शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Arranged marriage: अरेंज मॅरेजसाठी 'हो' म्हणण्यापूर्वी या 3 गोष्टी नक्की विचारा, नाही तर होईल पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 6:07 PM

1 / 7
भारतात बहुतांश लोक अरेंज्ड मॅरेजला प्राधान्य देतात. अरेंज्ड मॅरेजमध्ये वधू-वरांना एकत्रित आणण्याचे काम दोन्ही कुटुंबीयांकडून केले जाते. मात्र, जसजसे प्रकरण पुढे जाते, तसतसे बर्‍याच गोष्टी समोर येऊ लागतात.
2 / 7
अरेंज्ड मॅरेज करताना बोलणी पुढे नेण्यापूर्वी मुलं आणि मुली साधारणपणे केवळ कौटुंबिक आणि करिअरसंदर्भातच बोलत असतात. मात्र, अशा अनेक छोट-छोट्या गोष्टी आहेत ज्यांकडे लक्ष दिले जात नाही. अरेंज्ड मॅरेजमध्ये जोडीदारासोबत आनंदी जीवन जगण्यासाठी या 3 गोष्टींवर आधीच चर्चा करणे आवश्यक आहे.
3 / 7
फायनांशिअल कम्पॅटिबिलिटी - आजच्या काळात भावनांचा विचार करणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच आर्थिक दृष्ट्या विचार करणेही आवश्यक आहे. जर आपण दोघेही नोकरी करत असाल तर अरेंज्ड मॅरेजचा मुद्दा पुढे नेताना या मुद्द्यावरही मोकळेपणाने बोलायला हवे. जसे की, लग्नानंतरच्या खर्चाचाचा ताळमेळ कसा करणार? दोघांनाही खर्च अर्धा-अर्धा करायला आवडेल, की एकाची सॅलरी खर्च करत दुसऱ्याची सॅलरी सेव्हिंग करणे पसंत कराल.
4 / 7
मुलगी असेल आणि तिला लग्नानंतरही आई-वडिलांचा खर्च उचलायची इच्छा असेल, तर यासंदर्भात तुमच्या होणाऱ्या जोडिदाराला आधीच कल्पना देणे योग्य. एवढेच नाही, तर नोकरी करत नसलात तरीही, लग्नानंतर पैसे आणि पैशांसंदर्भात तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे, यासंदर्भातही तुम्ही तुमच्या होणाऱ्या जोडिदारासोबत चर्चा करू शकता.
5 / 7
भूतकाळासंदर्भात संपूर्ण माहिती द्या - अरेंज्ड मॅरेजसंदर्भात चर्चा पुढे नेत असताना, होणाऱ्या जोडीदाराला तुमच्या भूतकाळासंदर्भात स्पष्टपणे माहिती द्या. उदाहरणार्थ, तुमचा साखरपुडा तुटला असेल अथवा तुमचा घटस्फोट झाला असेल. यासंदर्भात आधीच उघडपणे बोलणे योग्य आहे.
6 / 7
काही महत्वाच्या गोष्टी न सांगितल्याने पुढे चालून पती-पत्नींमधील संबंध खराबही होऊ शकतात. कदाचित जी गुपिते तुम्हाला गुपितच ठेवायची इच्छा आहे, ती लग्नानंतर दुसऱ्या कुणाकडून तरी कळू शकतात. अशा परिस्थितीत नात्यात दुरावा येऊ शकतो.
7 / 7
घरातील कामांवर चर्चा करणेही आवश्यक - बहुसंख्य घरांमध्ये लग्नानंतर महिला घरातील जबाबदाऱ्या सांभाळतील, अशी अपेक्षा असते. जसे की, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आणि कपडे धुणे. जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल, तर लग्नापूर्वी या जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा करणे शहाणपणाचे ठरेल. तुम्हाला कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण कराय आवडेल आणि कोणत्या नाही, हे आधीच तुमच्या भावी जोडीदाराला संपष्टपणे सांगा. (सर्व फोटो - प्रतिकात्मक)
टॅग्स :relationshipरिलेशनशिपLifestyleलाइफस्टाइलmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार