शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

5 प्रकारचे Hug आणि त्यांचे अर्थ, मिठीच्या पद्धतीवरून समजून घ्या पार्टनरच्या मनातलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 2:10 PM

1 / 7
एक भावनिक आणि घट्ट मिठी तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमधील वेगवेगळे गैरसमज दूर करू शकतं. तसेच अनेक तक्रारीही दूर करण्याची यात क्षमता असते. त्यामुळे जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आपल्या पार्टनरला मिठी मारण्याआधी जास्त विचार करू नका.
2 / 7
मिठी मारणं ही फारच सिक्युर करणारं जेस्चर आहे. त्यामुळे जेव्हाही तुमची कुणी प्रिय व्यक्ती तुम्हाला घट्ट मिठी मारत असेल तर तुम्हाला सेफ्टी, रिस्पेक्ट आणि काळजीची जाणीव होते. आश्चर्याची बाब म्हणजे मिठी मारल्याने केवळ नातीच मजबूत होत नाहीतर याने तुमचा तणावही कमी केला जाऊ शकतो.
3 / 7
रेस्ट-ऑन-शोल्डर हग - जर तुम्ही नेहमीच तुमच्या पार्टनरला अशी मिठी मारत असाल तर तुमच्या नात्यामध्ये खूप प्रेम, समजूतदारपणा आहे. तुम्हाला त्यांच्या असण्याने शांत वाटतं आणि त्यांना स्पर्श तुम्हाला आनंद देतो.
4 / 7
द बॅक हग - पाठीमागून मिठी मारून तुमचा जोडीदार तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की, तो तुम्हाला बराच वेळापासून मिस करत आहे आणि जर तुमचा जोडीदार नियमितपणे तुम्हाला अशी मिठी मारत असेल तर हे समजून घ्या की, त्याला किंवा तिला तुम्हाला प्रेमाची जाणीव करून द्यायची आहे. यातून हेही समजतं की, जेव्हा ते तुम्हाला पाठीमागून मिठी मारून घट्ट पकडतात तेव्हा ते तुमच्या बाबत प्रोटेक्टिव असतात.
5 / 7
ग्रेस ऑन वेस्ट हग - याप्रकारच्या मिठीतून समजतं की, तुम्ही तुमचं तुमच्या जोडीदारासोबत खूप घट्ट नातं आहे. ज्यात प्रेम, विश्वास आणि खूपसारा रोमान्स आहे. याने तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात गोष्टी रोमांचक करण्याची एक सुंदर पद्धत आहे.
6 / 7
नेवर लेट यू गो हग - ही एक अशी मिठी आहे ज्यात दोन लोक एकमेकांना खूप जवळ येऊन घट्ट मिठी मारतात. यात व्यक्ती दोन्ही बाहूंमध्ये घेऊन तुम्हाला मिठी मारली जाते. यातून हे दिसून येतं की, तुम्हाला दोघांनाही एकमेकांपासून वेगळे होण्याची भिती वाटते. याला डेडलॉक हग असंही म्हणतात. अशाप्रकारे मिठी मारणं म्हणजे कमिटमेंट, विश्वास आणि यूनिटीचं प्रतीक आहे.
7 / 7
वन-आर्म हग - या मिठीचे दोन अर्थ आहेत. पहिला 'फ्रेंड-जोन' चा उद्देश दर्शवतो, तर दुसरा अर्थ हा आहे की, तुमच्या जोडीदाराला सार्वजनिक रूपाने एका कपलसारखं नातं दाखवायचं नाहीये. ही मिठी कमिटमेंट इश्यूसोबत जुळलेली आहे. अशा मिठीला अर्धी मिठी म्हटलं जातं.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप