ratnagiri Chiplun Flood Houses have been swept away historic flood situation
Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 3:21 PM1 / 12रत्नागिरीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरं वाहून गेली आहेत.2 / 12कोकणातील निसर्गरम्य चिपळूण पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याची ही भयानक दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत.3 / 12कोकण म्हटलं की बैठी कौलारू घरं असं समीकरण असतं. पावसात हिरव्यागार डोंगराळ भागात वसलेली ही घरं लक्ष वेधून घेत असतात. पण यावेळी पुराच्या हाहाकारानं चिपळूणमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालीय.4 / 12चिपळूण आणि खेडमध्ये अनेक ठिकाणी १२ फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. गेल्या १० तासांपासून पाणी उतरलेलं नाही5 / 12अनेक नागरिकांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जवळच्या इमारतींमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. कौलारु घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.6 / 12इमारतीचे तळमजले पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. पुराच्या १० तासांनंतर अखेर एनडीआरएफची एक टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. 7 / 12आसमंतातून कोसळणाऱ्या जलधारा आणि जगबुडी नदीचा पूर त्यात समुद्रातही भरती यामुळे कोकणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय.8 / 12पुरामुळे अनेक कोकणवासीयांचे संसार कोलमडून वाहून गेले आहेत. 9 / 12जवळपास ५ हजार लोकांना पुराच्या पाण्यानं विळखा घातल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी इमारतीच्या अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलं आहे.10 / 12गेल्या १० तासांपासून चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती कायम असून पुराचं पाणी काही कमी होताना दिसत नाहीय11 / 12चिपळूणच्या ग्रामीण भागासह शहरी भाग आणि बाजारपेठेतही महाभयंकर परिस्थिती पाहायला मिळते आहे.12 / 12पुराच्या पाण्यात बुडालेल्या वाहनांची ही छायाचित्र पाहूनच चिपळूणमधील गंभीर परिस्थितीची आणि नुकसानाची कल्पना येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications