for the first time children are brushing keep these things in mind
मुलांना पहिल्यांदा ब्रश करायला शिकवताय?; मग 'या' गोष्टींची काळजी घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 2:55 PM1 / 8लहान मुलांची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. मुलांना दात आल्यानंतर त्यांना दात घासण्याची सवय लावावी लागते. मुलांना पहिल्यांदा ब्रश करायला शिकवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 2 / 8लहान मुलांसोबत पालकांनी ही ब्रश करावा. तसेच ब्रश करणं ही एक चांगली सवय असल्याचं मुलांना समजावून सांगा. 3 / 8बाजारात आकर्षक रंगीबेरंगी ब्रश उपलब्ध आहेत. त्यामुळे सुरुवातीला मुलांसाठी असाच एक ब्रश घ्या म्हणजे मुलांना दात घासताना मजा येईल. 4 / 8मुलांसाठी ब्रशची खरेदी करताना तो ब्रश सॉफ्ट आहे का हे नीट तपासून पाहा. मुलांच्या दाताला इजा होईल असा ब्रश निवडू नका. 5 / 8मुलांना सुरुवातीला आरशासमोर उभं राहून ब्रश करायला शिकवा. जेणेकरून त्यांना ते कसे ब्रश करत आहेत हे दिसेल. एखादं छानसं म्युझिक देखील लावा. 6 / 8तीन महिन्यांनंतर मुलांचा ब्रश बदला. त्यांच्यासाठी नवीन ब्रशची खरेदी करा. 7 / 8मुलांसाठी बाजारात काही खास टूथपेस्ट उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा. कारण त्या टूथपेस्ट फ्लोराईडमुक्त असतात.8 / 8सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दोन वेळा मुलांना ब्रश करायची सवय लावा. आणखी वाचा Subscribe to Notifications