Know why every girl needs a female friend
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक फिमेल फ्रेन्ड गरजेची का असते? By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 3:39 PM1 / 7मैत्री हे नातं इतर सर्व नात्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं आणि असं यासाठी म्हटलं जातं कारण प्रत्येकालाच मित्रांची किंवा मैत्रिणीची गरज असते. सामान्यपणे असा विचार केला जातो की, मुलींना एक बॉयफ्रेन्ड मिळाला तरी चालेल. पण तसं नसतं. एका मुलीसाठी बॉयफ्रेन्ड मिळणं जितकं महत्त्वाचं असतं, त्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं एक फिमेल फ्रेन्ड. (Image Credit : lifealth.com) 2 / 7अनेकदा शाळा किंवा कॉलेजमध्ये मुली एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असतात. पण त्या बॉयफ्रेन्ड आल्यावर बदलतात आणि मग दुसरी मैत्रीण एकएकी एकटी पडते. असं अजिबात करू नये. उलट जुन्या मित्रांना अधिक महत्त्व दिलं पाहिजे. आज आम्ही सांगणार आहोत की, एका मुलीच्या आयुष्यात फिमेल फ्रेन्ड असणं कार गरजेचं असतं. 3 / 7१) जेव्हा तुमचं बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप होतं तेव्हा असं कुणी ना कुणी हवं असतं ज्यावर विश्वास ठेवता येईल. असं कुणीतरी ज्याच्याकडे सगळंकाही सांगता यावं. अशावेळी तुमची फिमेल फ्रेन्डच तुमच्या सर्वात जास्त कामात येते. तिच त्यावेळी एकमात्र आधार असते. त्यामुळे तुमच्या फिमेल फ्रेन्डला इग्नोर करू नका. (Image Credit : Bonobology.com) 4 / 7२) जेव्हाही तुम्ही एखाद्या समस्येत असाल किंवा फॅशनबाबत काही विचारायचं असेल तर त्यावेळी तुमची फिमेल फ्रेन्डच तुमच्या कामी येते. तिच तुम्हाला योग्य काय ते सांगू शकते. अनेकदा बॉयफ्रेन्डच्या तुलनेत तुम्ही फिमेल फ्रेन्डसोबत शॉपिंगला जाता तेव्हा जास्त चांगली खरेदी करू शकता. त्यासोबतच जेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असतो तेव्हा तिच तुमची मदत करते. (Image Credit : besthealthmag.ca)5 / 7३) दररोजच्या जीवनात अशा अनेक समस्या किंवा अडचणी असतात ज्या तुम्ही नातेवाईकांना किंवा बॉयफ्रेन्डला सांगू शकत नाहीत. अशात तुमची फिमेल फ्रेन्ड तुमच्या मदतीसाठी तयार असते. ती गरजेनुसार तुम्हाला मदत करते. तुमच्या फिमेल फ्रेन्डसोबत बोलून अनेकदा मोठ्यातली मोठी समस्या दूर केली जाऊ शकते6 / 7४) जेव्हा तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनाबाबत बोलायचं असतं तेव्हा तुम्ही या गोष्टी केवळ मैत्रिणीलाच सांगू शकता. या गोष्टी तुम्ही पुरूषाकडे तेवढ्या मोकळेपणाने नाही बोलू शकत. त्यामुळे फिमेल फ्रेन्ड सोबतच यावर तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. (Image Credit : www.bravotv.com)7 / 7५) मुलांबाबत बोलायचं असो वा तुमच्या मासिक पाळीबाबत हे तुम्ही मैत्रिणीसोबत बिनधास्त बोलू शकता. एक मुलगा कधीही तुमच्या भावनांना इतक्या चांगल्याप्रकारे समजू शकत नाही, जितकी एक फिमेल फ्रेन्ड समजून घेऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications