9 Types of Hugs And What Each Says About Your Relationship
Hug Day : बाहों में चले आओ! मिठी मारण्याच्या पद्धतींवरुन जाणून घ्या तुमचे रिलेशन By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 4:38 PM1 / 10तरुणाईमध्ये सध्या व्हेलेंटाईन वीकचे जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. व्हेलेंटाईन वीकमधील सातही दिवस फार खास असतात. यातील प्रत्येक दिवसाचा स्पेशल संदेश आणि विशेष महत्त्व असते. 'रोझ डे'पासून 'व्हेलेंटाईन वीक'ची सुरुवात होते आणि बरोबर सातव्या दिवशी देशभरात 'व्हेलेंटाईन डे' जल्लोषात साजरा केला जातो. या वीकमधील आज 'हग डे' आहे. निशब्द राहून आपल्या भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी हग करणे (मिठी मारणे) ही सर्वात सोपी पद्धत आहे. आपल्या पार्टनरला हग करण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण यापैकी तुम्ही प्रामुख्याने ज्या पद्धतीनं आपल्या साथीदाराला हग करता, त्यावरुन त्याच्या/तिच्याबाबत असलेल्या तुमच्या भावनांचे वर्णन स्पष्टपण समोर येतात. हग करण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमच्या रिलेशनशिपबाबतची माहिती 2 / 10या पद्धतीस 'डेडलॉक हग' असेही म्हणतात. मिठी मारण्याच्या या पद्धतीमध्ये प्रचंड भावना सामावलेल्या असतात. 'मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही', अशा आशयाचा संदेश 'डेडी बेअर हग'मधून मिळतो. जर पार्टनरला या पद्धतीनं हग करत असाल तर तुम्ही तुमच्या नात्याबाबत गांभीर्यानं विचार करणारे आहात. शिवाय, दोघांच्या मनात एकमेकांबाबत खूप भावना असतात. पण, जर आपला पार्टनर वारंवार डेडी बेअर हग करत असाल तर कदाचित त्याला/तिला गमावण्याची भीती तुमच्या मनात असू शकते. याबाबत तुम्ही त्यांच्यासोबत बोलले पाहिजे. कारण बोलण्याने गैरसमज दूर होतात. पार्टनर पुढाकार घेत नसेल तर नात्यातले अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःहून बोलले हवे. यामुळे त्याला/तिला आपले नाते सुरक्षित आहे, अशी भावना मनात निर्माण होण्यास मदत होईल. 3 / 10अंतर ठेऊन मिठी मारणे, याचा अर्थ तुम्ही दोघंही एकमेकांसोबत कर्म्फटेबल नाहीत किंवा तुमच्या मनात एकमेकांबाबत कोणत्यातरी गोष्टीवरुन निराशा आहे. एखाद्या गोष्टीवरुन झालेले वाद, भांडणांवरुन पार्टनरला बऱ्याचदा एकमेकांसोबत राहावसं, जवळ यावसं वाटत नाही.4 / 10जर पार्टनर तुम्हाला धावत येऊन मिठी मारत असेल तर तुम्ही फार भाग्यवान आहात,असे समजावे. कारण या जोडप्यांना एकमेकांबाबत प्रचंड प्रेम असते. 5 / 10तुम्ही पार्टनरच्या खांद्यावर डोके ठेऊन त्याला/तिला मिठी मारत असाल तर तुमच्या नात्यात संवादाची कमतरता आहे. स्तब्ध उभ्या असलेल्या पार्टनरला नात्याबाबत काहीच कल्पना नसते तर, दुसरीकडे संपूर्ण विश्वास ठेऊन तुमच्या खांद्यावर डोके झोकून देणाऱ्या पार्टनरचे तुमच्या जिवापाड प्रेम आहे. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्यापूर्वी कुठे नेमकं काय चुकतंय, हे जाणून घ्या. 6 / 10मिठी मारताना एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहणाऱ्या जोडप्यांच्या नात्यामध्ये प्रचंड जवळीकता असते आणि त्यांचे नाते अतिशय सुंदर असते. ही जोडपी एकमेकांची कधीही फसवणूक करत नाही. कारण, या दोघांमध्ये कोणत्याही स्वार्थाशिवाय निव्वळ प्रेम असते. 7 / 10कोणत्याही एका बाजूने पार्टनरला हग करणाऱ्या जोडप्यांमध्ये रोमान्सची कमतरता असल्याचे म्हटले जाते. पण या जोडप्यांचं एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो. हे दोघंही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असतात. 8 / 10जे कपल एकमेकांना पाठीमागून हग करतात, त्यांचा एकमेकांवर खूप विश्वास असतो आणि या जोडप्यांना एकमेकांची सोबत फार सुरक्षित वाटते. 9 / 10पॅम्पर्ड हग करणाऱ्या जोडप्यांना एकमेकांबद्दल अतिशय काळजी असते. ही जोडपी एकमेकांसोबत दीर्घ काळापर्यंत एकत्र राहतात. 10 / 10अशा पद्धतीनं मिठी मारणाऱ्या जोडप्यांना एकमेकांबद्दल प्रचंड आकर्षण असते. आणखी वाचा Subscribe to Notifications