शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १५ ते २१ मे 2022; लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही; अचानक लनलाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 8:25 AM

1 / 12
मेष – मौजमजा कराल, अतिशय सुरेख ग्रहमान आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन ओळखी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. त्यासाठी खर्च करण्याकडे कल राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपले महत्त्व वाढवणाऱ्या घटना घडतील. पूजापाठ करण्यात मन रमेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत धावपळ करावी लागेल. भाग्याची चांगली साथ राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. मित्र मैत्रिणी यांच्या सहवासात मनावरील ताण निघून जाईल. टीप – बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस
2 / 12
वृषभ – संयम सोडू नका. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. काम झालेच पाहिजे असा अट्टाहास करू नका. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. सप्ताहाच्या शेवटी आपली कामे मार्गी लागतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत थोडा ताणतणाव राहील. प्रवास शक्यतो टाळा. आर्थिक आवक चांगली राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. विविध प्रकारचे फायदे होतील. कायद्याची बंधने पाळा. टीप – सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस
3 / 12
मिथुन – दगदग, धावपळ करावी लागेल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तीशी बोलताना काळजी घ्या. आपली गोपनीय माहिती इतरांना देऊ नका. लोक त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायावर लक्ष केंद्रीत केल्यास फायदे होतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायात कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल. आरोग्याची काळजी घ्या. तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला जाईल. टीप – रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस
4 / 12
कर्क – अनुकूल परिस्थिती राहील. बऱ्याच दिवसानंतर अतिशय अनुकूल परिस्थिती अनुभवण्यास मिळणार आहे. थोडी दगदग झाली तर यश मिळत जाणार असल्याने दगदगीचे फारसे काही वाटणार नाही. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काही बदल होतील. घरी पाव्हण्या रावळ्याचा राबता राहील. मुले अभ्यासात प्रगती करतील. त्याचे कौतुक होईल. तुमच्या हातून चांगली कामे होतील. तुमची प्रशंसा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात बरकत राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. टीप – सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस
5 / 12
सिंह – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जुनी येणी वसूल होतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. एखाद्या व्यवहारात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे महत्व वाढेल. भावंडांशी गैरसमज होतील. घरी पाहुणे येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. थोडी आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचे योग येतील. स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळेल. टीप – रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस
6 / 12
कन्या – ग्रहमानाची साथ राहील. घरी पाहुणे येतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. भावंडाच्या भेटीगाठी होतील. प्रवास कार्य साधक ठरेल. मात्र प्रवासात दगदग होईल. त्यामुळे प्रवासाचे नियोजन नीट करा. व्यवसायात विक्री चांगली होईल. मुले प्रगती करतील. मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. प्रेम प्रकरणात संधी मिळेल. मात्र कुणी मोहात अडंकवणार नाही याची काळजी घ्या. टीप – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, चांगले दिवस
7 / 12
तूळ – लोकांची पारख होईल. या सप्ताहात आपण संयमाने वागण्याची गरज आहे. आपले कोण आणि परके कोण यातील फरक आपल्याला लक्षात येईल. त्यातून योग्य बोध घेऊन पुढील वाटचाल सुरू करणे ठीक राहील. योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्या. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत संमिश्र परिस्थिती राहील. हितशत्रूंपासून सावध राहा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र पटकन आपली प्रतिक्रिया देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. वाहनं जपून चालवा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. टीप – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस
8 / 12
वृश्चिक – विविध लाभ होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे फायदे होतील. मनावरील दडपण कमी होईल. मनात आनंदी विचार राहतील. मनासारखे भोजन मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू मिळतील. काहींना जवळचे प्रवास होतील. जर आपण प्रेमात असाल तर अनुकूल प्रतिसाद मिळेल. मुलांना अभ्यासात प्रगती करता येईल. सरकारी कामात यश मिळेल. अडून राहिलेली कामे अचानक गती धरतील. त्यामुळे हायसे वाटेल. टीप – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस
9 / 12
धनू -दुरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवासाचे योग्य नियोजन करा. माहिती घ्या. प्रवास कार्य साधक ठरतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळेल. घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. खेळीमेळीचे वातावरण राहील. भावंडांशी सख्य राहील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी काळजी घ्या. घरातील सदस्यांशी समन्वय साधला पाहिजे. मित्र, नातेवाईकांच्या संपर्कात राहा. काहींना महत्त्वाचे निरोप कळतील. टीप – रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस
10 / 12
मकर – कामाचा ताण कमी होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक राहील. मात्र अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. अन्यथा आलेला पैसा खर्च होऊन जाईल. घरी पाहुणे येतील. नोकरीत सहकारी म्हणावी तशी साथ देणार नाही. त्यामुळे जे काही कराल ते स्वबळावरच. मात्र आत्मविश्वासाने कामे कराल. त्यामुळे लोक चकीत होतील. व्यवसायात उलाढाली होतील. त्यात फायदा होईल. टीप – सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस
11 / 12
कुंभ – अधिकार मिळतील. भाग्याचे पाठबळ मिळेल. प्रवासाचे योग येतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. अधिकार मिळतील. मात्र कामाचा ताण राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. लोकांचे सहकार्य मिळेल. विविध प्रकारचे फायदे होतील. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जर घर किंवा शेती खरेदी करण्याचा विचार असेल तर मनासारखे व्यवहार घडून येतील. त्यात आपण फायद्यात राहाल आर्थिक आवक चांगली राहील. टीप – रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस
12 / 12
मीन – ग्रहमान अनुकूल राहील. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. आर्थिक बाजू चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे थोडे सावधपणे आणि संयमाने वागणे आवश्यक आहे. लोकांच्या शब्दावर लगेच भरवसा ठेवू नका. जाणकरांचा सल्ला घ्या. टीप – सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस (विजय देशपांडे ज्योतिष विशारद)
टॅग्स :Astrologyफलज्योतिष