शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Father's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 2:47 PM

1 / 6
जरी फादर्स डे असला तरिही तुम्ही तुमच्या आजोबांना किंवा सासऱ्यांनाही स्पेशल फिल करून देऊ शकता. जर तुम्ही प्रत्येक वर्षी आपल्या वडिलांनाच गिफ्ट देऊन विश करत असाल तर यावेळी आपल्या आजोबांना गिफ्ट देऊन तेही तुमच्यासाठी स्पेशल असल्याची जाणीव करून द्या. फादर्स डेच्या निमित्ताने तुमचे वडिल त्यांच्या वडिलांसाठी काही खास करतीलच, पण तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही दिलेली वस्तू ही नेहमीच सर्वात आवडती राहिल... आज आम्ही तुम्हाला तुमच्या आजोबासांसाठी फादर्स डेसाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स सुचवणार आहोत.
2 / 6
वयोवृद्ध माणसांची नेहमी एकच समस्या असते, ती म्हणजे ते आपला चष्मा कुठेतरी ठेवतात आणि विसरून जातात. मग संपूर्ण घरभर शोधाशोध सुरू होते. अशातच तुम्ही तुमच्या आजोबांसाठी एक किचैन असणारा चष्मा घेऊन येऊ शकता. त्यामुळे ते चष्मा नेहमी स्वतःसोबत ठेवतील आणि सगळीकडे शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही.
3 / 6
पावसाला सुरुवात झाली असली तरी अजुनही उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. त्यामुळे आजोबा जेव्हा घराबाहेर पडत असतील त्यावेळी त्यांना घालण्यासाठी हॅट किंवा कॅप उत्तम ऑप्शन राहिल. तुम्ही पाहिजे तर, हे पर्सनलाइज्ड करू शकता. तसेच त्यावर तुम्ही आजोबांसाठी खास मेसेजही लिहू शकता.
4 / 6
पर्सनलाइज्ड कॅपप्रमाणे तुम्ही गरज असेल तर आजोबांसाठी एखादा कॉफी मगही देऊ शकता. शक्य असल्यास त्या मगवर त्यांचा एखादा छानसा फोटो आणि त्यावर एक मेसेज लिहू शकता.
5 / 6
जर तुम्हाला तुमच्या आजोबांना एखादं हायटेक गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना गूगल स्मार्ट स्पीकर गिफ्ट करू शकता. यामुळे ते घरातल्यांशी नेहमी कनेक्टेड राहतील आणि गाण्यांपासून इतर कामंही त्यांची अगदी सहज होतील.
6 / 6
आजोबांना देण्यासाठी हादेखील उत्तम ऑप्शन आहे. जर तुमचे आजोबा एखाद्या ट्रिपसाठई जाणार असतील, तर त्यांचं सामान या किटमध्ये ठेवू शकतात. त्यामुळे त्यांना सामान इकडेतिकडे शोधावं लागणार नाही.
टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनRelationship Tipsरिलेशनशिप