1 बीएचके फ्लॅटची किंमत किती? मुंबई पुणे भाडे किती? कोणत्या किंमतीतील घरे जास्त विकली जातायत... By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:26 AM
1 / 10 गेल्या वर्षभरात महागड्या घरांची विक्री वाढली आहे. त्या तुलनेत मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट झाली आहे. 2 / 10 देशातील प्रमुख शहरांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. मात्र, ४० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची विक्री सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे. 3 / 10 १ बीएचके घरे या श्रेणीत येतात. मात्र, काही शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी १ बीएचके घरेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा घरांची कोणत्या शहरात किंमत, त्याचे घरभाडे किती आहे, जाणून घेऊ या... 4 / 10 मुंबईत अंधेरीसारख्या मोक्याच्या ठिकाणी १ बीएचके घर घ्यायचे असल्यास किमान १ कोटी रुपये मोजावे लागतात. या ठिकाणी घरभाडेही भरपूर मिळते. 5 / 10 त्यानंतर बंगळुरू आणि नवी दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घरांच्या किमती येतात. इतर प्रमुख शहरांमध्ये किंमती ४० लाख रुपयांच्या आसपास आहेत. 6 / 10 ५० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ९,९३० घरांचीच विक्री पहिल्या सहामाहीमध्ये झाली 7 / 10 ५० लाख ते १ कोटी रुपये किंमतीच्या २९,८२७ घरांची विक्री या कालावधीत झाली. 8 / 10 १ कोटीपेक्षा जास्त किंमतीची २८,६४२ घरे पहिल्या सहामाहीत विकली गेली. 9 / 10 मुंबई (अंधेरी) ५०० चौरस फूट - ६० हजार; बंगळुरू (कोरमनगला) ६०० चौरस फूट - २५ हजार; कोलकाता (न्यू टाऊन) ६०० चौरस फूट - १५ हजार; नवी दिल्ली (वसंत कुंज) ६५० चौरस फूट - २० हजार; पुणे (हिंजेवाडी) ४५० चौरस फूट - १५ हजार; हैदराबाद (बेगमपेट) ५५० चौरस फूट - ९ हजार 10 / 10 सुरत (अदाजन) ६०० चौरस फूट - १३ हजार; चेन्नई (अण्णा नगर) ५०० चौरस फूट - १५ हजार; अहमदाबाद (बोपल) ४५० चौरस फूट - १५ हजार; मैसूर (जेपी नगर ६०० चौरस फूट - ९ हजार; पंजाब (झिरकपूर) ७२५ चौरस फूट - १५ हजार; लखनऊ (गोमती नगर) ५०० चौरस फूट - ९ हजार आणखी वाचा