल्यासाठी चांगला असेल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपणास संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. त्याने आपण खुश व्हाल. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होऊन त्यांना सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात रचनात्मकता वाढीस लागेल. एकमेकांशी मोकळेपणाने मनातील गोष्टी सांगण्याची संधी मिळेल. आपण एकत्रितपणे एखाद्या दूरवरच्या प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. सासुरवाडीतील एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अनेक लोकांची भेट होईल व नवीन संपर्क होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना थोडी काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार होताना दिसून येईल. आपले स्वतःचे कार्यालय असल्यास तेथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहावे.6 / 12हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपले कुटुंब व काम ह्यात समतोल साधू शकाल. आपली कामात प्रगती होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्या व्यवहारात सकारात्मक बदल घडून येईल. वैवाहिक जीवनात सुद्धा आनंद पसरेल. एकमेकांची जवळीक वाढेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण दोघे एकत्रितपणे एखाद्या धर्मादाय कार्यात सहभागी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांच्या पदोन्नतीची संभावना आहे. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळवू शकाल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात यश प्राप्त होईल. ते आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपल्या प्राप्तीत वृद्धी तर खर्चात कपात होईल, व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत झाल्याचे आपणास जाणवेल.7 / 12आठवड्यात आपणास स्वला ओळखण्याची संधी मिळेल. आजवर आपण ज्या चुका केल्यात त्या पुन्हा होणार नाहीत ह्याची आपण काळजी घेऊ लागाल. त्यामुळे आपला खूप मोठा लाभ होईल तसेच व्यापारात सुद्धा फायदा होईल. आपण काही नवीन योजनांवर कार्यरत व्हाल. तसेच जुन्या योजना पुन्हा अंमलात आणू शकाल. आपण आपल्या व्यापारात कामगार हिता विषयी विचार कराल. नोकरीत शिस्तबद्ध पद्धतीने काम कराल व त्याचा आपणास चांगला परिणाम मिळेल. आपली प्रकृती थोडी नाजूक राहील. विरोधक आपणास दुर्बल करण्याचा निष्फळ प्रयत्न करतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असून आपल्या प्रणयी जीवना विषयी कुटुंबियांना सुद्धा सांगू शकाल. विवाहितांना आपले वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी कुटुंबीयांची मदत घ्यावी लागेल.8 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपली गंगाजळी वाढविण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी आपली हुशारी कामी येईल. आपला एखादा जुना सहकारी आपल्या मदतीस येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांची कामातील एकाग्रता कमी झाल्याने कामात चुका होण्याची शक्यता असून त्या स्पष्टपणे दिसून येणार असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे काही मित्र एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना एकाग्रता भंग होऊ नये ह्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहितांच्या जीवनात काही समस्या निर्माण होतील. मात्र त्या दूर करण्यात ते यशस्वी होऊ शकतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण प्रियव्यक्तीसह एखादा चित्रपट बघण्याचा किंवा बाहेर जाण्याचा कार्यक्रम आखू शकाल. इतकेच नव्हे तर आपण तिला महागडी भेटवस्तू सुद्धा देऊ शकाल. त्यामुळे ती प्रभावित होईल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. प्रवासात काही जुन्या लोकांना भेटण्याची संधी आपणास मिळू शकेल.9 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपला आत्मविश्वास वाढेल. कुटुंबियांचे सहकार्य आपणास मिळू शकेल. आपल्या घरात नवीन पाणी शुद्धीकरणाचे उपकरण आपण बसवूनघेऊ शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना आपल्या भागीदारा कडून काही नवीन कल्पना मिळाल्याने व्यापार विस्तार करण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती उत्तम राहील. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. कुटुंबियांशी आपले नाते अधिक दृढ करता येईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.10 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास धैर्याने कामे करावी लागतील. आपल्या चिंता आपणास त्रास देतील. परंतु आपला आत्मविश्वास आपणास मजबूत करू शकेल. खर्चात वाढ झाली तरी जस जसा आठवडा पुढे सरकेल तस तसे ते कमी होत जातील. आपणास आपल्यावर खूप चांगला विश्वास असल्याने स्वतःची कामे स्वतःच करण्याची इच्छा होईल. ह्याचा फायदा विशेषतः नोकरी करणाऱ्या जातकांना होईल. आपली भावंडे आपणास मदत करतील. आपले मित्र किंवा नातेवाईक ह्यांची सुद्धा गरजेनुसार मदत होऊ शकेल. प्राप्तीत सामान्य वाढ होईल. वैवाहिक जीवन आनंददायी व प्रेमाने भरलेले असेल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना एखाद्या साहसी शिबिरास जाण्याची संधी मिळू शकेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अत्यंत अनुकूल आहेत.11 / 12हा आठवडा आपल्यासाठी आशास्पद असा आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल, परंतु आठवड्याच्या मध्यास अचानकपणे काही खर्च सुद्धा उदभवतील, तेव्हा त्याची योग्य तरतूद आधी पासूनच करून ठेवावी. प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक समस्यांचे हळू हळू निराकरण होऊ लागल्याने आपल्या मनास शांतता लाभेल. परिस्थिती आपणास अनुकूल असल्याने कोणतीही मोठी समस्या उदभवणार नाही. नोकरी करणाऱ्या जातकांना नोकरीच्या ठिकाणी आपल्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा व्यापारी वर्गासाठी आव्हानात्मक असू शकतो. आपल्या एखाद्या योजनेचा परिणाम आपल्या विरुद्ध होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. कुटुंबात सुख शांती नांदेल. ह्या आठवड्यात एखादा मोठा कार्यक्रम होऊन प्रेमीजनांना त्याचा आनंद घेता येईल. आपली प्रियव्यक्ती आपल्या कुटुंबियांना भेटण्याचा हट्ट करण्याची शक्यता आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.12 / 12हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली प्रकृती ढासळू शकते. आपणास आजारपण येण्याची शक्यता असल्याने आपल्या आहाराचा समतोल साधावा व आपली दिनचर्या योग्य पद्धतीने पाळावी. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने व खर्चात कपात झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणारे जातक आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकतील. ते आपणास पाठिंबा देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. काहीजणांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनात चढ - उतार येतील, तेव्हा आपणास काळजीपूर्वक वागावे लागेल. आपली प्रिय व्यक्ती नाराज होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन ह्या आठवड्यात सामान्यच राहील. आपणास काही नवीन मैत्री करण्याची संधी मिळेल. कलात्मक लोकांशी आपली मैत्री होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications