शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 8:24 PM

1 / 5
1. खेळण्यावरील लेबल वाचा - प्रत्येक खेळण्यावर लेबल लावलेले असते. लेबलवर खेळण्याचे मटेरियल, वॉर्निंग आणि खेळणं हाताळण्याच्या पद्धतीसंदर्भात माहिती दिलेली असते. खेळण्याची खरेदी करताना लेबल आर्वजून वाचावे. यावरुन आपल्याला खेळण्यासंदर्भातील आवश्यक ती माहिती मिळण्यास मदत होते. महत्त्वाचे खेळण्याचे Expiry Date ही कळते. खेळण्याचा वापर केव्हा थांबवावा, याची माहिती आपल्याला समजते.
2 / 5
2. रिबिन किंवा स्ट्रिंग्स (Strings) - लहान मुले खेळता-खेळता चुकून रिबिन तोंडामध्ये टाकू शकतात. रिबिन पोटात गेल्यास, आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. हा धोका लक्षात घेऊन खेळण्यांना असलेले जास्तीचे रिबिन किंवा स्ट्रिंग्स कापून फेकून द्यावे. उत्तम उपाय म्हणजे रिबिन असलेली खेळणी विकत घेणे टाळावे.
3 / 5
3. खेळण्याचा आकार - लहान आकाराची खेळणी मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. आकारानं लहान असलेली खेळणी मुलांच्या तोंडामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे खेळणी खरेदी करताना खेळण्यांचा आकार पाहूनच खरेदी करावीत.
4 / 5
4. बॅटरीवरील चालणारे खेळणे - लहान मुलांची बरीचशी खेळणी बॅटरीवर चालणारी असतात. बहुतांश मुलांना खेळण्यातील बॅटरी चावण्याची सवय लागते. या सवयीचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो बॅटरीवर चालणारी खेळणी विकत घेऊ नये.
5 / 5
5. हेल्मेट - हेल्मेट वापरणं जेवढे मोठ्या माणसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगले आहे, तेवढेच ते लहान मुलांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. जर तुमची मुलं सायकल, स्कूटर, बाईक, स्केटबोर्ड यापैकी कशाचाही वापर करत असतील तर त्यांना हेल्मेट नक्की द्यावे. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करणं आवश्यक आहे.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप