55 percent married indians have cheated their partner most are women extramarital affairs myb
महिला की पुरूष? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये पहिला नंबर कोणाचा, जाणून घ्या रिसर्च By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 12:46 PM1 / 10भारतीय संस्कृतीत लग्नाला खास महत्व आहे. पति-पत्नीचं नातं हे खूप पवित्र मानलं जातं. लग्न झालेल्या कपल्सने एकमेकांशी प्रमाणिक राहयला हवं. असे समज जरी असले तरी भारतातील सुमारे ५५ टक्के महिला या आपल्या पार्टनरसोबत लॉयल नाहीत. 2 / 10तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये सर्वाधिक आहे. हा सर्वे दिल्ली, मुंबई , बँगलोर, चेन्नई ,हैदराबाद, कोलकाता आणि अमदाबाद या ठिकाणी करण्यात आला होता. 3 / 10हा सर्वे २५ ते ५० या वयोगटातील लग्न झालेल्या व्यक्तींवर करण्यात आले होता. ४८ टक्के लोकांचं असं मत आहे की दोन पार्टनर असणं ही खूपच सामान्य गोष्ट आहे. म्हणूनच अनेक लोक आपल्या पार्टनरच्या अफेअरबद्दल कळलं तरी सत्य स्वीकारून पार्टनरला माफ करतात. 4 / 10या सर्वेनुसार ४० टक्के लोकांचं असं मत आहे की जर सगळ्या मर्यादा पार केल्या असतील तर पार्टनरला माफ केलं जाऊ नये. ६९ टक्के लोकांचे मत असं आहे की त्यांचा पार्टनर त्यांना अफेअरबद्दल कळून सुद्धा माफ करेल. तेच ७ टक्के लोक कशाचाही विचार न करता आपल्या पार्टनरला माफ करतात. असं निदर्शनास आलं. 5 / 10या सर्वेनुसार असं दिसून आलं की घटस्फोट घेण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी आहे.6 / 10 तसंच अनेकांना आपल्या पार्टनरकडून शारीरिक सुख मिळत नसल्यामुळे त्यांचे बाहेर पार्टनर असतात. तसंच डेटींग एप आणि सोशल मिडीयामुळे अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येतं. मानवी शरीराला सेक्सची गरज असते. सेक्सच्या आवश्यकतेची पूर्तता झाली नाही तर माणसं विवाह बाह्य संबंधांकडे वळतात. कारण पार्टनरकडून त्यांना शारीरिक सुख मिळतं नसतं. त्यावेळी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशीं जवळीक साधायला सुरूवात होते. 7 / 10विवाहबाह्य संबंध ठेवत असलेल्या महिलांचे प्रमाण अधिक होते. ५३टक्के महिलांनी हे स्वीकारलं आहे की त्यांचे त्यांच्या पती शिवाय इतर पुरूषांसोबत सुद्ध शारीरिक संबंध आहेत. याऊलट ४३ टक्के पुरूषांनी ही बाब स्वीकारली आहे. महिलांचा आकडा जास्त आहे.8 / 10डेटींग एपच्या ‘ग्लीडन’ यांच्यामते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर युजर्सच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. 9 / 10ज्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे. ती व्यक्ती तुमच्यापासून दूर राहत असेल तर त्याला कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असते. म्हणूनच माणसाने एकटेपणाला घालवण्यासाठी बऱ्याच वेळा विवाहबाह्य संबंध असल्याचे दिसून येते. तर वैवाहिक जोडीदार आपल्या पासून दूर राहत असल्यास संभोगाचे विचार मनात येऊन सुद्धा व्यक्ती विवाह बाह्य संबंधांकडे वळू शकतो.10 / 10घरच्यांचा दबाव असणे, दडपण असणे. यांमुळे २० वर्षाच्या वयातच काही मुलींना लग्नाला सामोरे जावे लागते. काही कालावधीनंतर आपण आयुष्याची मजा घेऊ शकलो नाही. अशी भावना निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींच मन चंचल होत जात. बाहेरच्या जगात आनंद शोधण्यासाठी मग विवाहबाह्य सबंध केले जातात.(wakecounseling, Pinterest) आणखी वाचा Subscribe to Notifications