शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2021; "या" राशीच्या मंडळींना भाग्योदयाचा योग तर काहींना जपून राहण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:17 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या मातेस आपल्या प्रेमाची जाणीव करून द्याल. कुटुंबाच्या गरजा ओळखून खर्च कराल. अनेक ठिकाणी प्रत्यन केल्या नंतरच आपणास कामाच्या बाबतीत यश प्राप्त होईल. आपले विरोधक सक्रिय होऊ नयेत म्हणून इतरांच्या कामाच्या बाबतीत आपण काळजी करू नये. आपण आपल्या प्राप्तीत वाढ करण्यात यशस्वी व्हाल. आपणास व्यापारातून सुद्धा चांगला फायदा होईल. ह्या आठवड्यात आपणास वाहन किंवा संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील. प्रेमीजनांना प्रगती करण्यात यश प्राप्त होऊ शकेल. तणाव कमी होतील. जेथे समुद्र किंवा नदी असेल अशा ठिकाणी प्रवास करून आपण आनंदित व्हाल.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपण एखादा प्रवास करू शकाल. कुटुंबातील लहानग्यांना फिरावयास घेऊन जाऊन आपण खुश व्हाल. कुटुंबातील प्रेम भावना वृद्धिंगत होईल. तसेच नातेवाईक व शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. ह्या आठवड्यात आपणास मित्रांमुळे सुद्धा खूप फायदा होईल. तसेच आपल्या व्यवसायात त्यांची मदत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा आवश्यकता भासल्यास मित्रांच्या मदतीने प्रगती साधता येईल. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी चांगला आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपणास एखाद्या शासकीय योजनेचा लाभ मिळाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च नियंत्रणात राहिल्याने आपल्यावर कोणताही ताण राहणार नाही. आपली प्रकृती उत्तम राहील.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरुवात काहीशी आव्हानात्मक राहील. आपणास आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आपल्या कामात यश प्राप्तीसाठी खूप कष्ट सुद्धा करावे लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामातील चुकारपणा महाग पडू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या कौशल्याच्या व अनुभवाच्या जोरावर ते आपल्या कामात प्रगती साधू शकतील. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. घरात एखादा समारंभ आयोजित करू शकाल. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीची ओळख कुटुंबियांशी करून देण्यात यश प्राप्त होईल व त्यामुळे त्यांचे मन आनंदित होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. जीवनाप्रती आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची इच्छा जागृत होईल. आपली प्राप्ती सामान्य राहिली तरी खर्च सुद्धा त्यानुसारच होतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
4 / 12
आठवड्याच्या सुरवातीची ग्रहस्थिती आपणास अनुकूल आहे. ह्या दरम्यान आपण आपले कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्यात उत्तम ताळमेळ साधू शकाल. व्यावसायिक आघाडीवर प्रगती होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्रेम व विवाह ह्यांच्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत हळू हळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान नात्यातील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज भासू शकते. आठवड्याचा पूर्वार्ध आरोग्याच्या बाबतीत काहीसा त्रासदायी ठरण्याची शक्यता आहे. आपणास जर आधी पासूनच एखादी समस्या असेल तर ह्या दरम्यान ती पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आठवड्याच्या मध्यास आपले उत्पादन किंवा सेवा ह्यांच्याशी संबंधित तक्रारींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक आघाडीवर ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपणास अतिरिक्त पैसा खर्च करावा लागू शकतो. आठवड्याचा उत्तरार्ध व्यावसायिकांसाठी चांगला राहण्याची संभावना आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपल्या खिशावर ताण येऊ शकतो. त्या मानाने प्राप्ती कमी होणार असल्याने आपले आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे. मानसिक तणाव वाढले तरी जस जसे दिवस सरतील तस तसे सर्व काही सुरळीत होईल. आपली प्रेम व आकर्षण भावना वृद्धिंगत झाल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनास उभारी येईल. प्रणयी जीवनात सुद्धा प्रगल्भता येऊन आपली प्रिय व्यक्ती आपल्या सहवासात वेळ घालविण्याची संधी शोधेल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्यासच आपली कामे होतील. ह्या आठवड्यात व्यापारी वर्गास शांत राहावे लागेल. बाजारात स्पर्धा वाढल्याने आपणास आपली व्यापार विषयक नीती बदलावी लागेल. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. आरोग्य उत्तम राहील. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून आपला आत्मविश्वास वाढविणारा आहे. आपल्यात एक तजेला येईल व त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. आपल्या वैवाहिक जीवनात आलेली नीरसता दूर होऊन रोमांस वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी त्रासदायी होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीमुळे आपणास त्रास होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कष्ट वाढवावे लागतील. तसेच नोकरीशी संबंधित कामासाठी एखादा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. आपल्या खर्चात वाढ होऊन बँकेतील शिल्लक रकमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने खर्च कसे कमी होतील ह्याचा विचार करावा लागेल. व्यापारात उन्नती होईल. कौटुंबिक वातावरणाने आपले समाधान झाले तरी एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता सुद्धा आहे. आपली प्रकृती सुद्धा काहीशी नाजूक होण्याची संभावना आहे.
7 / 12
हा आठवडा आपल्या काही चांगल्या निवडक आठवड्यां पैकीचा एक आठवडा असेल. ह्या आठवड्यात आपण आपल्या कामात प्रशंसा व उपलब्धता दोन्ही प्राप्त करू शकाल. आपणास फक्त लक्षपूर्वक आपल्या व्यवहारातील संतुलन साधावे लागेल. आपले वरिष्ठ एखाद्या चांगल्या कामासाठी आपले नाव सुचवू शकतात व त्यामुळे आपणास कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकेल. आपल्यापैकी काहीजणांना आपल्या प्रिय व्यक्ती कडून एखादा महागडा मोबाईल भेट मिळण्याची शक्यता असून त्यामुळे आपणास खूप आनंद तर होईलच शिवाय आपल्यातील संवाद सुद्धा वाढेल. नाते अधिक दृढ होईल. विवाहितांना हा आठवडा आनंदात घालविण्याची संधी मिळेल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास मदत करेल व आपल्या प्राप्तीत वाढ करण्यास सुद्धा कारणीभूत ठरेल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण एखादा चांगला चितपट बघण्यास जाऊ शकाल.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नशिबाची साथ मिळून आपली कामे होतील. कमी कष्टात सुद्धा आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नती संभवते. आपली कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना सुद्धा छोटे - छोटे प्रवास करण्याची व त्यातून फायदा मिळविण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती उत्तम राहील. अनेक ठिकाणी आपली प्रशंसा केली जाईल. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीस फिरावयास घेऊन जाऊन आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपल्यात पूजा पाठ करण्याची इच्छा जागृत होऊन आपली वृत्ती काहीशी धार्मिक होईल. रोज सकाळी सूर्यास अर्घ्य देणे आपल्यासाठी फायदेशीर होईल. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला आपल्या उपयोगी येईल.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस शक्यतो प्रवास टाळावेत व खर्च सुद्धा विचारपूर्वक करावेत. आपले पैसे कोणास उसने देऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आळस झटकावा. नोकरीत काही समस्या वाढल्याने आपण असंतुष्ट व्हाल. मात्र हा आठवडा नाजूक असल्याने कामे बिनचूक करण्याचा व मेहनत वाढवण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात काही बदल केल्यासच यश प्राप्त होऊ शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या कुटुंबियां बरोबर व्यस्त राहील. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद पुन्हा साजरा करण्याची संधी मिळेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपले वैवाहिक जीवन अत्यंत आनंदात घालवू शकाल. ह्या आठवड्यात आपले नातेवाईक आपल्या भेटीस येण्याची शक्यता असून घरातील वातावरण आनंदी होईल. तसेच आपला वैवाहिक जोडीदार सुद्धा खूप खुश होईल. वैवाहिक जीवनाचे सौख्य उपभोगण्याची संधी मिळेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा अत्यंत चांगला आहे. त्यांना आपल्या प्रियव्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामातील नैराश्या व्यतिरिक्त काही चांगली परिस्थिती निर्माण होऊन आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपण नवीन तंत्राचा वापर करून आपली कामे अधिक प्रभावीपणे करू शकाल. प्रकृतीत चढ - उतार येतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांना कामावर लक्ष देण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. आपण आपल्या चुका शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न केल्यास आपणास यश प्राप्त होऊ शकेल. आठवड्याचे सुरवातीचे व शेवटचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात अचानकपणे वाढ झाल्याने आपली आर्थिक घडी विस्कळीत होऊ शकते. आपल्या समोर कोणतीही आर्थिक समस्या निर्माण होऊ नये, म्हणून अशा परिस्थितीत आर्थिक बाबींकडे थोडे लक्ष द्यावे. ह्या आठवड्यात आपले विरोधक खूपच मजबूत होऊन आपल्याला त्रास देण्यात कोणतीच चूक करण्याची शक्यता नसल्याने आपणास त्यांच्या पासून सावध राहावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. त्यांना आपल्या व्यापारातून मोठा फायदा होईल. दूरवरच्या ठिकाणी व्यापार करून लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली होईल. आपणास कामाचे समाधान लाभेल. कौटुंबिक जीवन समाधानकारक असले तरी आपणास कौटुंबिक सौख्य लाभणार नाही. आपण कामात अत्यंत व्यस्त राहाल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी आपल्या खाण्या - पिण्यावर लक्ष ठेवावे लागेल. वैवाहिक जीवन सुखद राहील. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थी आपला अभ्यास वेळा पत्रकानुसार करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या फायद्याच्या गोष्टी आपणाशी करेल. त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा होऊन आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. खर्च सुद्धा वाढतील. कुटुंबियांच्या सुखासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. घरासाठी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. एकमेकांना नीट समजून घेतल्यामुळे आपल्यातील जवळीक वाढेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्कृष्ठ होईल. प्रकृती पूर्वीच्या मानाने चांगली राहील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष