शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 6 जून ते 12 जून 2021, 'या' राशीच्या लोकांना मानसिक सुख मिळणार; धनलाभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 8:49 AM

1 / 12
आठवड्यात आपण स्वतःवर अधिक लक्ष द्याल. आपल्यातील उणीवा शोधून व त्यात सुधारणा करून आपण आपले जीवन समृद्ध कराल. हि एक चांगली बाब होय. आपली मनःस्थिती आत्मचिंतन करण्याची असेल. आपणास चांगली प्राप्ती होईल. आपले विरोधक सुद्धा आपल्या मार्गात अडथळे निर्माण करण्याच्या मनःस्थितीत नसतील. आपले मनोबल उंचावेल. ह्या दरम्यान आपण एखादी स्थावर संपत्ती प्राप्त करू शकाल. आपणास प्रवासाची संधी मिळेल. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. विवाहितांना आपल्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकेल. व्याजावर पैसे लावणे फायदेशीर ठरेल. हा आठवडा शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्रतिकूल आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. आपणास कार्यात यश प्राप्त होईल.
2 / 12
आपल्यासाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस महत्वाची कामे करताना तहान - भूक विसरून आपणास कार्यरत राहावे लागेल. असे केल्यासच आपली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. ह्या दरम्यान आपल्यावर कामाचा दबाव राहील, जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकेल. कामाच्या ताणाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आपणास काम करताना थोडी विश्रांती घ्यावी लागेल. कौटुंबिक जवाबदाऱ्या उचलण्यात आपण यशस्वीपणे पुढाकार घ्याल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या कष्टाचे चीज होईल. ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास मोठा फायदा सुद्धा होईल. वैवाहिक जीवनात अधून मधून रुसवे - फुगवे होण्याची शक्यता असली तरी एकंदरीत आनंदाचे वातावरण राहील. प्रेमीजनांच्या पसंतीस आपल्या प्रियव्यक्तीचा प्रेमळ व गोड स्वभाव उतरेल. आपली प्रियव्यक्ती आपणास खुश करण्यात कोणतीच कुचराई करणार नाही. आठवड्याच्या अखेरीस आपण एखादा प्रवास कराल.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपल्या प्राप्तीच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मनास आनंद होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ झाल्याने काळजीत भर पडू शकते. आठवड्याचा उत्तरार्ध आपल्यासाठी महत्वाचा असेल. ह्या दरम्यान आपणास स्वतःचा विचार व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. अनेक वर्षांपासुन असलेली आपली एखादी इच्छा ह्या दरम्यान आपण पूर्ण करू शकाल. आपणास एखाद्या व्यक्तीचे प्रेम प्राप्त होईल. ह्या प्रेमळ सहवासामुळे हा आठवडा सुद्धा आपण आनंदात घालवू शकाल. आपली सर्जनशीलता व आपली स्वाक्षरी आपणास एका प्रभावी प्रेमीचे रूप प्रदान करून आपले प्रणयी जीवन आनंदीत करेल. विवाहितांच्या जीवनात रोमान्स वाढल्याने आनंद पसरेल. नोकरी करणाऱ्या जातकांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा ठरेल. आपल्या व्यापार विस्तारासाठी व मोठ्या ऑर्डर्स मिळविण्यासाठी आपणास एखाद्या तज्ञ व्यक्तीची आवश्यकता भासेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
4 / 12
आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या कुटुंबियांचे प्रेम व जवाबदाऱ्यांसह जीवन मूल्ये समजून घेऊ शकाल. ह्या दरम्यान आपणास आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. कोणत्याही विषयावर कुटुंबियांशी चर्चा करताना आपल्या अहंकारास नियंत्रणात ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात शक्यतो आपल्या हट्टी स्वभावास नियंत्रित ठेवावे. व्यावसायिक कार्यात सुद्धा वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसे न केल्यास सहकारी व कनिष्ठ ह्यांच्याशी संबंधात तणाव निर्माण होऊन आपल्या योजना अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास भागीदारी कार्यात थोडा विलंब संभवतो. आठवड्याच्या उत्तरार्धात नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाशी निगडित कार्यात मन रमणार नाही. प्रणयी जीवनात काही शंका व अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात औदासिन्य, तणाव व व्याकुळतेचा त्रास होऊ शकतो. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण एखाद्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन करण्याची शक्यता आहे. हा प्रवास आपल्यासाठी फायदेशीर होऊन आपणास एक नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या जातकांना कष्टाचे चांगले फळ मिळेल. व्यापाऱ्यांना प्राप्तीत वाढ करण्याची नवीन कल्पना सुचेल. असे असले तरी आपणास आर्थिक गुंतवणूक सुद्धा करावी लागेल. आपल्या खर्चात वाढ होईल. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. तसेच विरोधकांवर करडी नजर ठेवावी. प्रणयी जीवनात रोमान्स वाढून आपण आपल्या प्रियव्यक्तीस रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकाल. विवाहितांच्या जीवनावर जवाबदाऱ्यांचा प्रभाव राहील. ते आपला वेळ योग्य प्रकारे घालवू शकतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहिली तरी सर्दी - खोकला होण्याची शक्यता आहे.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास मोठाले लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या संपत्तीत व प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपल्या व्यापारास गती येईल. कोर्ट - कचेरीतील खटल्यात आपल्या बाजूने निर्णय लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात चांगले परिणाम मिळतील. त्यांना एखाद्या प्रवासामुळे सुद्धा चांगला लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. त्यांना वैवाहिक जीवनाचा आनंद मनसोक्तपणे उपभोगता येईल. जोडीदारासाठी थोडा खर्च सुद्धा करावा लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी विशेष अनुकूल नसल्याने त्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल. घरात दूरदर्शनचे चांगले प्रक्षेपण मिळविण्यासाठी तसेच कार्यालयीन दूरसंचार जाळे मजबूत करण्यासाठी आपण एखादी नवीन केबल जोडणी घेऊ शकाल. आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील, व त्यामुळे कार्यात यश प्राप्त होईल.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण जीवनातील साधेपणास प्राधान्य दिल्याने विशेष कष्ट करणार नाहीत. असे असले तरी काही लोक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करण्याच्या शक्यतेमुळे आपणास सावध राहावे लागेल. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपण पैसे देऊ नये. कार्यालयात एखाद्या व्यक्तीशी वाद होण्याची संभवता असून परिस्थिती आपल्या विरोधात जाण्याची शक्यता असल्याने आपण पूर्ण काळजी घ्यावी. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या व्यावसायिक भागीदाराच्या मदतीने आपल्या कामास वेगळ्या उंचीवर नेण्यात यशस्वी व्हाल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या प्रियव्यक्तीसह बाहेर फिरावयास जाण्याची योजना सुद्धा आखू शकाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमीजनांना सुद्धा सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आव्हानांवर विजय प्राप्त करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल, तसेच स्वतःवर विश्वास निर्माण करावा लागेल. आपल्यात खूप कौशल्य आहे, तेव्हा त्याचा योग्य प्रकारे वापर करा. विवाहितांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. असे असले तरी आपल्या कार्यकौशल्याने व तीव्र बुद्धिचातुर्याने आपण कठीण आव्हानांचा सामना करून आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रेमीजनांना काही चांगले परिणाम प्राप्त होतील. आपली प्रियव्यक्ती कुटुंबियांसह आपणास सुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. नोकरी करणाऱ्या जातकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अतिआत्मविश्वासा पासून दूर राहावे. व्यापाऱ्यांनी आपल्या भागीदाराशी संबंध टिकवून ठेवावेत. आपले आरोग्य उत्तम राहील. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीशी आपले वाद होऊन नंतर आपल्यावर पश्चातापाची वेळ येण्याची शक्यता असल्याने अशा वादा पासून दूर राहण्याची काळजी घ्यावी. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास समाधान लाभेल. खर्च वाढत गेले तरी आपण हळू हळू त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एखादी योजना आखाल. वैवाहिक जीवनात भरपूर रोमांस निर्माण झाल्याने आपण त्याचा मोकळेपणाने आनंद उपभोगू शकाल. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना सुद्धा चांगले परिणाम मिळतील. मात्र, एखाद्या गोष्टीमुळे दोघात लटके भांडण सुद्धा होऊ शकते. त्यास उग्र रूप न देता लटकेपणातच राहू द्यावे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टांचे चांगले फळ मिळेल. आपल्या कष्टांचे चीज होईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा संभवतो. आपला व्यावसायिक भागीदार एखादी मोठी ऑर्डर घेऊन येईल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या मातेच्या प्रेमाने भारावून जाऊन तिची सेवा कराल. मातेसह वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. कामा निमित्त केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपण खूप कष्ट उपसाल. इतकेच नव्हे तर आपल्या कष्टांचे परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे लोकांच्या नजरेस आपले चांगले काम येईल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापारात आपल्या भागीदाराशी काही मतभेद होण्याच्या शक्यतेमुळे आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल. विवाहितांच्या जीवनात जोडीदारामुळे काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदार रागाच्या भरात आपणास वाईट वाटेल अशा काही शब्दांचा वापर करेल. अशा परिस्थितीत स्वतः संयमित राहिल्यास आपण परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकाल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात सावध राहावे लागेल. खोट्या व कटू शब्दांचा वापर टाळल्यास प्रणयी जीवनात गोडवा टिकून राहील. ह्या आठवडयात खर्चात कपात होईल. शत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. आठवड्यात प्रकृतीत सुधारणा होईल.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करण्याची शक्यता आहे. मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. आपल्या कामात मित्रांची मदत होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल. आता आपली स्थिती मजबूत होईल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. विरोधक माघार घेतील. प्रकृतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. समतोल आहारावर भर द्यावा. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. आपणास मात्र आपल्या वागणुकीत होणाऱ्या परिवर्तनावर लक्ष ठेवावे लागेल. विनाकारण कोणाशी वाद घालत बसू नये. प्रणयी जीवनात रोमान्स वाढून एकमेकांशी जवळीक साधण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवन आनंदी राहील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष देऊ शकाल, व त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपण कुटुंबियांसाठी सुद्धा थोडा वेळ काढाल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहिल्याने आपण आनंदित व्हाल. कौटुंबिक जीवनात आपल्या समोर काही नवीन गरजा येतील, ज्या आपण पूर्ण करू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवन आनंदाचे राहील. जोडीदार आपल्याशी कुटुंबियांच्या बाबतीत काही नव्या गोष्टी सांगेल, ज्या ऐकून आपणास आनंद होईल. जोडीदाराशी संपूर्ण आठवडा सामंजस्य टिकून राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला व आनंदाचा आहे. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. असे असले तरी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने आपण दुखावले जाऊ शकता. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष