शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमची पत्नी चिडखोर आहे? अशावेळेला काय कराल? कशी हाताळाल परिस्थीती? त्यासाठी 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 4:45 PM

1 / 10
लग्नानंतर पती-पत्नींच्या नात्यात चढ-उतार येणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत, नातं टिकवून ठेवण्यासाठी, आपण समजूतदारपणा दाखवणं आणि आपल्या नातेसंबंधात प्रेम आणि विश्वास कायम ठेवणं आवश्यक आहे.
2 / 10
कधी कधी काही वाईट काळात किंवा जास्त ताणामुळं आपला जोडीदार चिडचिडा (Irritable) होतो आणि त्याला हाताळणं कठीण जातं. अशा वेळी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं तर नात्यातील दरी आणखी वाढते.
3 / 10
विशेषतः जर पत्नी (Wife) खूप तणावाखाली असेल आणि तिचा स्वभाव चिडचिडा झाला असेल तर नवऱ्यानं तिच्या भावना समजून घेऊन काही गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि वाईट काळातही तिचा आधार बनणं आवश्यक आहे.
4 / 10
तुम्ही तुमच्या पत्नीला वाईट काळात कणखरपणे साथ दिली तर तुमचं नातं (Relationship tips) खूप सखोल आणि विश्वासानं भरलेलं राहील.
5 / 10
चला, जाणून घेऊया चिडचिड करणाऱ्या बायकोला (How To Deal With Irritable Wife) कसं हाताळायचं.
6 / 10
पत्नीच्या चिडचिड का करत आहे, हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण जाणून घेतल्यानंतर स्वतःला विचारा की, यामागे तुम्ही जबाबदार आहात का? जर याचं उत्तर 'होय' असेल आणि तुमची चूक असेल तर, त्याबद्दल तुम्ही तुमच्या पत्नीला सॉरी म्हणू शकता. यामागे आणखी काही कारण असल्यास, ते निराकरण करण्याचा प्रयत्न करा.
7 / 10
अशा परिस्थितीत तुमचा संयम सुटला तर नात्यात दुरावा येऊ शकतो. अशा परिस्थितीत संयम राखण्याची गरज आहे, तरच परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल.
8 / 10
कधी-कधी त्याच त्याच दिनक्रमामुळं बायकोचा स्वभाव चिडचिडा होतो. अशा परिस्थितीत पत्नीला आठवड्यातून एकदा चित्रपट दाखवायला घेऊन जाणं किंवा तिला बाहेर जेवायला नेणं, लाँग ड्राईव्हवर जाणं, तिच्यासोबत छोटी-मोठी सुट्टी घेऊन फिरायला जाणं या बाबी नातेसंबंध चांगलं करतात. या पतीनं लक्षात ठेवणं आवश्यक असतं. जेणेकरून, तिचा मूड तर चांगला होतोच; शिवाय, तिचा चिडखोर स्वभावही दूर होऊ शकतो.
9 / 10
अनेकवेळा घरची सगळी कामं आपल्याला एकटीनंच करावी लागतात, असं बायकोच्या मनात येतं. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना हे समजावून दिलं पाहिजे की, घराची सर्व जबाबदारी तिची एकटीची नसून तुम्ही दोघे मिळून घर सांभाळता. अशा स्थितीत घरातील कामं वाटून घेऊन अर्धी कामे तुम्ही स्वतः करावीत आणि पत्नीसह घरातील कामं पूर्ण करण्यात मदत करावी.
10 / 10
संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर पत्नीसोबत थोडा वेळ घालवा. यामुळं पत्नीचा मूड तर चांगला होईलच; शिवाय, पत्नीसोबत वेळ घालवल्यानं तुम्हालाही फ्रेश वाटेल. तुमच्या दोघांचाही एकटेपणा दूर होईल.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप