activities for children health
जाणून घ्या वयानुसार लहान मुलांनी कोणती अॅक्टिव्हिटी करावी By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 2:52 PM1 / 51. धावण्यानं हाडे होतात बळकट : तुमचे बाळ दोन वर्षांचे झाले की त्याला/तिला खेळ्यांच्या माध्यमातून व्यायाम करण्याची सवय लावावी. अॅरोबिक्स, धावणे, फुटबॉल यांसारख्या खेळाच्या प्रकारांमध्ये त्याला/तिला सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि हाडेदेखील मजबूत होतात. 2 / 52. डोळ्यांच्या व्यायामासाठी चेंडूसोबत खेळा : आपल्या मुलांसोबत खेळण्यासाठी दिवसातील काही वेळ राखून ठेवावा. चेंडू झेलण्याच्या खेळामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो. यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.3 / 53. चालावे : मुलांसोबत रोज 15 ते 30 मिनिटे नक्की व्यायाम करावा. त्यांच्यासोबत चालावे. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 4 / 54. चढाई करणे : मुलांना चढाईच्या (क्लायम्बिंग) खेळ प्रकारात सहभागी करुन घ्यावे. यामुळे हात, पाय आणि पाठीची हाडे मजबूत होतात.5 / 55. गेम्स अॅक्टिव्हिटीदेखील आवश्यक : 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना सायकलिंग, टेनिस, स्केटिंग, स्विमिंग यांसारख्या खेळाच्या प्रकारांमध्ये सहभाग घेण्यासाठी ट्रेनिंग क्लास लावावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे. आणखी वाचा Subscribe to Notifications