By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:19 IST
1 / 8पुराच्या हाहाकारानंतर चिपळुणात सर्वत्र चिखल अन् पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ साचला आहे. पुराला मोठ्या हिमतीनं समोरं गेल्यानंतर चिपळूणकर आता हातात झाडू घेऊन सारंकाही पूर्ववत करण्यासाठी मेहनत घेतायत.2 / 8घराघरात, दुकानांत ढिगभर गाळ बाहेर काढणं आणि उद्ध्वस्त झालेलं सारंकाही पुन्हा उभारणं हे काही सोपं काम नाहीय. पण हे दिवस देखील निघून जातील या इच्छाशक्तीनं सारे चिपळूणकर जीवन पूर्ववत करण्याच्या कामाला लागलेत.3 / 8प्रत्येक चिपळूणकर एकमेकांच्या मदतीनं पुराच्या सर्व आठवणी पुसून टाकण्याच्या कामाला लागलेत. यात त्यांना अनेकांच्या मदतीचा देखील हातभार मिळतोय.4 / 8आधीच कोरोनाचं संकट त्यात पुरानं वेढलं अशा दुहेरी कोंडीत सापडलेले नागरिक खचून न जाता...डोळ्यातील अश्रू पुसून नव्यानं उभं राहण्यासाठी झटू लागलेत.5 / 8जे राहिलं ते आपलं आणि जे गेलं ते मेहनतीनं पुन्हा उभं करू असा निश्चिय करुन प्रत्येक जण काम करतोय.6 / 8आपलं घर आणि दुकानं तर स्वच्छ करणं झालंच, पण चिपळुणातील रस्त्यांवरच्या पुराच्या नकोशा आठवणी दूर करण्यासाठी नागरिक एकत्रितपणे मेहनत घेतायत.7 / 8अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यासोबत आलेला ३ ते ४ फूट चिखल आणि गाळ जमा झालाय. हे साफ करण्याचं मोठं आव्हान आज चिपळूणकरांसमोर आहे.8 / 8आपल्या नातेवाईंकांच्या मदतीसाठी काही जण मुंबई, ठाण्यासारख्या शहरातून देखील चिपळुणात येताना दिसत आहेत.