Diwali 2019 best gift ideas for sister in diwali
Diwali 2019 : भाऊबीजेला बहिणीला द्या युजफूल गिफ्ट्स By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:52 PM1 / 8'भाऊबीज' हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. हटके गिफ्ट्स देऊन भाऊबीज स्पेशल करता येईल. 2 / 8महिलांना दागिन्यांची खूप हौस असते. त्यामुळे तुम्ही बहिणीला तिला आवडत असलेला छानसा दागिना गिफ्ट करा. ईयरिंग्स, ब्रेसलेट, पेंडेंट, नेकपीस अशा बजेटमधील विविध गोष्टी गिफ्ट करू शकता3 / 8मुलींना नेहमीच फॅशनेबल आणि ट्रेंडी कपड्याची क्रेझ असते. भाऊबीजच्या निमित्ताने ट्रेडिशनल, वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न कपडे गिफ्ट करा. 4 / 8बाजारात विविध आकाराची आणि रंगाची आकर्षक घड्याळं मिळतात. सध्या डिजीटल वॉचची चर्चा रंगली आहे. तुम्ही स्मार्ट वॉच गिफ्ट करू शकता. 5 / 8मुलींना कपड्यांसोबतच फॅशनेबल बॅग देखील प्रचंड आवडतात. त्यामुळे खास सणाच्या निमित्ताने स्टायलिश हँड बॅग गिफ्ट करणं हा उत्तम पर्याय आहे. 6 / 8महिलांना नटायला आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला ब्यूटी प्रोडक्ट्स गिफ्ट करून यंदाची दिवाळी आनंदात साजरी करा. 7 / 8बहिणीला फिरण्याची आवड असेल तर तिला एखाद्या सुंदर आणि शांत ठिकाणंच हॉलीडे पॅकेज गिफ्ट करा हे हटके गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. 8 / 8हेडफोन, पाकिट, पॉवर बँक, गॉगल, वॉच, पर्सनलाईज्ड फोन कव्हर यासारख्या लागणाऱ्या गोष्टी देखील गिफ्ट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications