lifestyle ask yourself these questions to know if your mobile is taking toll on your relationship
पार्टनरपेक्षाही फोनवर जास्त प्रेम करता?; मग स्वतः ला विचारा 'हे' प्रश्न! By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:28 PM1 / 7स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. रिलेशनशिपमध्ये हल्ली ब्रेकअप होण्यामागे अनेकदा स्मार्टफोन हे कारण असतं. पार्टनरकडे लक्ष देण्याची गरज असते तेव्हाच अनेकदा फोन हातात घेतला जातो. स्मार्टफोनमुळे जर तुमच्या नात्यात अडथळा येत असेल तर स्वत: ला काही प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. 2 / 7तुम्ही तुमच्याकडे असलेला मोकळा वेळ कसा घालवता याचा विचार करा. एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हातात स्मार्टफोन असं काहीजण करत असतात. मात्र तुम्ही रिकाम्या वेळेत फोन हातात घेत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक ठरू शकतं.3 / 7पार्टनरचा एखादा मेसेज आला की काही जण तो मेसेज इग्नोर करतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला कशा पद्धतीने उत्तर देता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही जणांना फक्त हम्म्म असं उत्तर देण्याची सवय असते. मात्र पार्टनरचा मेसेज अशातऱ्हेने टाळू नका. 4 / 7छोट्या छोट्या गोष्टी विसरत असाल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अने्कदा घरात एखादी वस्तू आणण्याचे सांगितलं जाते. तसेच नातेवाईकांचा वाढदिवस असतो त्यावेळी त्यांना शुभेच्छा देणं गरजेचं असतं. मात्र तुमच्या या विसरभोळेपणासाठी फोन कारणीभूत नाही ना हे जाणून घ्या. 5 / 7एकमेकांशी संवाद साधल्यामुळे नातं अधिक घट्ट होतं. मात्र संवाद साधत असताना तुमचं पार्टनरऐवजी स्मार्टफोनमध्ये लक्ष असेल तर ते तुमच्या नात्यावर परिणामकारक ठरू शकतं. फोनमुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता हा अधिक असते. 6 / 7पार्टनर अनेकदा त्याचं मत व्यक्त करत असतो किंवा एखाद्या गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी स्मार्टफोनमध्ये गुंतून राहण्यापेक्षा पार्टनरकडे लक्ष द्या. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर तुमचा पार्टनर जास्त प्रेम करतो की तुमचा स्मार्टफोन हा प्रश्न स्वत: ला नक्की विचारा. 7 / 7स्मार्टफोनवरून अनेक महत्त्वाची कामं होत असल्याने त्यापासून दूर राहणं हे थोडं कठीण आहे. मात्र नात्यातील गोडवा टिकवून ठेवायचा असल्यास स्वत: साठी काही नियम तयार करा. घरात असताना कामाचे फोन उचलू नका त्याऐवजी तो वेळ पार्टनरसोबत घालवा. आणखी वाचा Subscribe to Notifications