शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २४ ते ३० एप्रिल २०२२; नवीन संधी अन् नोकरीत प्रगती; आठवड्यातील 'हे' दिवस तुमच्यासाठी चांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 7:59 AM

1 / 13
या आठवड्यात बुध, शुक्र आणि शनि यांचे सश्यांतर आहे. २४ रोजी बुध मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. २७ रोजी शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. २९ एप्रिल रोजी शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. ग्रहस्थिती अशौ- रवि, राहू आणि हर्षल मेष राशीत असतील, बुध वृषभ राशीत राहील. केतू तुळ राशीत राहील. प्लुटो आणि शनि यांची युती २९ पर्यंत मकर राशीत राहील. त्यानंतर शनि कुंभ राशीत जाईल. कुंभ राशीत मंगळ आणि शुक्र यांची युती २७ पर्यंत राहील. २७ पासून शुक्र मीनेत जाईल. मीनेत गुरु, नेपच्युत आहेत. रविवार, दि. २४ एप्रिल २०२२ रोजी दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री २.५३ पर्यंत चैत्र कृष्ण नवमी राहील, सायंकाळी ५.५२ पर्यंत श्रवण तर त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र राहील. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ५.३० पर्यंत मकर तर त्यानंतर कुंभ रास राहील, दिवस चांगला आहे. राहू काळे सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत राहील.
2 / 13
मेष- नवीन संधी मिळेल. हा सप्ताह धावपळीचा राहील. सतत नवनवीन संधी दिसतील. महत्वाचे निरोप येतील. थोडी द्विधा मनस्थिती राहील. दूरचे प्रवास होतील. पर्य़टनाच्या संधी मिळतील. मित्रमैत्रिणी यांच्या भेटी होतील. त्यांच्याशी बोलून मग मन मोकळे होईल. काही घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील जीवनसाथीची चांगली साथ राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार, रविवार चांगले दिवस.
3 / 13
वृषभ- नोकरीत प्रगती होईल. नशिबाची साथ मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली मदत करेल. जीवनसाथीचा सल्ला महत्वाचा ठरेल. नोकरी अनुकूल परिस्थिती राहील. अचानक मोठी संधी मिळेल. नोकरीत महत्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यातून तुमचा नावलौकिक वाढेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. सहकारी मदत करतील. चांगला सल्ला मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. कागदपत्रे सांभाळून ठेवा. मूल्यवान वस्तू गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्या. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार चांगले दिवस.
4 / 13
मिथुन- भाग्य साथ देईल. ग्रहमान अनुकूल राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वाहने जपून चालवा. भाग्याचे पाठबळ मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भागीदारी व्यवसायात सफलता मिळेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वाहन सुख मिळेल. आर्थिक उलाढाली जपून करा. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. इतरांना सल्ला देण्याचे टाळा. बाकीचे राहिले बाजुला आणि तुमच्यावरच खापर फोडले जाईल. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस
5 / 13
कर्क- मानसन्मान मिळेल : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल अशी स्थिती निर्माण होईल. अनेक दिवसांपासून सहन करत असलेल्या काही अडचणी दूर होतील, मनात आनंदी विचार राहतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल. भावंडांशी संबंधात सुधारणा होईल. गैरसमज दूर होतील. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अचानक काही अडचण येऊ शकते. थोडे संयमाने वागा. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. टीप बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
6 / 13
सिंह- संमिश्र ग्रहमान. संमिश्र परिस्थिती राहील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी सांभाळा. वेळच्या वेळी आहार घ्या. जीवनसाथी आपल्याला चांगला सल्ला देईल. मात्र आपण त्यातून बोध घेतला तर खरे. घरात ताणतणाव निर्माण होईल. थोडे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. वाहने जपून चालवा. प्रवासात काळजी घ्या. इतरांच्या भानगडीत पडू नका. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस
7 / 13
कन्या- कटू गोड अनुभव येतील. काही कटू गोड अनुभव येतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. दगदग होईल अशी कामे करू नका. प्रवास शक्यतो टाळा. थोडे सतर्क राहणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. मात्र आपण गैरसमज करुन घेऊ नका. कुणी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे व्यवहार सावधानपणे करा. कुणी काही सांगितले तर लगेच हुरळून चाऊ नका. संयम ठेवा. टीप- रविवार बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
8 / 13
तूळ- दगदग होईल. नोकरी कामाचा व्याप सांभाळताना धावपळ होईल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आपण भले आणि आपले काम भले असे धोरण ठेवा. घरी पाहुणे येतील. मुलांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचे कौतुक होईल. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. थोडे तब्येतीकडे लक्ष द्या. कागदपत्रे सांभाळून ठेवा. तसेच कुठेही सही करताना कागदपत्रे वाचून घ्या. वादविवादात पडू नका. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.
9 / 13
वृश्चिक- महत्वाचे कामे होतील. मनात आनंदी विचार राहतील. अनेकांचे सहकार्य़ मिळेल. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरतील. गुप्त शत्रुपांसून सावध राहा. आपली आपण काळजी घ्या. घरी पाव्हण्यारावळ्यांचा राबता राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. आर्थिक आवक चांगली राहील. स्वत:चे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहाल. टीप- सोमवार, मंगळवार, गुरुवार चांगले दिवस.
10 / 13
धनू- प्रगती होईल. प्रगतीला पूरक वातावरण राहील. आपल्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. नोकरीत उच्चाधिकार प्राप्त होतील. पगारवाढ व विविध सोयीसुविधा मिळतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. मुलांशी संवाद साधा, घरी पाहुणे येतील. घर आणि नोकरी यात समन्वय साधताना ओढाताण होईल. व्यवहारात बरकत राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. आलेल्या पैशातून गुंतवणूक करता येईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.
11 / 13
मकर- नोकरी चांगली स्थिती राहील. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत तुमच्या मताला किंमत राहील. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मात्र जुने वाद उकरुन काढू नका. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस
12 / 13
कुंभ- विविध लाभ होतील. ग्रहांचे भ्रमण तुम्हाला विविध प्रकारचे लाभ मिळवून देईल. आर्थिक आवक चांगली राहील. मालमत्तेच्या कामांना गीत मिळेल. त्यात तुमचा फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. सप्ताहाच्या मध्यावधीत मनावरील ताण निघून जाईळ. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळे. व्यवसायात विक्री चांगली होईल. मोठे सौदे फायद्याचे ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरातील विजेच्या उपकरणांची दुरुस्ती वेळीच करुन घ्या. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
13 / 13
मीन- अनुकूल घटना घडतील. मन प्रसन्न राहील. नवीन संधी मिळतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. प्रवासात काळजी घ्या. मूल्यवान वस्तू, सामान, कागदपत्रे याकडे लक्ष ठेवा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरात उत्सवी वातावरण राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. पूजापाठाचे आयोजन केले जाईल. प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य