Weekly Horoscope 5 December to 11 December 2021
आठवड्याचे राशीभविष्य : 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021; 'या' राशीच्या लोकांची ऑफिसमध्ये कामगिरी अधिक उंचावणार; नात्यातही प्रेम वाढणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:36 PM1 / 12ह्या आठवड्यात आपणास काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. आपण जर नोकरीसाठी प्रयत्न केले असतील तर त्यात आपण यशस्वी होण्याची शक्यता आहे. जे जातक नोकरी करत आहेत त्यांची इच्छित स्थळी बदली होऊ शकते. आपणास पदोन्नती व पगारवाढ असे दोन्ही लाभ मिळतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी आनंददायी असेल. आपण एखाद्या रमणीय स्थळी फिरावयास जाऊन सुखद क्षणांचा आनंद घेऊ शकाल. जेथे नदी किंवा समुद्र असेल अशा ठिकाणी सुद्धा आपण फिरावयास जाऊ शकता. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्यात यशस्वी होऊ शकाल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा चांगला आहे. आपली प्रिय व्यक्ती आपल्या सहवासात स्वतःच्या भविष्याचा अंदाज घेईल. व्यापाऱ्यांना साता समुद्रापार व्यापार करून मोठा फायदा होईल. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. काही नवीन लोकांशी मैत्री होईल. आपण एखादे महागडे घड्याळ किंवा नामांकित कंपनीचे कपडे खरेदी करण्यात खूप पैसा खर्च करू शकाल.2 / 12हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. तेव्हा ह्या गोष्टीं पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा तसेच योग्य प्रमाणात व्यायाम करावा. वैवाहिक जीवनात थोडा ताण वाढेल. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा कठीण परिस्थिती निर्माण करणारा आहे. परंतु आव्हानांचा सामना करण्याची कुवत आपल्यात असल्याने आपण अशा परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला असला तरी त्यांनी आठवड्याच्या सुरवातीस कोणतेही नवीन काम सुरु करू नये. त्यासाठी आठवड्याचे मधले दिवस जास्त अनुकूल आहेत. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.3 / 12हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने आपले कौशल्य इतरांच्या नजरेस पडेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल. विरोधक आपणास त्रास देऊ शकणार नाहीत. ह्या उलट अप्रत्यक्षपणे आपणास त्यांचा फायदाच होईल. वैवाहिक जीवनातील तणाव संपुष्टात येतील. एकमेकांशी गोड बोलून एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीजनांना आपले संबंध अधिक दृढ करावे लागतील. काहीजणांना आपले नाते न आवडल्याने ते आपल्या प्रणयी जीवनास आव्हान देण्याची शक्यता आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या डोक्यात नवीन तंत्रांचे विचार येतील. आपण आपल्या व्यापारात एखाद्या नवीन नीतीचा अवलंब केल्याने व्यापारावर सकारात्मक परिणाम होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली झाल्याने त्यांचे समाधान होईल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात आंशिक यश प्राप्त होईल.4 / 12ह्या आठवड्यात आपणास नात्याचे महत्व समजेल. सार्थक व अतूट बंधनासाठी नात्यात किती खॊलवर प्रतिबद्धता असावयास हवी ह्याची आपणास जाणीव होईल. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबियांना खुश करण्यासाठी आपण पैसा खर्च कराल. त्यांच्यासाठी पैसा खर्च करून आपण आनंदित व्हाल. त्याच बरोबर आपले मित्र व नातेवाईक ह्यांच्यासाठी थोडा जास्त वेळ काढाल. व्यावसायिक आघाडीवर नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याची किंवा नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरु करण्याची आपली इच्छा होईल. ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आपण एखादे नियोजन करू शकाल. ह्याचा जर व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून आपण विचार केलात तर चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगू शकता. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमले तरी उत्तरार्ध अधिक चांगला फलदायी होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपण जर चिंता व तणावास दूर ठेवू शकलात तर आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकाल.5 / 12हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण अत्यंत व्यस्त राहाल. त्याच बरोबर अनेक चिंताने आपण घेरले जाल. कुटुंबात एकाचवेळी अनेक घटना घडत राहतील, त्या आपणास एक एक करून आपल्या सल्ल्याने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. असे केल्यानेच सर्व समस्यांचे निराकरण शक्य होईल. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. वैवाहिक जोडीदाराचा हस्तक्षेप सुद्धा आपणास आवडणार नाही. अशा वेळी थोडा धीर धरावा. विवाहेच्छुकांना चांगली बातमी मिळण्याची संभावना आहे. प्रेमीजनांची प्रिय व्यक्ती त्यांच्याशी सहमती दर्शवेल. आपल्या प्राप्तीत वृद्धी व खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणारे जातक एखाद्या गोष्टीने गोंधळून जातील. हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांच्या व्यापाराची वृद्धी होईल. सरकारी ठेकेदारीमुळे आपणास मोठा लाभ होऊ शकतो. विधी व न्याय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे.6 / 12ह्या आठवड्यात आपण अनेक कामात व्यस्त राहाल. आठवड्याच्या सुरवातीस एखादा प्रवास कराल. हा प्रवास आपल्या मित्रां सोबत मौज - मजा करण्यासाठीच असेल. त्यात आपली बरीचशी ऊर्जा खर्च होईल व त्यामुळे आठवड्याच्या उर्वरित दिवसात आपणास थोडा थकवा किंवा त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी आपले सहकारी आपल्या चुका शोधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने नोकरी करणाऱ्या जातकांना लक्ष पूर्वक काम करावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपणास व्यापार वृद्धीसाठी विचार करावा लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदाने भरलेले असेल. कुटुंबातील लहानग्यांना काही समस्या असण्याची शक्यता असल्याने त्यांना काळजी पूर्वक मदत करावी. आपली प्रकृती सामान्यच राहील. प्रेमीजनांना प्रेम हि एक मौल्यवान गोष्ट असल्याचे समजून घेऊन त्याचे मूल्यमापन करावे लागेल. हा आठवडा विवाहितांसाठी सामान्यच आहे.7 / 12डिसेंबर महिन्यातील हा आठवडा आपणास सामान्य फले देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कौटुंबिक जवाबदाऱ्यांप्रती खूपच व्यस्त राहाल. कुटुंबातील समस्या सोडविण्यात आपला बराचसा वेळ जाईल. त्यामुळे आपणास व्यक्तिगत जीवन व व्यावसायिक जीवन ह्यांचा समतोल साधण्यात आपण कमी पडल्याची जाणीव होईल. अशा परिस्थितीत आपण आपली कामे वेगाने कराल व त्याची आपणास फले मिळतील. प्रकृती उत्तम राहील. आठवड्याच्या मध्यास कुटुंबीय आपणास पाठिंबा देतील. आपली कामे लवकर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा चांगला असल्याची अनुभूती येईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा आनंदाने भरलेले असेल. आपणास स्वतःवर विश्वास ठेवून कामे करावी लागतील. कामात ज्या काही समस्या येतील त्यांना दृढ विश्वासाने सामोरे जावे लागेल.8 / 12ह्या आठवड्यात आपणास नव - नवीन चांगल्या बातम्या मिळतील. कुटुंबात एखादी खुशखबर येऊ शकते. एखाद्याचा विवाह ठरल्याने संपूर्ण कुटुंब एकजुटीने त्याची तयारी करू लागेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपला स्वतःवरचा विश्वास वाढल्याने कामे यशस्वी होतील. नशिबाची साथ मिळेल. आठवड्याच्या मध्यास प्रवासाची संधी मिळेल. छोटे प्रवास आपल्या उपयोगी पडतील. नवीन मैत्री सुद्धा संभवते. त्यांच्या सहवासात वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद आपल्या कामी येतील. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात स्वतःच्या वागणुकीमुळे अडचणी निर्माण होतील. तेव्हा काळजी घ्यावी. आपल्या वागणुकीत समतोलपणा राखावा. कोणत्याही अडचणींना मध्ये येऊ देऊ नये. कुटुंबात आनंद व प्रेम वाढेल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपली बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल.9 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. तसेच आपल्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपले मन प्रफुल्लित झाल्याने आपली प्रकृती अजून चांगली होईल. आपण इतरांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांप्रती प्रेम व आकर्षण वाढून जवळीक वाढेल व नाते अधिक दृढ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असला तरी आपली प्रिय व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. कसोटीच्या क्षणी त्यांना साथ द्यावी. नोकरी करणाऱ्या जातकांना आव्हानांचा सामना करून आपली कामे करावी लागतील. विरोधकांवर आपण मात करू शकाल. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. ते गिऱ्हाईकांची नाडी ओळखून आपल्या व्यापारातील वाटचाल करू शकतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.10 / 12हा आठवडा आपल्यासाठी आनंद निर्माण करणारा आहे. आपण सुखद आनंद घेऊन आपल्या व्यक्तिगत जीवनास त्यात कैद करण्याचा प्रयत्न कराल. नवीन मैत्री करून त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळेल. सामाजिक वर्तुळात वाढ होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. जुने आजार संपुष्टात आले तरी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. त्यात बिलकुल बेफिकीर राहू नये. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगले परिणाम मिळतील. व्यापारात उन्नती होईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या माध्यमातून सुद्धा आपणास मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी काहीसा नाजूक आहे. आपल्या नात्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.11 / 12हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपल्या प्राप्तीत वाढ होऊन खर्चात कपात होईल. असे झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे आपल्या जीवनातील ऊर्जा वाढून आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. आपल्या जुन्या योजना कार्यान्वित होऊन आपणास त्याचे चांगले परिणाम मिळू लागतील. आपल्यापैकी काहीजणांना परदेशी जाण्यात यशस्वी होता येईल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. आपल्या ज्ञानाची प्रशंसा होईल. विवाहितांच्या जीवनात प्रेम व आपुलकी वाढेल. कुटुंबात एखाद्या नव्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या कलात्मक प्रतिभेने आपली प्रिय व्यक्ती प्रभावित होईल. आपण त्यांना एखादी चांगली भेटवस्तू देऊ शकाल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे. ज्या कामांसाठी आपण प्रयत्न कराल त्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे आपली प्रतिमा उजळून आपल्या कामात वाढ होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा उन्नतीदायक आहे. ह्या आठवड्यात आपणास मित्रांसह फिरावयास जाऊन मस्ती करण्याची संधी मिळेल. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी सुद्धा मिळेल.12 / 12हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष दिल्याने कोणीही त्यात चूक शोधू शकणार नाही. आपली कामगिरी उत्तम होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. आपणास सामाजिक माध्यमांवर जाहिरात करून मोठा लाभ होऊ शकतो. प्राप्ती सामान्यच राहील. खर्च सुद्धा सामान्यच असतील. आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपणास आपल्या आहारावर लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक समाधान लाभेल. कुटुंबीय आपणास आपल्या कामात मदत करतील. आपणास आपल्या सहकाऱ्यांकडून काही नवीन गोष्टी समजतील, ज्यामुळे आपली कामगिरी अधिक उंचावेल. प्रेमीजनांसाठी दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या नात्यात प्रेम व रोमांस वाढेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदारास पूर्णपणे खुश करू शकतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications