exercise to get kids in these fun ways
मुलांसोबत मस्ती करत व्यायाम करण्याच्या या बेस्ट पद्धती, नक्की वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:45 PM1 / 7व्यायाम करणं केवळ मोठ्या माणसांसाठीच नाही तर लहान मुलांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फायदेशीर असते. यामुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास चांगल्या पद्धतीनं होतो. मात्र, बहुतेक वेळा लहान मुलं व्यायाम करण्यासाठी टाळाटाळ करतात. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा, यासाठी त्यांच्याकडून कठिणातील कठीण व्यायाम प्रकार करुन घ्यावा, असे गरजेचे नाहीय. फिरणे, धावणे, खेळणे, चढणे आणि उतरणे हेदेखील लहान मुलांसाठी कसरती चांगल्या ठरू शकतात. अशा प्रकारच्या व्यायामांमुळे लहान मुलांची लठ्ठपणा, हृदयाच्या समस्या आणि मधुमेह या समस्यांपासून सुटका होते. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांसाठी असलेल्या व्यायामाच्या काही मजेशीर पद्धती 1. भटकंती करावी : पळण्यानं किंवा मैदानी खेळ खेळल्यानं लहान मुलांच्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं होते. अशा पद्धतीच्या कसरती करुन घेण्यासाठी लहान मुलांना कोणत्याही पार्कमध्ये घेऊन जावे. तेथे मैदानी खेळ खेळून त्यांची योग्य पद्धतीनं कसरत होऊ शकते. 2 / 72. उड्या मारुन करा व्यायाम : लहान मुलांकडून शारीरिक कसरती करुन घेण्यासाठी उड्या मारणं हा व्यायामदेखील चांगला पर्याय आहे. मुलांच्या शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी, त्यांना सक्रीय ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत उड्या माराव्यात. यामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. मात्र, चुकीच्या पद्धतीनं हा व्यायाम करू नये, अथवा दुखापत होण्याची शक्यता असते. 3 / 73. कॅच कॅच खेळा : मुलांचं मनोरंजन करण्यासहीत त्यांच्याकडून व्यायाम करुन घेण्यासाठी कॅच-कॅच खेळा. यामध्ये त्यांच्या डोळ्यांचा व्यायाम होतो आणि मेंदूचाही विकास होण्यास मदत होते. 4 / 7 4. पोहण्याचा व्यायाम : पोहणे हा देखील एक व्यायामचा प्रकार मानला जातो. पोहण्यानं लहान मुलांचे वजन नियंत्रणात राहतेच शिवाय त्यांचे स्नायू देखील मजबूत होतात.5 / 75. डान्स करणं : जर तुमच्या मुलांना डान्स करणं आवडत असेल तर त्यांना डान्स करण्याची परवानगी द्यावी. डान्स करण्यामुळेही शरीराचा व्यायाम होतो. तुम्हीदेखील तुमच्या मुलांसोबत डान्स करावा, जेणेकरुन त्यांच्यासोबत तुमचाही व्यायाम होईल. व्यायामदेखील आणि त्यातून तुम्हाला आनंददेखील मिळेल. 6 / 76. स्केटिंग : स्केटिंग केल्यामुळे लहान मुलांचे वजन वाढत नाही. आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांसोबत स्केटिंग करण्यास पाठवा, खेळाखेळात त्यांचा व्यायाम होण्यासही मदत होईल.7 / 77. सायकलिंग सायलकलिंग करणं प्रत्येक मुलाला आवडते आणि व्यायामासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. प्रत्येक दिवशी कमीतकमी 30 मिनिटे तरी सायकल चालवावी. यामुळे मुले तंदुरुस्त राहतात. शिवाय त्यांचा मानसिक विकासही होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications