Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय; १२ फुटांपर्यंत पाणी, एसटी डेपो बुडाला...घरंही पाण्याखाली By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 1:16 PM
1 / 15 कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा चिपळूणला मोठा फटका बसला आहे. चिपळूणचा एसटी डेपो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. लोक एसटीच्या टपावर बसून आहेत इतकं पाणी साचलं आहे. 2 / 15 चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी पावासामुळे झाडं कोसळली असून अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. 3 / 15 चिपळूणची मुख्य बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली असून अनेक दुकांनांमध्ये पाणी शिरलं आहे. 4 / 15 बाजारपेठेतील दुकानांचे तळमजले अक्षरश: पाण्याखाली गेले आहेत. एनडीआरफच्या टीम्स आता चिपळूणमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 5 / 15 चिपळूणमधील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून घरं देखील पाण्याखाली गेली आहेत. 6 / 15 चिपळूण बाजारपेठेला तर नदीचं रुप प्राप्त झालं आहे. २००५ सालापेक्षाही भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 7 / 15 कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळाधार पाऊस सुरू असून काल रात्रीपासूनच चिपळूणला याचा मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली. 8 / 15 चिपळूणमधील पूर परिस्थिती पाहता येथे तातडीनं मदत कार्य पोहोचवणं आता अत्यंत महत्वाचं झालं असून हेलिकॉप्टर्सची मदत देखील घेतली जाणार असल्याचं मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. 9 / 15 मुख्य शहरात देखील अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य पसरलं आहे. 10 / 15 चिपळूणच्या बाजारपेठेतील ही काल रात्रीची परिस्थिती. संपूर्ण दुकानं पाण्याखाली गेल्याचं चित्र. 11 / 15 अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य पसरलं असून काही ठिकाणी चक्क १२ फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. 12 / 15 पाण्याचा वेग देखील तीव्र असल्याचं दिसून येत आहे. यात नुकसानासह जीवीतहानी होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. 13 / 15 पुरामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. 14 / 15 चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे. प्रशासन देखील अलर्ट झालं असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे. 15 / 15 चिपळूणच्या मुख्य शहरीभागात देखील अनेक सोसायट्यांमध्ये तळमजल्यापर्यंत पाणी साचलं आहे. आणखी वाचा