how to decorate room of sports lover childrens
तुमची मुलं Sports Lover असतील तर अशी सजवा रूम By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 11:51 AM1 / 8लहान मुलांना खेळायला खूप जास्त आवडतं. घरातही खेळाचं वातावरण असावं असं त्यांना वाटत असतं. तुमची मुलं Sports Lover असतील तर त्यांची रूम कशी सजवायची हे जाणून घेऊया. 2 / 8मुलांची रूम सजवण्याआधी त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घ्या. कोणत्या खेळात रस आहे. त्यातील कोणकोणत्या गोष्टी त्यांना जास्त आवडतात हे जाणून घ्या. मुलांना आवडणाऱ्या खेळानुसार चांगल्या थीमची निवड करा. 3 / 8गेम्स थीमवर जेव्हा रूम सजवतो त्यावेळी अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे मुलांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर करू नका. 4 / 8रफ्फ वुडन ब्लॉगला हवं तसं पेंट करून त्याला हँगिंग पिन लावा. म्हणजे मुलं त्यांचं सामान त्याला लावू शकतात. 5 / 8ग्लवस, कॅप, फूटबॉल, बॅट, नेट यासह वेगवेगळ्या थीमवर मुलांसाठी खास आणि आकर्षक बुक शेल्फ तयार करू शकता. तसेच त्यानुसार लँपची निवड करा. 6 / 8बॉल डाईस शेपमध्ये असलेल्या खुर्च्यांची बसण्यासाठी निवड करा. बाजारात लहान मुलांना आवडतील अशा सुंदर आणि रंगीबेरंगी खुर्च्या उपलब्ध आहेत. 7 / 8मुलांना माउटेनिंग, बास्केटबॉल, फुटबॉल यासारख्या खेळाची आवड असेल तर त्यानुसार रुमची भिंत तयार करून घ्या. खेळाडूचे फोटो ही पेंट करू शकता.8 / 8बेड कव्हर, उशी आणि खिडकीजवळ काही खेळणी ठेवा. रुममध्ये मुलांच्या आवडीच्या खेळाचे, खेडाळूचे फोटो लावा. आणखी वाचा Subscribe to Notifications