शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पालकांच्या 'या' सवयी मुलांसाठी ठरू शकतात हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 3:19 PM

1 / 6
लहान मुलांना सांभाळणं, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणं पालकांसाठी थोडं कठिण काम असतं. लहान मुलं नेहमीच अनेक गोष्टींमध्ये आई-बाबांचं अनुकरण करत असतात. पालकांच्या काही चुकीच्या सवयींचा मुलांवर वाईट परिणाम होतो.
2 / 6
ऑफिसच्या कामामुळे आई-वडील खूप व्यस्त झाले आहेत. रात्री जागरण करणं, व्यायाम न करणं अशा गोष्टी कामाच्या गडबडीत पालक करत नाही. याचा परिणाम मुलांवर देखील होतो. मुलंही तसंच रुटीन फॉलो करतात. त्यामुळे ते आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो.
3 / 6
कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पालक काही वेळा मुलांना घरच्या आहाराऐवजी बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्याची सवय लावतात. काळी काळाने जंकफूड मुलाचं फेवरेट होतं. मात्र चुकीचा आहार हा मुलांच्या शरिरासाठी घातक ठरू शकतो.
4 / 6
अनेकांना टीव्ही पाहत जेवण्याची सवय असते. लहान मुलं जेवायचा कंटाळा करतात तेव्हा त्यांना टीव्ही पाहत भरवलं जातं. पण हे चुकीचं आहे कारण यामुळे मुलांचं लक्ष हे जेवणावर नाही तर टीव्हीत जास्त असतं. त्यामुळे मुलांना शरिरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक मिळत नाहीत.
5 / 6
मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे अनेक पालक त्यांना खासगी क्लासला पाठवतात. मात्र पालकांनी अशाप्रकारे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.
6 / 6
मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी देखील चांगल्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवा, शांत वातावरण ठेवा, कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या, मोठ्यांचा आदर करा म्हणजे लहान मुलं देखील अशाच पद्धतीने वागतील.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्व