best tips to put your infant baby to sleep
लहान मुलं लवकर झोपत नाहीत का?, 'या' टिप्स करतील मदत By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 1:16 PM1 / 7लहान मुलं खूप मस्तीखोर असतात. तसेच झोपतानाही खूप नखरे करतात. मुलं लवकर झोपत नसतील तर 'या' टिप्स तुम्हाला मदत करतील. 2 / 7लहान मुलांना उपाशी पोटी झोपवू नका कारण तसं केल्यास रात्री भूक लागल्यावर ते झोपेतून उठतात. तसेच पोट भरलेलं असताना मुलांना शांत झोप लागते. 3 / 7लहान मुलांच्या झोपण्याची एक वेळ निश्चित करा म्हणजे मुलं त्यावेळेत शांत झोपतील. 4 / 7लहान मुलांना पाळण्यात झोपण्याची सवय असते. मात्र पाळण्यात झोपवताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 5 / 7लहान मुलांना झोपण्याआधी अंघोळ घाला तसेच मालिश करा. यामुळे मुलांचं शरीर रिलॅक्स होतं आणि छान झोप लागते. 6 / 7लहान मुलांची तब्येत ठीक नसल्यास ते चिडचिड करतात. तसेच नीट झोपत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.7 / 7मुलांना गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे त्यांना झोपण्याआधी एखादी छानशी गोष्ट सांगा म्हणजे ते गोष्ट ऐकताना झोपी जातील. आणखी वाचा Subscribe to Notifications