दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना... By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:22 PM
1 / 10 आता शहरीकरण जसजसे वाढू लागले आहे तसतसे गावे ओस पडू लागली आहेत. शहरांची लोकांना सामावून घेण्याची क्षमता संपत चालली आहे. यामुळे आजुबाजुच्या गुंठ्या गुंठ्याला लाखोंचा भाव येऊ लागला आहे. 2 / 10 अनेकांची भल्या मोठ्या, गगनचुंबी इमारतींमध्ये फ्लॅट घेण्याची ऐपत नसते. मेन्टेनन्सही याचा हजारांत असतो. यामुळे बहुतांश लोक गुंठ्या-गुंठ्याचा जमीनी घेतात आणि तिकडे एकाला लागून एक असे बहुमजली घर बांधतात. 3 / 10 मुंबई, पुण्यासारख्याच नाही तर आता कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर सारख्या शहरांतही हीच परिस्थिती आहे. यामुळे ही घरे आणि तो परिसरही कंजेस्टेड झाला आहे. 4 / 10 दीड-दोन गुंठे जमीन घेतली असेल तर त्यात देखणे, सुंदर आणि प्रशस्त असे जागेचा योग्य वापर केलेले घर कसे बांधावे? असा अनेकांना प्रश्न पडतो. 5 / 10 खाली ग्राऊंड फ्लोअर व वर तीन मजले असे प्रशस्त घराचे डिझाईन आम्हाला सोशल मीडियावर सापडले आहे. पहा तुम्हाला कसे वाटले? हे असे डिझाईन तुमचे घर इतरांपेक्षा वेगळे ठरवेलच शिवाय येणारे जाणारेही मान वळून वळून पाहू लागतील असे आहे. 6 / 10 या घरामध्ये एन्ट्री करताच हॉल आहे. त्यात सोफा टीव्ही आदी आहे. यानंतर लगेचच किचन आहे. 7 / 10 किचनमध्ये देखील छोटे डायनिंग टेबल, मध्ये व एका बाजुला किचन ओटा आहे. त्यापुढे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. 8 / 10 वरती गेलात की बेडरुममध्ये ये-जा करण्याचा पॅसेज, बसण्यासाठी तीन आसनी सोफा ठेवण्यात आलेला आहे. 9 / 10 त्यानंतर दोन प्रशस्त बेडरुम आहेत. डबल बेड असला तरी आजुबाजुला फिरण्यासाठी ऐसपैस जागा आणि मोठ्या खिडक्या यामुळे बेडरुम फ्रेश लुक देत आहे. 10 / 10 ड्रेसिंग रुममध्ये देखील प्रशस्त डिझाईन करण्यात आलेली आहे. तसेच व़ॉशिंग मशीन, डिशवॉशरलाही घरात चांगली जागा देण्यात आलेली आहे. आणखी वाचा